🌱हळदीच्या पानातील पानगी 🌱
🌱पानगी हा प्रकार केळी अथवा कर्दळीच्या पानांवर सुद्धा केला जातो
प्रत्येकाची आणि प्रत्येक ठिकाणी केली जाणारी पानगी वेगळी असते
ही पानगी मी हळदीच्या पानात केली आहेत
घरच्या बागेत भरपूर हळदीची पाने आहेत
उकडणे वाफवणे यासाठी ती भरपूर प्रमाणात वापरली जातात
🌱कधी कधी एखाद्या रस भाजीत सुद्धा य पानाचे एक दोन तुकडे मी टाकते
छान स्वाद येतो 😊
🌱हळद जंतुनाशक असते
शिवाय त्या पानांचा सुगंध आणि त्यामुळे पदार्थाला येणारा स्वाद अप्रतिम असतो
सगळे घर या खमंग सुगंधाने दरवळून जाते
अगदी बाहेर पर्यंत वास पसरतो
🌱य पानात मी केलेल्या पानगी साठी
प्रथम एक वाटी तांदूळ पिठीत
थोडेसे ताक, किसलेले आले, मीठ, किंचित हळद, जिरे व मीठ घालून सरसरीत भिजवून ठेवले
पंधरा वीस मिनिटे हे झाकून ठेवले
(ताक ऐच्छिक आहे नुसत्या पाण्यात पण भिजवू शकता)
🌱हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली
त्याचे चौकोनी तुकडे केले
जेणेकरून तव्यावर भाजायला बरे पडेल
🌱तवा गरम करायला ठेवला
पानांवर आतील बाजूला भिजवलेले तांदळाचे पीठ हाताने पसरून लावले
वरती हलकेच बाहेरच्या बाजूने दुसरे पान ठेवून हलकेच दाबले
🌱अशी सर्व पाने तयार केली
तवा कडकडीत तापल्यावर ही पाने ठेवून दोन्ही बाजूने खमंग भाजून घेतली
याला भाजताना तेल अथवा तूप अजिबात लागत नाही
🌱खाली काढून हलकेच दोन्हीकडची पाने काढली
गरम गरम पानगी तूप आणि घरच्या लिंबाच्या लोणचे सोबत खायला घेतली
🌱अतीशय चविष्ट झाली होती 😋
हळदीच्या पानामुळे ही पानगी खमंग आणि सुवासिक झाली होती 😊