टोमॅटो 🍅 पोहे
कांदे पोहे ,बटाटे पोहे , फ्लॉवर पोहे, मटार पोहे असे व इतर अनेक प्रकारचे पोहे आपण करतो त्यात हा एक वेगळा प्रकार..
🍅साहित्य
दोन मोठे लाल भडक 🍅 टॉमेटो
दोन मिरच्या
कढीलिंब
दोन वाट्या पोहे
फोडणीचे साहित्य.
कोथिंबीर ओले खोबरे
हळद
साखर मीठ चवीप्रमाणे
🍅कृती
प्रथम पोहे भिजवून घ्यावे
भिजवलेल्या पोह्यात हळद ,एक चमचा साखर व चवीप्रमाणे मीठ घालून मिसळून घ्यावे
टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे
🍅एका पॅन मध्ये तेलात फोडणी करावी व फोडणीत मिरची तुकडे, कढीलिंब घालावा व झाकण ठेवावे
दोन मिनिटात झाकण काढून टोमॅटोच्या फोडी घालून
परत झाकण ठेवावे
🍅पाच मिनिटात टॉमेटो फोडी शिजून मऊ होतील
त्यानंतच्या त्यावर भिजवलेले पोहे घालून परतावे
परत झाकण ठेवून चांगलीं वाफ येऊ द्यावी
🍅झाकण काढून परत पोहे सारखे करून
वरून कोथिंबीर खोबरे घालावे व गरम खायला घ्यावे
टोमॅटो मुळे लिंबाची गरज पडत नाहीं