🌾शेंगोळी.🌾
🌾खरेतर ही एक पारंपारिक पाककृती आहे
पण मी त्यात भाज्या वापरून थोडा पौष्टिक बदल केलाय🌾
🌾साहित्य
दुधी भोपळा
लाल भोपळा
मटार
गोल मिरच्या (साध्या पण चालतील) टोमॅटो
व इतर कोणत्याही आवडीच्या भाज्या
🌾शेंगोळी साठी
नाचणी पीठ
डाळीचं पीठ
तांदूळ पिठी
कणिक
ज्वारी व बाजरी पीठ
🌾तिखट,मीठ , हळद,
काळा मसाला , आमसूल ,तीळ ,
बडीशेप ,जिरे, कढीलिंब
🌾कृती
सर्व पीठे अंदाजे घेउन एकत्र करून चवीप्रमाणे तिखट ,मीठ ,हळद ,तीळ
बडीशेप ,जिरे घालून कडकडीत तेलाचे मोहन घालावे
व हे पीठ घट्ट भिजवून वीस मिनिटे ठेवावे
त्यानंतर त्याच्या कडबोळी प्रमाणे शेंगोळ्या करून घ्याव्यात
प्रथम नेहेमी प्रमाणे फोडणी करून त्यात कढीलिंब,गोल मिरच्या व सर्व चिरलेल्या भाज्या घालाव्या .
थोड्याशा वाफेवर भाज्या दहा मिनिटे शिजवाव्यात
आता त्यात आपल्याला जितके पातळ अथवा घट्ट हवे असेल तितके पाणी घालावे
पाणी थोडे जास्त चालते कारण शेंगोळ्या शिजताना त्यातील पिठामुळे पाणी दाट होते
या पाण्यात आमसूल,काळा मसाला,मीठ, हळद व आवडीप्रमाणे तिखट घालावे
यानंतर पाण्याला उकळी आल्यावर तयार शेंगोळ्या त्यात टाकाव्या ..
शेंगोळ्या शिजल्या की त्या वर येतात म्हणजे त्या खायला तयार झाल्या आहेत
पसरट वाडग्यात शेंगोळ्या घालून वर आवडीप्रमाणे कोथिंबीर खोबरे व तूप घालून
गरम गरम खाव्यात ..😋
अत्यंत पोष्टिक व चवदार पदार्थ😋
पावसाळ्याच्या दिवसात मस्त वन डिश मील म्हणुन करता येते 🙂