चंद्र आहेस तू माझा.. चांदणी मी तुझी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

खळाळता समुद्र आहेस तू .. तुझा शांत किनारा मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

अवखळ वारा आहेस तू.. रातराणीचा सुगंध मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

अर्धांग आहेस तू माझा.. अर्धांगिनी तुझी मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..


-Its_anu_lekha

Marathi Poem by Its_anu_lekha : 111801326

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now