************************************
८
ते दोन वर्ष स्वानंदचे बरेच वियोगात गेले होते. स्नेहल स्वानंदची पत्नी बनली असली तरी ती त्याच्या घरी नव्हती. तिला त्याचे घरात राहताच येत नव्हते. शिवाय त्यांना आपला विवाहही जगजाहिर करता येत नव्हता. विवाह झाला असला तरी ते एकमेकांना आलिंगन देवू शकत नव्हते.
स्वानंदनं स्नेहलशी विवाह केला असला तरी त्यात त्याला काही प्रश्न पडले होते. पहिला प्रश्न पडला होता, तिच्यासोबत न राहण्याचा. ज्याय कधीकधी आठवडाभर त्यांची मुलाखत व्हायची नाही. कधीकधी महिनाही निघून जायचा. उन्हाळ्यात तर तो दोन दोन महिने तिला भेटू शकत नव्हता. कारण शाळेला सुट्ट्या असायच्या व फोनची सोय नसल्यानं फोनही करता येत नसे. शिवाय तिच्या घरी जातो म्हटल्यास तिच्या वडिलांच्या धाकानं तिच्या घरी जाण्याची वेळ यायची नाही. कदाचित वाटायचं की तिचे वडील घरी असतील.
त्याचं ते वागणं. तिच्याशी जास्त न बोलणं. तिच्याशी जास्त संपर्क न ठेवणं. जेणेकरुन तिच्या वडिलांना त्याची जाणीव होवू नये व विवाह तुटेल. तसाच दुसरा प्रश्न होता, पैसे गोळा करणं, ज्यात त्याला शेती घ्यायची होती. तसाच तिसरा प्रश्न होता, तो म्हणजे तिचीही नोकरी कायम करणं. त्यानं पहिला प्रश्न सोडवला होता, जो त्याच्या हातात होता. त्यानं तिच्याशी विवाह केला असला तरी तो तिच्याशी जास्त बोलत नसे. जास्त संपर्कही ठेवत नसे. जेणेकरुन कोणाला कल्पना येईल की ती त्याचेसोबत लटकून आहे. तसं पाहिल्यास त्यांचं वागणं पाहून कोणताच व्यक्ती त्यांचेवर ताशेरे ओढू शकत नव्हता. मात्र हे दिवस त्या दोघांनाही सहन होत नव्हते. कारण खायला दातही होते आणि पुढ्यात चणेही होते. परंतु खाता येत नव्हतं.
गांधर्व विवाह केल्यानंतर स्नेहलला घरी करमत नव्हतं. वाटत होतं, त्याच्या कुशीत झोपावं, त्याला गुदगुल्या कराव्या. परंतु ते तिचे स्वप्नच असायचे. ते स्वप्न तुटायचे. तसं पाहिल्यास एक एक दिवस स्नेहलला कठीण जायचा. वाटायचं, केव्हा केव्हा दोन वर्ष संपतात अन् केव्हा केव्हा नाही. तो दुरावा आज सहन होत नव्हता स्नेहलला. तसा दिवस कसाही कटून जायचा. परंतु रात्र मात्र कटायची नाही. सारखं अंथरुणावर पहुडल्यास रात्रीची आठवण यायची. जी आठवण तिला सुखानं झोप घेवू देत नव्हती.
स्नेहलला रात्रीला झोप येत नव्हती. तशीच अवस्था स्वानंदचीही होती. त्यालाही रात्रीला झोप येत नव्हती. सारखी तिचीच आठवण यायची त्याला. परंतु मजबुरी होती. त्याला ते सहन करावंच लागत होतं.
स्वानंदसमोर जसा स्नेहल मिलनाचा प्रश्न होता. तसाच प्रश्न होता, तिची नोकरी पक्की करण्याचा. ज्यात तो स्वतः संस्थाचालकाशी बोलू शकत नव्हता आणि तिला बोल म्हटल्यास तिचीही हिंमत होत नव्हती. काय करावं सूचत नव्हतं. तसा तोही प्रश्न त्यालाच सोडवायचा होता. कारण त्यालाच तिच्याच नोकरीवर कर्ज काढून आलेल्या त्या पैशात शेती विकत घ्यायची होती.
दिवसामागून दिवस जात होते. तसा तो दिवस उजळत नव्हता की तो आपल्या संस्थेतील संस्थाचालकाला तिच्याबद्दल विचारेल. तसं पाहिल्यास त्यानं जर संस्थाचालकाला तिच्याबद्दल विचारल्यास व संस्थाचालकानं प्रतिप्रश्न केल्यास त्याला विचार येत होता. तशी हिंमत होत नव्हती. परंतु त्यानं मनाशी हिंमत बांधली व एक तो संधी शोधू लागला. कारण विचारणं तर भाग होतं. तशी एक दिवस संधी चालून येताच त्यानं हिंमत केली व तो त्यांना म्हणाला,
"सर, मला एक प्रश्न आपणाला विचारायचाय."
"बोला, काय विचारायचंय?"
"आपण स्नेहलला केव्हा परमनंट करणार?"
स्वानंदनं विचारलेला संस्थाचालकाला प्रश्न. त्यावर संस्थाचालकालाही आश्चर्य वाटलं व ते म्हणाले,
"अहो, आपणाला तिच्याबद्दलचा प्रश्न का पडला?"
"सर, आपणालाही माहित आहे, स्नेहलची परिस्थिती. शिवाय ती बरेच दिवस आपल्या संस्थेत काम करीत आहे. दिवसेंदिवस तिची परिस्थिती खंगावते आहे. तिची परिस्थिती सर्वांना माहितच आहे. तिची परिस्थिती आठवली की दया येते. म्हणूनच विचारलं. आपणाला कल्पना नाही का त्याची?"
"हो, सर, मलाही त्याची कल्पना आहे. परंतु शासन काही चांगल्या पद्धतीनं चालत नाही. त्याचं काय?"
"म्हणजे सर, मी समजलो नाही."
"शासन इमानदारीनं चालत नाही. पैसे मागतात अप्रुअल काढायचे. ते कुठून आणायचे?"
थोड्या वेळाचा अवकाश. स्वानंद विचार करु लागला. त्यानं त्यावर दाखवलं की तो विचार करीत आहे. तोच तो थोड्या वेळानं म्हणाला,
"मी तिला मदत केली तर......"
"कशाची?"
"मी पैसे दिले तर....."
"अहो, वेडे झालात की काय? "
"म्हणजे?
"शिक्षण विभागात पैसे काही हजाराच्या आकड्यानं चालत नाहीत. लाखोच्या आकड्यानं चालतात. तुम्ही देणार काय लाखो रुपये आणि तेही तिच्यासाठी."
"का नाही? आपण सांगा रक्कम. मी नक्कीच प्रयत्न करेल. परंतु हं, हे तिला माहित होता कामा नये."
"सर, स्वप्नात वैगेरे राहू नका. या बोलायच्या गोष्टी आहेत आणि कोणी कोणाला मदत करुच नये. माणसं स्वार्थी असतात. कामापुरता मामा ठेवतात. काम झालं की बस, ते सगळं विसरतात. राहिला तुमच्या पैशाचा प्रश्न. तेही ती परत करणार नाही आपल्याला. म्हणूनच सांगतोय की आपण हा पैशाचा तरी विचित्र नाद सोडून द्या."
संस्थाचालक स्वानंदला बोलून गेले. परंतु ते काही स्वानंद ऐकू शकत नव्हता. कारण त्यानं जरी आपला गांधर्व विवाह उजागर केला नसला तरी स्नेहल आज त्याची पत्नी होती व तो आता तिच्यासाठी काहीही करु शकत होता.
ते संस्थाचालकाचं बोलणं. त्यावर स्वानंदनं लक्ष न देता त्यानं जिद्दच लावली होती संस्थाचालकासमोर, एखाद्या लहान लेकरागत. शेवटी संस्थाचालकानं त्याच्या हो मध्ये हो मिळवलं आणि लागलीच स्वानंदनं त्यांना पैसे दिले व त्या पैशाच्या देवाणघेवाणीत स्नेहलला सरकारी मान्यता मिळाली.
आज स्नेहलला सरकारी मान्यता मिळालेली होती. तिलाही सरकारी वेतन सुरु झालं होतं. तसा स्वानंदही खुशच होता. प्रसंगी स्नेहलचं काम संस्थाचालकानं काळ्या स्वरुपात काम करुन केलं होतं.
ती काळी कामं. तशी कामं नेहमीच होत असत शिक्षण विभागात. स्नेहलचं कामही काळ्याच स्वरुपातील. तेही काम असंच केल्या गेलं होतं. ज्यावेळेस शिक्षक भर्ती बंद होत्या. ज्यात स्नेहलचा काहीही दोष नव्हता. ना ही दोष संस्थाचालकाचा होता. ना ही दोष स्वानंदचा होता. परंतु शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्यानं तिची ती सरकारी मान्यता एक फ्राड तत्वावर झालेली होती.
स्नेहलला सरकारी मान्यता मिळालेली होती व स्नेहलला वेतनही सुरु झालं होतं. ज्यात पुढे जावून स्वानंदनं तिला कर्जाची फाईल टाकायला लावली व त्यातून त्यानं कर्ज उचललं. त्यानंतर त्यानं आपल्याही खात्यातून कर्ज उचललं. तशी रक्कम गोळा केली.
आज स्वानंदजवळ भरपूर रक्कम गोळा झाली होती. ज्या पैशात बाहेरच्या मागासलेल्ता भागात दोन एकरची पुरेशी शेती आरामात मिळू शकत होती. तसं पाहिल्यास चांगल्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगतही शेती होती. परंतु त्या शेतीचे भाव तगडे होते. शेवटी स्वानंदनं दोन एकरचा भाव ज्या ठिकाणी पटेल. अशा ठिकाणी दलालांमार्फत शेती पाहिली. भावटाव केला व ती विकत घेतली. त्यानंतर त्याची रजिस्ट्री केली व ते कागद घेवून तो स्नेहलच्या वडिलांकडे आला.
ती सर्व प्रक्रिया. ती प्रक्रिया करता करता दोन वर्ष झाले होते. स्नेहलची नोकरी सरकारी झाली होती. हे तिलाही माहित झाले होते. परंतु ती सरकारी कशी झाली? त्या गोष्टीसाठी स्वानंदनं काय काय केलं. हे काही तिला माहित पडलं नव्हतं. ते त्यानं तिला सांगीतलंही नव्हतं. तसं पाहिल्यास जेव्हा स्वानंद तिच्या वडिलांकडे आला. त्यानं आपल्या जवळची रजिस्ट्री दाखवली व आठवण करुन दिली की दोन वर्षापुर्वी त्यांनी त्याचेशी विवाहाचा करार केला होता. म्हटलं होतं की जर तो दोन एकर शेती घेईल, तेव्हा ते स्नेहलचा हात त्यांच्या हातात देतील. त्यामुळंच त्यानं प्रयत्न करुन शेती विकत घेतली होती. ज्यात स्नेहलनंही कर्ज काढून त्याला पैसे दिले होते. परंतु त्याचेसोबत घडलं उलटच. ज्या स्नेहलनं त्याचेसोबत गांधर्व विवाह केलेला होता. ती आज घरात नव्हती, तर तिनं आपली नोकरी पक्की होताच कोण्या एका व्यक्तीशी विवाह केला होता, नव्हे तर ती आपला स्वार्थ पाहात रफूचक्कर झाली होती. तसं पाहिल्यास तो विवाह तिनं ना शाळेत कोणाला सांगीतला होता. ना तिनं स्वानंदला किंचीतही भनक लागू दिली होती.