उपवास स्पेशल.
रताळे कचोरी आणि कोथिंबीर चटणी..
चार रताळी उकडून सोलून चवीपुरते मिठ घालून छान हाताने बारिक करुन मळून घेतली
ओले खोबरे,काजु, बेदाणे, थोडी साखर,मीठ बारीक आले तूकडे ,लिंबू ,कोथिंबीर घालून
सारण करुन घेतले
रताळ्याची पारी करुन त्यात सारण भरले
सर्व कचोऱ्या तयार करुन चार तास फ्रिज मध्ये सेट केल्या
खाण्याच्या वेळी गरम तेलात खरपूस तळून घेतल्या
सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर दाण्याचे कूट साखर मीठ जिरे घालून चटणी केली