बोलका वृद्धाश्रम

(0)
  • 81
  • 0
  • 363

या पुस्तकाविषयी मी सध्या वृद्धाश्रम नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी लिहिण्याचा हेतू म्हणजे ती तरुणमंडळी आहेत की जी शिकतात. उच्च शिक्षण घेतात. मोठमोठ्या पदावर जातात. लोकांना ज्ञान वाटत फिरतात. वृद्धाश्रमावर व वृद्ध अवस्थेवर मोठमोठी भाषणं ठोकतात. परंतु त्यांच्या घरात थोडंसं झाकून पाहिलं तर त्यांचे आईवडील हे वृद्धाश्रमात असतात. एक असाच प्रसंग. मी वृद्धाश्रमाविषयी लिहिलं व तो लेख एका ग्रुपवर पोष्ट केला. ज्यात मोठमोठे अधिकारी होते. त्यातील एका अधिकाऱ्यानं बहुतेक ती पोष्ट वाचली असेल. त्यानुसार त्यानं प्रतिक्रिया दिली. म्हटलं की अशी पोष्ट इथं टाकू नका. त्यानंतर त्यानं तशी प्रतिक्रिया का दिली. हे पडताळून पाहात असतांना कळलं की त्यानं आपले आईवडील वृद्धाश्रमात टाकलेले आहेत.

1

बोलका वृद्धाश्रम - 1

१बोलका वृद्धाश्रम कादंबरी या पुस्तकाविषयी मी सध्या वृद्धाश्रम नावाची कादंबरी लिहिलेली ही कादंबरी लिहिण्याचा हेतू म्हणजे ती तरुणमंडळी आहेत की जी शिकतात. उच्च शिक्षण घेतात. मोठमोठ्या पदावर जातात. लोकांना ज्ञान वाटत फिरतात. वृद्धाश्रमावर व वृद्ध अवस्थेवर मोठमोठी भाषणं ठोकतात. परंतु त्यांच्या घरात थोडंसं झाकून पाहिलं तर त्यांचे आईवडील हे वृद्धाश्रमात असतात. एक असाच प्रसंग. मी वृद्धाश्रमाविषयी लिहिलं व तो लेख एका ग्रुपवर पोष्ट केला. ज्यात मोठमोठे अधिकारी होते. त्यातील एका अधिकाऱ्यानं बहुतेक ती पोष्ट वाचली असेल. त्यानुसार त्यानं प्रतिक्रिया दिली. म्हटलं की अशी पोष्ट इथं टाकू नका. त्यानंतर त्यानं तशी प्रतिक्रिया ...Read More

2

बोलका वृद्धाश्रम - 2

२ आज काळ बदलला आहे व काळानुसार आपल्याला अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकाचा वाटत आहे. तसं पाहिल्यास अमेरिकेचा जन्म मुळात अर्वाचीन काळातील. तेथील संस्कृतीही अर्वाचीन काळातील. त्यातच त्या देशाचा शोध मॅगेलॉन व कोलंबस यांनी लावला. तोही अलिकडील काळातच. तरीही आपण त्या देशाचा आदर्श घेतो. त्याची संस्कृती महान समजतो. त्यांच्या संस्कृतीनुसार वागतो. त्यातच आपले कपडे, आपलं रहनसहन बदलवीत असतो. हे जरी खरं असलं तरी आपली भारतीय संस्कृती ही काही कोणत्याही बाबतीत कमी नाही. ती इतर देशांपेक्षा महान आहे आणि बरंच काही आपल्याला शिकविणारीही आहे. ...Read More