🍂रताळ्याचे काप
उपवास स्पेशल
🍂साहित्य
चार रताळी
दोन चमचे तूप
अर्धी वाटी गूळ
वेलदोडे पावडर
🍂कृती
रताळी स्वच्छ धुवून त्याचे थोडे जाडसर काप करून घ्यावे
हे काप पाण्यात टाकून ठेवावे
पॅन मधे दोन चमचे तूप घालुन
तूप गरम होताच हे काप पाण्यातून काढून स्वच्छ पुसून
तुपात टाकावे
🍂थोडे परतून झाकणं ठेवावे
अधून मधू हलवत रहावे
थोडा सोनेरी रंग येईपर्यंत परतावे
थोड्याच वेळात रताळी शिजतात व खमंग वास सुटतो..😋
काट्याने टोचून रताळे शिजले का बघावे
रताळी शिजताच आर्धी वाटी गूळ घालून एकत्र परतावे
🍂गूळ विरघळून थोडा घट्ट होत आला की वेलदोडे पावडर घालावी
दोन मिनीटे गॅस बंद करून झाकण ठेवावे
व नंतर खायला घ्यावे