काही त्रिकूटे( हायकू)
१) पक्षी उडाले. ३) थेंब पहिला
फांदी हळहळली. माती गंधीत झाली
फुले रुसली. मन हसले.
२) बासरी वाजे ४) हिरवे रान
गोकुळ जागे झाले बेधुंद होई वारा
सांज सजली झेलीत गारा
५)चंद्र खुणावे
चंद्रिका उगा लाजे
चकोर जागे
६) सावली माझी. ७)रात चांदणी
तरीही मी परका. रातराणी दिवानी
ऊन बेभान परी तू कुठे?
८)शिळ हळवी. ९) नसावं अस
गोफ इंद्रघनुचा. त्रयस्थ व परक
मी नसे माझा. आपलं मन
१०) निळे आभाळ
अभ्रे शुभ्र ढगांची
सुने क्षितीज
बाळकृष्ण सखाराम राणे