नात्यांमध्ये राजकारण हेच सगळ्यात धोकादायक खेळ असतो—
इथे हृदय मत देतं, पण मेंदू कायम विरोधी पक्षात बसलेला असतो.
कधी प्रेम जाहीरनामा होतं, तर कधी अहंकार सत्ताधारी पक्ष ठरतो.
प्रत्येक छोटी गोष्ट मंत्रिमंडळाची बैठक बनते,
जिथे निर्णय भावनांच्या सभापतीच्या हातात असतो.
निष्ठा इथे बहुमत असते, आणि विश्वास ही खरी राज्यघटना.
आणि जेव्हा विश्वास तुटतो, तेव्हा सगळं नातं मध्यावधी निवडणूक बनून कोसळतं...
By Fazal Abubakkar Esaf