समज गैरसमज.....! 😇

वय वाढतं तस "समजही" आपोआप वाढायला लागते त्या वाढत्या समजेसोबत "गैरसमजेला" ही हळूहळू अंतर्मनात पालवी फुटायला सुरुवात होत असते पण ती होणारी सुरुवात इतक्या "संथ" गतीने होत असते की आपल्याच अंतर्मनात "गैरसमज" नावाचा घातक जीव वावरतोय आपल्याला हे देखील समजण्याची "समज" नसते.......!

मग आपल्या सभोवतालची आपली माणसं ज्यांना आपण आपलं मनतो , जिवापाड प्रेम करतो , अगदी मनाच्या गाभाऱ्यापासून आपुलकीच्या धाग्यापासून विणलेली नाती त्या नात्याची वीण सुटू नये म्हणून आपण नेहनीच काळजी घेत असतो आणि अशाच नात्यात "गैरसमज" हळुवारपणे मनातून डोकावू पाहत असतो......! आपण आपल्याच माणसावर चिडतो , रुसतो , आणि कधी कधी भांडणही करतो......!

कारण ती व्यक्ती आपली आहे आणि ज्या व्यक्तीला आपण आपलं मानत नाही तिथे रागावणे , चिडणे, आणि रुसणे या भावनांचा उगम सहजपणे होतंच नसतो......!

अनोळखी नात्यात कधी "गैरमज" होतो का हो......?

कारण गैरसमजेला ही चांगलंच ठाऊक असत आपण ज्या नात्यात डोकावून पाहतोय ते नात किती घट्ट आहे आणि किती नाही मुळात याचीच शहानिशा करण्यासाठी हा गैरमज" नात्यात अधूनमधून अंतर्मनातून डोकावून पाहत असावा........!

होत राहतील नात्यात भांडणे पण त्यात
गैरसमजेचा दोष काहीच नसावा
समजेलाही माहीत असावं
खऱ्या नात्यात गैरसमजेचा
जीवन काळ फार कमी
असावा......! 😊😇

©®- @pavankumar_6958

insta id - http://www.instagram.com/pavankumar_6958

Marathi Blog by Pavankumar_6958 : 111899067

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now