“तो…
पूर्वी रात्र मला शांत वाटायची,
स्वप्नांची काहीतरी नाजूक साथ असायची,
आता एक प्रकाशकिरण वाटतो त्याचा स्पर्श,
कधीकधी वाटतं, त्याच्या भेटीतच आहे सारा अर्थ.
कितीतरी अनकळं माझ्यात हलकं हलकं जागं होतं,
मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्याचं अस्तित्व दिसतं.
रोजचा चंद्र जरा वेगळाच वाटतो,
आकाशात जणू काय त्याच्यासाठीच उजळतो.
आणि मग …….,
अंधारात आशेचा किरण डोकावतो,
मन हळूच त्याच्या आठवणीत हरवतो,
उशीला मिठी मारून मी तो क्षण अनुभवते ,
माझ्याच केसात त्याच्या हातांचा भास शोधते.
स्वतःशीच त्याचं नाव गुणगुणते,
मनात त्याला वारंवार भेटते,
एकटीच त्याच्या आठवणीत हरवून जाते,
- वैshnavi Kunjir
#Kavyotsav2