Danga - 7 in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | दंगा - भाग 7

Featured Books
Categories
Share

दंगा - भाग 7


         केशर गरीब होता, जेव्हा तो गावाकडे राहात होता. त्याच्या वडीलांची दोन एकर शेती होती. तिही कोरडवाहू होती. कोकणात पाऊस भरपूर यायचा. परंतु डोंगरउतारावरुन पाणी पुर्णतः उतरुन जायचं. त्यामुळं भातशेती व्हायची नाही. तसं पाहिल्यास शेतात नारळाची झाडं होती. त्याही झाडाला जास्त नारळ येत नसत. त्याचं कारण असायचं पाणी. नारळाच्याही झाडाला पाणी जास्तच लागायचं. 
         शेतीला पूरक असा जोडधंदा नव्हताच केशरच्या वडीलाच्या घरी. त्यामुळंच विश्वकोटीचं दारिद्र्य अनुभवत होता केशरचा परीवार. शिवाय घरात खाणारीही तोंड जास्तच. अशातच केशर शिकला व लहानाचा मोठा झाला होता. 
         केशर हा मुस्लिम होता. त्याचं नाव केशर खान होतं. त्याला आपला धर्म आवडायचा. तसा त्याला हिंदू धर्मही आवडायचा. परंतु हिंदू धर्म तेवढ्या प्रमाणात आवडत नव्हता. तसा तो रोजच नित्यनेमानं न चुकता जवळच्या मशिदीत नमाज पडायला जायचा. या मशिदीत कधीकधी त्याला काजीकडून धर्माबद्दलची शिकवण शिकायला मिळायची. काजी म्हणायचा की आपला धर्म चांगला आहे. आपल्या धर्मातील औरंगजेबाने पुर्ण भारतवर्षात राज्य केलं होतं. आपल्यासाठी औरंगजेब आदर्श आहे. त्यांनी मराठ्यांना वेळोवेळी धुळ चारली. त्यांना सळो की पळो करुन सोडलं. 
         काजीचं ते बोलणं. ते बोलणं केशर काळजीपूर्वक ऐकायचा. त्याला औरंगजेब आदर्श वाटायचा. त्याला आत्मीयता वाटायची औरंगजेबाबद्दल. 
         ते संस्कार. तेच संस्कार बालपणापासून रुजले होते केशरमध्ये. संस्काराचं खतपाणी शालेय जीवनापासून रुजल्यानं त्याच्या मनात धर्माबद्दलचा अभिमान कुटकूट भरला होता. ज्यातून त्याच्या पुढील जीवनाला महत्व आलं होतं. 
          आज काही हिंदू लोकं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको असं म्हणत होते तर मुस्लिम लोकं त्या कबरीला आदर्श मानून ती कबर तेथेच असावी असे म्हणत होते. त्यातच त्यासंबंधीची जाहिरात ही रोजच नमाज पठनाचे वेळेस केली जायची. ज्यातून एक मुस्लिमांची परिषद भरली. त्यात ठरवलं गेलं. आपण आंदोलन करायचं. पोलीसस्टेशनला घेराव घालायचा. आपलं मांडणं मांडायचं. म्हणायचं की औरंगजेबाची कबर हटूच नये. ती आमची ऐतिहासिक धरोहर आहे.
           ती त्यांची मानसिकता. त्यातच त्यांचा तो निश्चय. त्या निश्चयाचा महामेरु बनायला वेळ लागला नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. बोलणी सुरु झाली. काही लोकं संयमानं बोलू लागले. काही मात्र जोरजोरात बोलायला लागले. 
         सायंकाळ होत आली होती. आंदोलन तीव्र होत आलं होतं. परंतु पोलीस काय करणार होते. ते तर काहीच बोलत नव्हते. शेवटी अंधार पडू लागला. अशातच आंदोलनातील एकदोन लोकांनी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. त्यांनी महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ज्यातून आंदोलनाला गालबोट लागलं. 
          तो महिला पोलिसांचा विनयभंग. तसा तो करण्याचा प्रयत्न. त्यानंतर आंदोलन चिरडण्यात आलं. पोलिसांनी अश्रूधूराचे गोळे सोडले. लाठीमार केला. ज्यातून जमाव पांगला आणि आंदोलनकारी आपल्या आपल्या घरी रवाना झाले. 
          ती रात्र तशीच निघून गेली होती. त्यातच दुसरा दिवस उजळला. दुसर्‍या दिवशी त्या शहरातील वर्तमानपत्रांनी तशा आशयाच्या बातम्या आपल्या आपल्या वर्तमानपत्रात छापून आणल्या. प्रकरण लोकांनी वाचलं. काहींनी त्या वार्ता मिडीयामार्फत पसरवल्या. काहींनी तोंडी बयाण केले. ज्यातून आंदोलनांचा अग्नी क्षमला नाही. तो वाढतच गेला.
            तो दुसरा दिवस. त्यातच पोलीस स्टेशनला घेराव देवून मुस्लिम समुदायानं ठिणगी पाडली होती. ज्यात केशरही सहभागी होता. तो कॅमेर्‍यातही आला होता. त्याच ठिणगीवर प्रतिउत्तर देण्याचं काही हिंदू संघटनांनी ठरवलं. मग काय, त्यांनी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला. त्यावर पेट्रोल टाकलं व तो पुतळा जाळून टाकला. 
          ती मुस्लिम समुदायांच्या कृतीला थेट उत्तर देणारी हिंदू धर्मियांची कृती. मुस्लिमांना वाटलं की त्या कृतीनं त्यांच्या धर्माचा अनादर झालेला आहे नव्हे तर अनादर होत आहे. तीच गोष्ट लक्षात घेवून उत्तरावर प्रतिउत्तर देणं सुरु झालं. दोन्ही समुदायांकडून आंदोलनाच्या ठिणग्या पडल्या होत्या. आता दोन्ही समुदाय रस्त्यावर उतरले होते. जे आंदोलनातील प्रमुख नेते होते. ते बाजूला निघून गेले होते. ते चूप बसले होते. मात्र सामान्य जनताच आंदोलनात सहभागी होती. तीच आंदोलन करीत होती. तीच गाड्यांच्या काचा फोडत होती. तीच मंडळी ही सरकारी मालमत्तेची नासधूस करीत होती. 
         जमाव पांगत नव्हता. तसे पोलीसही चिडले होतेच. ते पाहून काही नेते सांत्वना देत होते. काही नेते भडकावून भाषण देत होते. काही धिराच्या गोष्टी सांगत होते. मात्र अश्रुधूर व लाठीमारानं जमाव काहीसा निवळला. ज्या भागात आंदोलन झालं. त्या भागात कर्फ्यू लागला. लोकांच्या संचारबंदीला अडथडा लावण्यात आला. एकंदरीत सांगायचं झाल्यास जमाव करणे व सामुहिक संचार करणे याला बंदी घालण्यात आली होती.