६
केशरला आठवत होतं त्याचं बालपण. त्याचं बालपण हे कोकणात गेलं होतं. त्या कोकणात त्याचं बालपण डौलानं लाजत असे. ज्या कोकणात नारळाची, पोपळीची व सुपारीची झाडं होती. आजुबाजूला कलिंगड व चिकूचीही झाडं होती. त्यातच सेब आणि हापूस आंब्याचीही झाडं होती. ती झाडं हिरवीगार होती व ती झाडं केशरशी बोलायची. म्हणायची की तू आमच्यासोबत खेळ, बागड.
केशरचा जन्म हा खेड्यातीलच होता. शिवाय तेथील वातावरण थंड आणि रमणीय होतं. त्यातच तेथील आल्हाददायक वातावरण मनाला अगदी भावनारं होतं. त्या वातावरणात कधीच कंटाळा येत नसे. तसा केशरचा बालपणीचा काळ सुखाचाच होता.
केशर ज्या गावात राहायचा. त्या गावाला लागूनच समुद्र होता. ज्या समुद्रात मोठमोठे मासे असायचे. त्या मासोळ्यांचं दर्शन दररोज व्हायचं. त्यातच पर्यटक रोजच समुद्र पाहायला यायचे. ज्यावेळेस पर्यटक समुद्र पाहायला यायचे. त्यावेळेस केशरला फार मजा येत असे. शिवाय देश विदेशातून आलेल्या मंडळींशी तासन् तास बोलण्यात केशरचा वेळ कसा निघून जायचा हे त्याला कळायचंही नाही.
केशर दिवसभर शाळेत जायचा. सायंकाळी जेव्हा शाळा सुटायची. तेव्हा तो पर्यटकासोबत खेळायचा. त्यांना माहिती द्यायचा. त्यातच त्याच्या त्या माहिती देण्यात त्याला चारदोन रुपये मिळायचे. ज्यातून त्याला खाऊ खायला मिळत असे. परंतु तो त्या पैशानं खाऊ घ्यायचा नाही. त्या पैशानं तो वह्या, पेन, पेन्सिली घ्यायचा.
केशरच्या गावाला लागूनच असलेला समुद्र किनारा. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरुन चालतांना फार मजा वाटायची. सकाळी सकाळी त्या समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूवरुन फिरतांना त्या समुद्रातील गार वाळू मनाला तरलता प्रदान करीत होती.
ते कोकणातील दिवस. अतिशय रमणीय वाटणारे ते दिवस. त्या रमणीय वातावरणात वावरतांना त्याला काय माहीत होते की आपण उद्या मोठे होवून शहरातील एखाद्या शैक्षणिक संस्थेत लागणार आहोत की ज्या शाळेत आपणाला त्रास होणार नाही.
केशर शिकला. त्यानं उच्च शिक्षण घेतलं. अध्यापक पदाचा अभ्यासक्रम शिकला व तो शहरात नोकरीवर लागला होता. जिथं त्याला दुर्दैवी त्रास होत होता.
केशरला आज संस्थालकानं कारणे दाखवा नोटीस देवून त्याच्या भावनेला चिथावलं होतं नव्हे तर त्याचं शाळेतूनही निलंबन केलं होतं.
केशरचं शाळेतील सेवेतून झालेलं निलंबन. केशर फारच भावनाविवश झाला होता. तसं त्याचं मन विचारच करीत होतं की मी एवढा शाळेत चांगला वागलेला असतांनाही ज्या शाळेनं मला विनाकारण निलंबित केलं. आता आपण चांगलं वागायचंच नाही. आपण समाजासाठी जे काही चांगलं कार्य करीत होतो. ते करायचंच नाही. आपण आता आंदोलनं करायचीच. संप करायचेच. आंदोलनात सहभागी व्हायचं. संपात सहभागी व्हायचं. ज्यातून लोकांचं नुकसान झालं तरी चालेल.
केशरचा तो विचार. तसा विचार करताच तो आता सक्रियतेनं कोणत्याही आंदोलनात सक्रिय सहभाग घेवू लागला होता. त्यातच आता शहरात दंगा उसळला होता. त्या दंग्याचा फायदा घेण्याचा त्यानं विचार केला. तशी त्यानं त्याआधी बरीच पुस्तकं वाचली होती. ज्यात औरंगजेब, हिटलर व मुसोलिनीही होता. आता त्याला ते तिघंही आवडू लागले होते. तसेच त्यांचे विचारही आवडू लागले होते.
ती औरंगजेबाची समाधी. समाधी उठविण्यावर वाद निर्माण झाला होता. कोणी म्हणत होते की औरंगजेब बादशाहा क्रुरकर्मा होता. त्याच्या समाधीचं जतन करु नये. त्याची तुलना प्रत्यक्ष रावण व कंसाशी करीत होते. म्हणत होते की जगात राम व क्रिष्णाचे पुतळे आहेत. ते पुतणे प्रत्यक्ष मुर्तीच्या रुपात पुजले जातात. परंतु रावण, कुंभकर्ण व कंसाचे पुतळे नाहीत व ते प्रत्यक्ष मुर्ती रुपातही पुजले जात नाहीत. त्याचं कारण आहे त्यांचा क्रुरपणा. त्यांच्यापासून भावी संस्कृतीला काही बोध द्यायचा नसतोच. म्हणत होते की रावण आदर्श होता. त्याच्यात आदर्शवादी बरेच गुण होते. परंतु ते जरी खरे असले तरी रावणानं रामाची पत्नी जबरदस्तीनं नेणं म्हणजे वाईट कृती होती. म्हणूनच तो पुजनीय होवू शकत नाही. शिवाय रावण जरी उच्च विद्याविभूषित असला तरी त्याचं सामान्य लोकांना त्रास देणं. ही कृतीही अशोभणीय कृती होती. म्हणूनच तो पुजनीय होवू शकत नाही. तेच दिसून येत होतं कुंभकर्णात. कुंभकर्णाचा दोष नव्हताच. परंतु चोराला मदत करणाराही चोरच ठरतो. तसा कुंभकर्णही दोषी ठरला. यापेक्षा वेगळं कंसाबद्दल सांगणं नको. कंसाच्याही बाबतीत लोकं हाच विचार करत की त्यानं सामान्य लोकांना बराच त्रास दिला. तसाच खुद्द आपल्या बहिणीला तुरुंगात टाकून त्यांचा अनन्वीत छळ केला नव्हे तर आपल्या भाच्यांची हत्या केली. त्यामुळंच तोही क्रुरकर्माच. याप्रमाणेच जगात जेही कोणी क्रुरकर्मा झाले. त्यांची पुजाअर्चना होत नाही. पुजा होते चांगल्या लोकांनी. त्यामुळंच लोकं म्हणत की औरंगजेब वाईट होता. त्यामुळंच त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा नकोच. हाच विचार धरुन एक गट औरंगजेबाची समाधी हटविण्याच्या बाजूने उभा होता तर दुसरा गट याउलट विचारांचा होता. त्या गटाचं म्हणणं होतं की जर ती समाधी अस्तित्वात ठेवली तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा पराक्रम आपल्या भावी पिढ्यांना दाखवता येईल. त्यांच्या मनात व रोमात आपल्या महाराष्ट्रातील मराठे विरांचा अभिमान पेरता येईल व म्हणता येईल की आमचे महाराष्ट्रातील मराठे बलाढ्य असलेल्या औरंगजेबासमोर झुकले नाहीत. ज्यातून मराठ्यांचे शौर्य उजळून निघालेले असेल.
दोन्हीही वादाचे मुद्दे. त्याच मुद्द्यावरुन राजकारण तापत गेलं. हिंदू मुस्लीम आजपर्यंत जरी एकमेकांना भाऊ भाऊ मानत असले तरी त्यात प्रत्यक्ष ठिणगी पडली व आंदोलन सुरु झालं.
आंदोलनाची भरपूर आवड असलेला केशर. तो उच्चशिक्षित होता. परंतु तो शाळेतून निलंबित झाल्यानं त्याचं डोकं चालतच नव्हतं. तो विचार करीत नव्हता. त्यानं वाईट वागायचंच ठरवलं होतं. त्याच्यातील चांगल्या विचारांची हत्या झाल्यामुळे. अशातच त्या आंदोलनात त्यानं भाग घेतला व आपलं नुकसान करुन घेतलं होतं.