गाजर दुधी रोल्स.
एक वाटी गाजर कीस
एक वाटी दुधी कीस
अर्धी वाटी ज्वारी पीठ
पाऊण ते एक वाटी डाळीचे पीठ
गाजर व दुधी कीस एकत्र करुन त्यात तिखट मीठ हळद गरम मसाला साखर बडीशेप व ज्वारीचे पीठ घालून हलक्या हाताने एकत्र करावे
नंतर थोडे थोडे डाळीचे पीठ घालून घट्ट गोळा करावा..
पाणी अजिबात घालू नये
हाताला तेल लावून त्याचे लांबट रोल करुन घ्यावेत व कुकरला वाफवून घ्यावेत
हे रोल थंड झाल्यावर अर्धा ते एक तास फ्रिज मध्ये झाकून ठेवावे
म्हणजे ते चांगले सेट होतात
थंडगार रोल फ्रिज मधून काढून लगेच मध्यम आकाराच्या चकत्या कापाव्यात
पसरट भांड्यात थोडे जास्त तेल घालून मोहरी हिंग कढीलिंब तीळ . मध्ये चीर दिलेल्या लांब मिरच्या घालून फोडणी करावी
हे रोल त्यात खालून वरून चांगले खरपूस भाजून घ्यावेत
आतून मुलायम व बाहेरून कुरकुरीत होतात
खायचा देताना त्यावर खोबरे कोथिंबीर घालावी
चिंचेच्या चटणी अथवा सॉस सोबत छान लागतात..
टीप .
फ्रिज मधून भोपळा व गाजर काढल्यावर गार असतानाच किसावे
ताबडतोब रोल चे मिश्रण करावे
म्हणजे भोपळा जास्त पाणी सोडत नाही
फ्रिज मधून सेट केलेले रोल बाहेर काढताच लागलीच काप करावे
म्हणजे अखंड तुकडे होतात व फुटत नाहित