तुझ्या प्रेमात ' वेडा' झालो
वेनितला 'केवडा' झालो..!
चढली नशा तुझी इतकी
बिन पिता 'बेवडा' झालो..!
लोकं भरवत होते मिष्टांन्न
चकण्यातला 'चिवडा ' झालो..!
अट्टाहास तुझा राधे समान
गोरा असून 'सावळा' झालो..!
प्रेमाचा पडला प्रभाव इतका
राई होतो,पर्वता येवढा झालो..!
सनईने छेडले सुर मंगल इतके
अर्ध्या हळकुंडात पिवळा झालो..!
----------------------------------------
एक अश्वस्थामा - अविनाश ढळे
copyright ©️ all Rights are reserved under copyright act_avinash.b.dhale11@gmail.com