Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पोंगल (तमिळ )हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे.‘तमिळर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणारा हा सण जगात जेथे म्हणून तमिळ भाषिक लोक आहेत तेथे तर साजरा होतो.
भारतात प्रामुख्याने तमिळनाडु राज्यात
आणि भारताबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, युरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस इत्यादी अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

पोंगल सणाच्या दिवशी खारा आणि गोड असा दोन प्रकारचा पोंगल हा पदार्थ केला जातो
तांदूळ, मूग डाळ ,तूप, गूळ, काजू यांचा वापर करून गोड पोंगल तयार करतात.
याला शर्करी पोंगल म्हणतात.
त्याच जोडीने तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी शिजविलेले जाते ज्यात काळी मिरी वापरून लाल मिरची आणि कढीलिंब तळलेले काजू याची फोडणी दिली जाते

वेन पोंगल (खारा)

हे एक प्रकारें आपल्या मुग डाळ तांदळाच्या खिचडीचेच भावंडं 🙂
अतिशय चवदार असणारा हा प्रकार एकदा केल्यावर परत परत फर्माईश झाली 🙂

साहित्य
एक वाटी तांदुळ
पाव वाटी मूग डाळ
तूप
थोडी हळद
एक मिरची बारीक तुकडे करून
दोन चमचे आले खिसून
दहा बारा काजु
दोन चमचे काळी मिरी
कढीलिंब
जिरे
हिंग
मीठ चवीनुसार

कृती
तांदुळ धुवून तासभर भिजवून ठेवावे
मूग डाळ तूप टाकून खमंग भाजून घ्यावी
छान वास सुटला की त्यात भिजवलेले तांदुळ घालून
किंचित हळद
(हलकासा रंग येण्या इतपत..)
व चवीनुसार मीठ घालुन
साडे तीन वाट्या पाणी घालून
कुकर मध्ये दोन तीन शिट्या करून मऊसर शिजवून घेणे
तांदुळ आणि मूगडाळ एकजीव झाली पाहिजे

कुकर गार झाल्यावर थोडे पाणी घालून घोटून घेणे
मिश्रण सरसरीत झाले पाहिजे
एका कढल्यात तूप घालून
काजु तळुन घ्यावे व बाजुला ठेवावे
नंतर जीरे हिंग काळी मिरी घालून फोडणी करावी
त्यात किसलेले आले
बारीक चिरलेली मिरची
कढीलिंब घालावा व तो चांगला चुरचुरीत तळुन घ्यावा
ही खमंग फोडणी व तळलेले काजु मिसळून कुकरमधील घोटलेल्या भातावर घालावी
परत लागेल तसे मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावे
ही पाककृती अतीशय चविष्ट व तुपाच्या वासामुळे स्वादिष्ट लागते
यासोबत चटणी अथवा सांबार खाण्याचा प्रघात आहे
मी सोबत आंब्याचे लोणचे घेतले आहे

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112028715
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now