🥭आंब्याचे सांदणे
आंब्याच्या मोसमात सांदणे खुप वेळा केले जाते
प्रत्येक वेळेस नविन कलात्मकता वापरायची 🙂
🏵️सव्वा वाटी केशरी रवा
अथवा थोडा जाडसर रवा
एक वाटीभर आंब्याचा रस थोडे केशर घालून
(केशर आपल्या आवडीनुसार वापरावे )
चवीनुसार मीठ
पांव चमचा सोडा
चार चमचे साखर (आंब्याच्या गोडी नुसार)
🏵️रवा कोरडाच भाजुन घ्यावा
आंब्याचा रस व रवा एकत्रित करून भिजवून घेणे
लागल्यास थोडे दूध वापरावे
दोन तासांनी पुन्हा मिश्रण थोडे घट्ट होते
परत लागेल तितके दूध घालून
सरसरित करून घेणे ..
🏵️आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात साखर घालणे
गोड पदार्थात घालतो तसे थोडे चवी पुंरते मीठ घालणे
व मिश्रण पाव चमचा सोडा घालून चांगले फेटून घेणे
आमचा घरचा आंबा गोड असल्याने मी अजिबात साखर घातली नाही
🏵️कुकरच्या भांड्यात वाफवून याच्या बदामी आकाराच्या साच्यात वड्या पाडल्या
फोटो घरच्या बागेतील हिरवळी वर....