थकलेल्या बापाची कहाणी - शितल पवार
घरासाठी जन्मभर धावला,
पण स्वतःसाठी क्षणभरही न थांबला...
थकलेले पाय, थकलेले खांदे,
आयुष्यभर ओझं वाहून नेणारे रांधे.
सकाळच्या सुर्याबरोबर उठतो,
आणि रात्रीपर्यंत कष्टच करतो...
पण घरातल्या मुलांच्या हास्यात,
तो प्रत्येक थकवा विसरतो.
शर्टाला घामाचे डाग,
पण चेहऱ्यावर समाधानाची झलक...
"बाबा" या एका शब्दाने,
त्याच्या आयुष्याला लागतो रंग.
स्वप्नं नेहमी आपल्या नसतात,
पण बाप नेहमी मुलांसाठी जगतो...
थकलेला असला तरी,
त्याच्या डोळ्यात कधीही हार दिसत नाही.
आजही अंगावर वेदना दाटतात,
तरीही हात काम थांबवत नाहीत...
कारण त्याला माहित आहे –
घर चालतंय त्याच्या थकव्यामुळेच.
अशा या थकलेल्या बापाची कहाणी,
सोन्याहून जास्त किमतीची आहे...
त्याच्या कष्टांच्या सावलीत,
आपली प्रत्येक स्वप्नं पूर्ण होत आहेत.