टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)

(10)
  • 19.8k
  • 0
  • 8.4k

कथेचं नाव वाचून थोड वेगळे वाटत आहे ना? तर ही कथाच थोडी वेगळी असणार आहे. फॅन फिक्शन या प्रकारातील ही स्टोरी आहे. फॅन फिक्शन म्हंटले, की एखाद्या स्टोरी चा किंवा मूव्हीचा विचार करून अगदी आपल्या पद्धतीने मांडणे. ते ही कथा स्वरूपात. तर आज मी ही टेडी या साऊथ इंडियन मुवी चा संदर्भ घेऊन स्टोरी मांडत आहे. पण स्टोरी माझी तशी अजिबात नाही आहे. खूपच वेगळी आहे. ती सुध्दा थोडी प्रेमकहाणी टाईप. पूर्णतः काल्पनिकच म्हणा! चला तर वळूया स्टोरी कडे. ********** आज संजीवनी हॉस्पिटल मध्ये गंभीर अपघात झालेल्या पेशंटला आणण्यात आले होते. स्थिती ही त्याची खूपच खालावली होती. रक्त प्रवाह जास्त वाहून गेला होता. डॉक्टर थोडे घाबरून त्याच्या वर उपचार करत होते. कारण ती व्यक्ती कोणी साधी सुधी नव्हती! बाहेर असलेले त्याचे नातेवाईक खूपच ओरडुन डॉक्टरांना धमकी देऊन ऑपरेशन करायला लावत होते. "डॉक्टर रक्त जास्त वाहून गेलं आहे. यामुळे मला नाही वाटत हा वाचेल असा? पण बाहेर कस सांगणार ना? त्यापेक्षा उपचार करा.",एक डॉक्टर दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला.

1

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग १

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग १ कथेचं नाव वाचून थोड वेगळे वाटत आहे ना? तर ही कथाच थोडी वेगळी असणार फॅन फिक्शन या प्रकारातील ही स्टोरी आहे. फॅन फिक्शन म्हंटले, की एखाद्या स्टोरी चा किंवा मूव्हीचा विचार करून अगदी आपल्या पद्धतीने मांडणे. ते ही कथा स्वरूपात. तर आज मी ही टेडी या साऊथ इंडियन मुवी चा संदर्भ घेऊन स्टोरी मांडत आहे. पण स्टोरी माझी तशी अजिबात नाही आहे. खूपच वेगळी आहे. ती सुध्दा थोडी प्रेमकहाणी टाईप. पूर्णतः काल्पनिकच म्हणा! चला तर वळूया स्टोरी कडे. ********** आज संजीवनी हॉस्पिटल मध ...Read More

2

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग २

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग २गायत्री आपली घरी येऊन बंगल्या मधील पार्किंग मध्ये गाडी नीट पार्किंग करते. बंगला अगदी तिचा टाईप होता. पुढे बाग होती. मेन गेट पासून ते बंगल्या पर्यंत अरुंद रस्ता. मधोमध एक फाऊंटन होत. ते रात्रीचं खूपच आकर्षक वाटत असायचे. त्यात असलेल्या लाईट मुळे. रस्त्याच्या बाजूला झाड होती. पूर्ण गार्डन एरिया सारखं होत. झाड अशी वेगवेगळी होती. पार्किंग एरिया बबंगल्याच्या मागे अंडर ग्राउंड तयार केलेला होता. मोठा असा होता. गायत्री आपली गाडी तिथं आणून पार्क करत असायची आणि मग तिथच असलेल्या लिफ्टचा वापर करून ती आपल्या घरात जात असायची. आजही तिने तसेच केले. आपले सामान , टेडी ...Read More

3

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३

भाग ३."ओम भगा भुगे भगनी भगोदरी ब्रम्हासे क्लीमना क्लीमना ओम भट स्वाहा!", तिच्या छातीवर हात ठेवत कोणीतरी बोलत असते. ही विचित्र होता. असे हात ठेवल्याने भीतीने तिचा थरकाप होत होता. हळूच धीर करून आपले डोळे ती उघडते आणि पाहते. तर समोर तिचा टेडी बसलेला होता. त्याचे हात तिच्या छातीवर होते. तो मंत्र बोलत असतो. आता त्याचा आवाज खूप कर्कश वाटत होता. तिला तर सगळ पाहून खूपच भीती वाटत असते."काय....काय ....करत आहेस तू?",ती कसेबसे भीतीने एक एक शब्द जुळवत विचारते."थांब! मला माझं काम करू दे! हा मंत्र म्हटला की माझा आत्मा तुझ्यात , तुझा आत्मा बाहेर!",टेडी अगदी तात्या विंचू सारखे ...Read More

4

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ४

भाग ४."डॉक्टरऽऽऽ डॉक्टरऽऽऽ",असा आवाज तिच्या कानावर पडतो. हा आवाज कोणाचा होता हे तिला ओळखायला वेळ लागला नाही. बाहेर थांबलेली रूमच्या आत निघून येते. पाहते तर टेडी बरा भिजला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड इरिटेड भाव दिसत होते. त्याला अस पाहून तिला हसूच येत."तुला कळत नाही का तू एक टेडी आहेस?",हसू आपल दाबत गायत्री त्याला विचारते. आता त्याला आठवत तसा तो नाही मध्ये मान हलवतो."मला सकाळी अंघोळ करायची सवय आहे. पण आता हे अस झाल आहे. कस सुकेल हे? वाटत नाही!",आपल्या अंगाकडे पाहत तो विचारतो. भिजला होता तो. बाथरूम मध्ये जाऊन शॉवर चालू करताच पाणी त्याच्या अंगावर पडले होते. थोड पाणी ...Read More

5

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ५

भाग ५. टेडी शांत बसून समोर पाहत असतो. आता तिथं तो एकटाच होता आणि त्याच शरीर होत. तिथं त्याला कंटाळा येत होता. त्याच वेळात एक सुंदर अशी तरुणी चालतच दरवाजा उघडून आत मध्ये येते. त्या सुंदर मुलीला पाहून टेडीचे डोळे चमकतात."सुशीला.",हेच नाव तो मनात बोलतो. तिने ऐकू नये यासाठी. ती तशीच चालत येत समोर निपचित पडलेल्या त्याच्या शरीराला पाहत असते. डोळ्यांत पाणी होते सध्या तिच्या. आसपास ती नजर फिरवते तर तिथं कोणीच तिला दिसत नाही. तसे ती टेबलवर बसत एक हात डोळ्यावर स्वतःच्या फिरवत पाणी आपले पुसून टाकते."युवी, बेबी सॉरी. तुझी अवस्था पाहून मला वाईट नाही वाटत आहे.",सुशीला ...Read More

6

टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ६

भाग ६."डॉक्टर, तू खूप चांगली आहेस.",टेडी तिला पाहत म्हणाला."तू मस्का मारत जाऊ नको.",गायत्री ही समोर पाहत सरळ म्हणाली."ओके. तू आता मदत केली तेवढी बस झाली. आता मला नाही वाटत माझं पुढे काही होऊ शकत असे? माझं सगळ वैभव गेलं आहे. तू ऑपरेशन कस करशील माझं? माझ्याकडे इतके पैसे ही नाहीत!",एक हताश नजरेने तो म्हणाला. सुशीलाने सगळ त्याच घेऊन टाकले होते. त्याच ऐकून गायत्री विचार करते."मी माझा पैसा लावू शकते. तसेही मी ज्यांना ऑपरेशन करता येत नाही पैसा अभावी अश्या लोकांना मदत करत असते. तसच तुला करेन. त्या सुशीलासाठी काही प्लॅन असेल तर बघ. तुझ्या घरचे आता कुठे राहतील?",गायत्री शेवटी ...Read More

7

टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ७

भाग ७. एका हॉटेल मध्ये गायत्री आपल्या टेडी सोबत एका प्रायव्हेट एरियात बसली होती. तिथं श्रीमंत लोक बसत असायचे. गायत्री मेन्यू कार्ड वाचत असते. टेडी तिथं असलेल्या समोरच्या फुलदाणी सोबत खेळत असतो. त्यातील फुल हातात घेत गायत्रीच्या जवळ जाऊन द्यायचा प्रयत्न करायचा. ती घ्यायला गेली फुल की लगेच मागे करत असायचा. ती ही काही त्याला बोलत नव्हती. तिथं बसल्याने ते दोघे कोणाला ही दिसत नव्हते."डॉक्टर, ते श्री. कधी येणार आहेत? बघ कॉल वगैरे करून. मला पण ऐकायचं आहे त्यांच्याकडून मी पुन्हा माझ्या शरीरात जाऊ शकेल का नाही?", टेडी टेबल वर असलेला फोन तिच्या जवळ सरकवत म्हणाला."येणार आहे ...Read More