#उपवास स्पेशल..
🍂राजगिरा बटाटा थालिपीठ
🍂साहित्य
राजगिरा पीठ एक वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
एक बटाटा
जिरे,
मीठ,
साखर (ऐच्छिक)
बारीक चिरलेली मिरची,
कोथिंबीर (उपासाला चालत नसेल तर घेऊ नये)
🍂कृती
बटाट्याचा सालासकट कीस करून घ्यावा
बटाटा कीस व सर्व साहित्य एकत्रित करून पीठ भिजवावे
अर्धा तास झाकून ठेवावे
यानंतर तव्यावर तूप सोडून
थालिपीठ लावावे
बोटांनी मध्ये मध्ये गोल करून
त्यात तूप सोडावे
🍂झाकण ठेवून दोन्हीकडून चांगले भाजुन घ्यावे
हे थालीपीठ कुरकुरीत व चविष्ट होते
🍂सोबत घरचे ताजे लोणी🙂
🍂उपासाला चालत नसल्याने अथवा इतर तब्येतीच्या कारणामुळे काही लोक साबुदाणा खात नाही त्यांच्यासाठी हे थालिपीठ चांगले आहे