भाग १३.
आज जसे काम त्या चौघांनी ठरवले होते. तसे ते काम करायला आज तयार झाले होते. हॉस्पिटल मध्ये मात्र युवराजची फॅमिली युवराजला त्याच्या रूम मध्ये नाही पाहून खूपच राग व्यक्त करत असते. शेवटी, एक नर्स त्यांना गायत्रीचा पत्ता देते. तसे त्याच्या घरचे गायत्रीच्या घरी जायला निघत असतात. पण त्या आधीच निखिल तिथं येतो. हॉस्पिटल मध्ये झालेला प्रकार पायलने गायत्रीच्या कानावर टाकला होता. त्यामुळे गायत्री निखिलला हॉस्पिटल मध्ये पाठवते.
"काका, काकी जरा शांत रहा!",निखिल त्यांच्याजवळ येत म्हणाला.
"निखिल, अरे माझ्या युवराजला ती डॉक्टर घेऊन गेली आहे. ते ही न सांगता. तू म्हणतो आहेस, शांत रहा! कस राहू?", युवराजची आई चिडून म्हणाली. खर तर त्या जास्त चिडत नव्हत्या. पण आपल्या मुलाला त्याच्या जागेवर न पाहून त्यांना राग आला होता. त्यात गायत्री त्यांना न सांगता तिथून त्याला घेऊन गेली होती. जे त्यांना आवडले नव्हते.
"काकी, मी समजू शकतो. पण डॉक्टर आता त्याची बायको आहे आणि ती नीट त्याची काळजी घेऊ शकते. तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या घरी मी तुम्हाला घेऊन जातो संध्याकाळी.",निखिल समजावत म्हणाला. बायको शब्द ऐकून दोघे त्याला पाहत राहतात.
"काय? बायको? सुशीला कोण होती मग?", युवराजचे वडील काहीसे चिडून विचारतात.
"तुम्हाला सत्य कळेल. थोडा वेळ धीर धरा! तो पर्यंत तुम्ही घरी जाऊन तयारी करा. आजीला देखील घेऊन या त्या घरी! काका, काकी माझ्यावर विश्वास ठेवा! मी सरांना काही होऊ देणार नाही!",निखिल समजावत म्हणाला. त्याच्या बोलण्यात वेगळाच विश्वास होता. युवराजचे आई वडील एकमेकांना पाहतात.
"ठीक आहे! आम्ही संध्याकाळ पर्यंत वाट पाहू. माझा मुलगा ठीक आहे ना?", युवराजची आई.
"हो. ते ठीक आहेत.",निखिल शांतच उत्तर देतो. युवराजच्या आईवडिलांना तो आपल्यासोबत घेऊन जाऊन त्यांच्या घरी सोडतो आणि तिथून नंतर गायत्री, टेडी सोबत पुढचं काम करायला जातो.
कसा बसा निखिल त्याच्या वकिलाला तयार करून कागदपत्र बनवून घेतो. त्यावर गायत्री मग साईन करते. आधीच युवराजची साईन असल्याने, मोठा असा प्रॉब्लेम झाला नाही! आता ती लिगली त्याची बायको झाली होती. तेच सादर निखिल कंपनीच्या डायरेक्टर मीटिंग मध्ये करतो आणि त्या नंतर मृत्यूपत्र ही युवराजच्या आजोबांचे दाखवतो. ज्यामुळे युवराज ची बायको म्हणून गायत्रीला कारभार सांभाळण्यासाठी पुढे केलं जातं. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी आणि कंपनी वर गायत्रीचा अधिकार आहे असे ही ते लोक तिथं बोलून मोकळे होतात. टेडी उघड्या डोळ्याने सगळ एका चेअर वर बसून पाहत होता. निखिल आणि गायत्रीच त्याला कौतुक वाटत होत. दोघांनी आजच्या दिवसात खूप मोठं काम केलं होत. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरत जाताच काही लोकांना धक्का बसतो. त्यात सुशीला ही असते. जिचे स्वप्न अगदी धुळीत एका दिवसांत गायत्रीने मिटून टाकले होते.
"ती आहे कोण?",सुशीला दात ओठ खात आपल्या बाजूच्या व्यक्तीला विचारते.
"डॉक्टर आहेत त्या.",बाजूला असलेला व्यक्ती उत्तर देतो.
"इथे मी त्या प्रॉपर्टीसाठी एवढी मेहनत घेतली होती. त्या युवराजला स्वतःच्या प्रेमात पाडले होते आणि आता प्रॉपर्टी हातात करून मीटिंग बसवणार होती. तर ही मध्येच कोण कुठली डॉक्टर येऊन माझे स्वप्न भंग केले? हिला जिवंत सोडणार नाही! ती प्रॉपर्टी मी कशीही करून मिळवणार आहेच!",सुशीला रागाने लाल होत बोलत असते.
"अस तुम्ही करू शकत नाही मॅम. कारण गायत्री यांनी तुमच्या पासून त्यांना धोका आहे याची कंप्लेंट केली आहे पोलीस स्टेशनला. एन सी केली आहे. आता त्यासाठी पोलीस तुम्हाला वॉर्न करायला येतील. जर तुम्ही अजून वाईट वागलात तर तुम्हाला अटक ही केली जाऊ शकते. तुमचे देशाच्या बाहेर जाण्याचे स्वप्न कदाचित अपूर्ण राहू शकते. त्यामुळे रागात आपले आयुष्य खराब करू नका. जक्सी सोबत लग्न करून हे सगळ इथच संपवा.",ती व्यक्ती तिला समजावत म्हणाली. खरतर सुशीला आता खूप रागात होती. प्रॉपर्टी हातातून निसटली याचा राग होता. पण जेव्हा तिच्या बाजूला असलेली व्यक्ती तिला समजावते. तेव्हा मात्र ती थोडी घाबरते. या वरून गायत्री कोणी साधी मुलगी नाही आहे. हे तिला कळून जाते. जी आधीच सगळ ओळखून तिचं नाव पोलीस स्टेशनला सांगू शकते? ती अजून काहीही करायला मागे पुढे पाहणार नव्हती. त्यात भर की, गायत्री आता मिसेस युवराज पाटील होती. त्या ओळखीने तर नक्कीच मोठ ही ती तिच्या विरुद्ध करू शकते. या सगळ्याचा विचार करून सुशीलाचा चेहरा बदलतो.
"ती खूप पोहचलेली आहे. तू म्हणत आहेस ते योग्य आहे. मला देशाच्या बाहेर सेटल व्हायचं आहे, तर मी हा विचार सोडून देते. तसेही त्या युवराज पाटील सोबत लग्न करून काहीही सुख मिळणार नव्हते मला. जाऊ दे! मी सोडून देते सगळ.",सुशीला माघार घेत म्हणाली. तिच्या समोर आता पर्याय नव्हता. युवराज पेक्षा कितीतरी मोठी प्रॉपर्टी सध्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याची होती. त्यात कमी की तो बाहेरचा देशातील मुलगा होता. आपण चांगल रॉयल जीवन जगू हा विचार करून ती आनंदी होत असते.
******
रात्री निखिल युवराजच्या आईवडिलांना घेऊन गायत्रीच्या घरी येतो. गायत्री त्या चौघांना हसून घरात घेते. आता पर्यंत न्यूज मध्ये बातमी पसरली होती युवराज आणि त्याच्या बायकोची. त्यात फोटो ही त्या दोघांचे कुठून तरी घेऊन दाखवले जात होते. ते लग्नाचे नव्हते फक्त!
युवराजची आई गायत्रीचे निरीक्षण करत असते. आता पर्यंत ती चांगली वाटत होती त्यांना.
"तुझं आणि त्याच जमले कधी?", युवराजची आई सोफ्यावर बसत सरळ प्रश्न करते. त्यांना ही जाणून घ्यायचं होत. युवराज सुशीला सोबत होता आणि मग ही मध्येच कशी आली होती त्याच्या आयुष्यात?
"ते काकी, आमचं दोघांचे प्रेम होते म्हणून आम्ही लग्न केलं. युवराज यांची अशी अवस्था असताना त्यांना माझी गरज आहे असे वाटले. मी डॉक्टर आहे आणि त्यांची पत्नी ही आता आहे. तर या दोन्ही नात्यांनी मी त्यांची काळजी घेऊ शकेन!",गायत्री अगदी शांत राहून उत्तर देते.
"मग तू साखरपुडा झाला त्यावेळी का नाही आली?", युवराजचे वडील विचारतात. त्या क्षणी ती समोरच्या बाजूला निखिल सोबत बसलेल्या टेडीला पाहते.
"त्यांना त्या क्षणी सुशीला आवडत होती मी नाही आवडत होती. हा आवडत ही असेल, पण त्यांना समजत नव्हत.",गायत्री सुचत ते बोलत होती. टेडी आणि निखिल तिला पाहत असतात.
"हे काय आवडत होती नाही आवडत होती? तू दिसायला सुंदर आहेस. जॉब चांगला आहे. संस्कार ही चांगले आहे तुझे! पण तरीही युवराज ने कधी तुझ्याबद्दल सांगितले नव्हते. त्यामुळे विश्वास ठेवणे योग्य वाटत नाही. त्याची संपत्ती पाहून त्याला अडकवायचे प्रयत्न तर करत नाही आहेस ना? ते सोड तुझ्या घरचे कुठे आहेत? ते काय करतात?", युवराज ची आजी जी एवढ्या वेळ सगळ तिचे ऐकून घेत होती. ती आता बोलू लागते. आता मात्र गायत्रीला काय बोलायचे? हे समजत नाही! मदत करायला गेली आणि त्यात ती आता स्वतः फसत चालली होती, असे वाटत होते. आजी जास्त स्ट्रीक वाटत होती सध्या त्याला. आता आजीच्या प्रश्नाने युवराजचे आईवडील शांत राहतात.
"मला आईवडील नाही आहेत. मला एक बहिण आहे. ती ही अंतरा आहे. कॉलेज सुरू आहे तिचे. त्यासोबत आर्मी परीक्षेचा अभ्यास चालू आहे. वडील आम्हाला सोडून गेले त्यावेळी मी बारा तेरा वर्षांची होती. त्यांना मी डॉक्टर व्हावे, असे वाटत होते. पण अचानक त्यांचा हात माझ्या डोक्यावरून गेला तेव्हा डॉक्टर हे स्वप्न स्वप्नच राहते असे वाटत होते. वडील होते तो पर्यंत सगळे नातेवाईक आम्हाला चांगले होते. जेव्हा ते गेले तसे नातेवाईक दूर गेले. यायचे ते प्रॉपर्टीसाठी. काका, काकी माझे होते. आले होते सांभाळायला. पण ते ही आमच्या घरासाठी आणि आईच्या दागिण्यासाठी खोटं हसू ठेवत दिखावा करत होते. हे मला समजल तेव्हा मी माझ्या अंतराला स्वतः एकटी सांभाळू शकते असे सांगितले. तेव्हा पासून मी माझ्या अंतराला सांभाळत आहे. आजूबाजूचे शेजारचे लोक आम्हाला चांगले होते. त्यांच्या मुळे आज मी डॉक्टर बनली आहे आणि हे जे काही पाहत आहात ते उभ केलं आहे. अजून अपेक्षा माझी काहीच नाही आहे. लोकांनी कमावलेलं तर मला बळकवायला आवडत नाही! मी जाणते मेहनत काय असते ते? एवढं माझ्याकडे आहे त्यात मी समाधानी आहे. अजून काहीच नको वाटत मला. ",गायत्री अगदी खर खर त्यांच्यासमोर मांडून मोकळी होते.
सोप्प नव्हते तिच्या वेळी सगळ काही. स्ट्रगल केला होता तिने. त्या नंतर वर आली होती. याच काळात कोणी नातेवाईक आले नव्हते सोबत तिच्या. शेजारील लोक तिला चांगल करत होते. हा प्रवास तिचा ऐकून टेडीला वाईट वाटते. इतके घडून ही त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू होत!
"आम्हाला खानदानी मुलगी हवी होती. तू जगासाठी त्याची बायको असली तरीही आमच्यासाठी तू त्याची बायको नाहीस! जेव्हा युवराज शुध्दीवर येईल तेव्हाच सगळ जाणून आम्ही निर्णय घेऊ!",आजी तिला खालून वरून न्याहाळत म्हणाली. मन मानत नव्हते त्यांचे तिला युवराजची पत्नी मानून घ्यायला. त्यासाठी ते तयार होत नाही. तरीही गायत्री त्यांना काहीच उलट उत्तर न देता हसून फक्त मान हलवते. टेडी आणि निखिलला मात्र वाईट वाटते तिचे. समोर असलेली गायत्री शुद्ध आणि खरी होती. तरीही विश्वास तिच्यावर बसत नव्हता. सुशीला सारख्या मुलीवर मात्र तिचे आई वडील आहेत, त्यात ती कितीही खोटं बोलत होती तरीही तिच्यावर विश्वास ठेवून मोकळे झाले होते. हेच आठवून टेडीला त्याचे आणि घरच्या लोकांचे नवल वाटत असते.
क्रमशः
******