१०
संभाजी महाराज अर्थात संभूराजे....... छावा चित्रपट आला होता. तेव्हापासून संभाजी महाराजांचा उदोउदो सुरु होता. त्यापुर्वीही संभाजी महाराजांचा जयजयकार होतच होता. कारण त्यांचं कार्य महान होतं.
संभाजी महाराज हे असं व्यक्तीमत्व आहे की ज्यांनी धर्मासाठी आपली जीभ, नखे व शरीर अवयव कापू दिलेत. आपली मान कापू दिली. प्रसंगी अनन्वीत यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलवला नाही. ते चाळीस दिवस. रोजच बहाद्दर गडावरुन संभाजी महाराजांच्या किंकाळ्या ऐकायला येत. तो स्तंभही हादरुन गेला होता संभाजी महाराजांच्या किंकाळ्यांनी. जेव्हा एक एक अवयव संभाजी महाराजांच्या शरीराचा कापला जात होता. परंतु संभाजी महाराज काही डगमगले नाहीत. ते धैर्यानं समोर जात राहिले. त्या चाळीस दिवसातील रोजचा दिवस त्यांच्यासाठी नवीनच उजळत होता. वाटत असे की हा दिवस आपला अखेरचा ठरेल. परंतु एक अवयव कापला जावून तो दिवस आल्यापावली निघून जात होता.
आज इंद्रायणी मात्र दुःखी होती. कारण तीच एक साक्षीदार होती त्या प्रसंगाची. तिनं संभाजी महाराजांचे छातीवर घाव झेलणं पाहिलं होतं. त्यांचा एक एक अवयव कापला जात असलेला अनुभवला होता. अन् आज अचानक मांसाचे तुकडे. तेही तिच्याच लेकराचे. ज्या इंद्रायणीनं आपल्या कुशीत बसवून संभूराजाला खेळवलं होतं. त्याच संभूराजाच्या देहाचे तुकडे पाहून इंद्रायणी रडत होती. आजही ती रडत होती, एवढे वर्ष संभूराजाच्या जाण्याला झाले असले तरी आणि लोकांना कीव येते त्या समाधीची. जी समाधी पुराणतत्व विभागाच्या सर्व्हेत समाविष्ट नाही. का येथील तत्कालीन बाहुबलांना समजले नाही का संभूराजांचे याच महाराष्ट्रातील भुमीत झालेले हाल. का येथील तत्कालीन राजकारण्यांना समजला नाही का संभूराजांचा रक्तरंजीत इतिहास. ज्या क्रुरकर्मा असलेल्या औरंगजेबानं संभाजी महाराजांचे अनन्वीत हाल करुन मारले. काय गुन्हा होता त्यांचा. मुस्लिम धर्मच न स्विकारणे. अन् ते स्विकारणार तरी कसे? जरा विचार करुन पाहावे की औरंगजेबाला जर म्हटलं असतं की त्यांनी हिंदू धर्म स्विकारा तर त्यानं स्विकारला असता का धर्म? त्याचं उत्तर नाही असंच येईल.
विशेष सांगायचं झाल्यास आज जो काही हिंदू धर्म शिल्लक आहे ना. तो संभाजी महाराजांसारख्याच विभुतीमुळे की ज्यांनी मरणाला मिठी मारली. परंतु आपला धर्म बदलवला नाही. ते होणारे हाल हाल शोषले. परंतु परधर्माला मिठी मारली नाही. खरं तर संभूराजे महानच. जेव्हा संभूराजांची मान छाटली गेली असेल. तेव्हा तो औरंगजेब बादशाहा शत्रू असूनही रडला असेल असं हे बाणेदार व्यक्तीमत्व.
संभूराजे महानच होते. त्यांचे दररोज हाल हाल होत असे. तरीही ते कवी कलशाला म्हणत की कलश या प्रसंगावर एखादी कविता सुचते कारे. त्यावर उत्तर देत कवी कलश म्हणत की राजे, हाच इतिहास लिहिला जाणार. एका दगडावर रेखीव पद्धतीनं. आज तो औरंगजेब आपले हालहाल करतोय ना. उद्या लोकं त्याच्याच तोंडावर थुंकतील आणि आपल्याला महान समजतील. घाबरु नका राजे. पुन्हा धाडसानं सहन करा एक एक घाव. कदाचीत नियतीला हेच मंजूर असेल. म्हणूनच ती डाव साधत आहे. यात कदाचीत आपलं नशीबच खराब म्हणावं राजे. परंतु मला ठाम विश्वास आहे. आपले मंगल होणार आहे. आपले नशीब बदलणार आहे. तुम्ही घाबरु नका. आपला इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, सुंदर पद्धतीनं आणि जेव्हापर्यंत पृथ्वी असेल, तेव्हापर्यंत आपला इतिहासही असेल.
ते कवी कलशाचं बरोबरही होतं. कारण आज तीच स्थिती आहे. संभूराजाला आजही महानच समजलं जातं. जरी औरंगजेब बादशाहानं त्यांचं मुंडकं कापून भाल्यावर अडकवलं असलं तरी आणि औरंगजेबाला क्रुरकर्मा म्हणून संबोधलं जात आहे. काही चांगले सुशिक्षीत मुस्लिम लोकंही औरंगजेबाला क्रुरकर्माच संबोधतात. तसेच बरेचसे लोकं त्यांची महाराष्ट्रात असलेली समाधी टाळतात. असो, तो आपला भाग नाही.
कवी कलशाला औरंगजेबानं संभूराजांच्या पूर्वीच मारलं. संभूराजांच्या पुर्वीच त्यांचेही एक एक अवयव कापले जायचे. अन् मृत्युही त्यांच्या पहिलंच. कारण तशानं तरी संभूराजे बदलतील. आपला धर्म सोडतील व मुस्लिम धर्म स्विकारतील. असं औरंगजेब बादशाहाचं मत. परंतु संभूराजे बदलले नाहीत व त्यांनी मुस्लिम धर्माचाही स्विकार केला नाही. उलट हौतात्म्य पत्करलं. ज्याला वीरमरण असं संबोधता येईल. विशेष सांगायचं म्हणजे संभूराजे महानच होते. त्यांचासारखा धर्म न बदलविणारा, धर्मासाठी निष्ठा बाळगणारा, तेवढीच प्रजेवर श्रद्धा ठेवणारा व्यक्ती या जगात ना कोणी झाला, ना कोणी होणार. याची आपणास जाणीव आहे. तरीही आजच्या दृष्टीनं याचा विचार केल्यास आपण काय करतो. उगाचच कबरीवरुन हिंदू मुस्लिम वाद निर्माण करुन जे नाही, त्याच्यासाठी काहीच करीत नाही. अन् जे आहे, त्याच्यासाठी वाद करीत देशाच्या संपत्तीची नासधूस करतो. उगाचच आपल्याच आई बहिणींचा विनयभंग करतो. यावरुन आपल्यात आणि औरंगजेबाच्या कुटनीतीत काय फरक आहे. हं, करायचेच असेल आपल्याला, तर ज्या बहाद्दरगडावर व अलिकडील काळात ज्याला संभूराजेंच्या नावावरुन धर्मवीरगड म्हणतात. त्या गडावर संभूराजाला एका खांबाला बांधून ठेवले होते. त्या त्या किल्ल्याची व त्या खांबाची जी नाशधूस होत आहे. ती होणारी नाशधूस बंद करावी. त्यांची डागडुगी करावी. जेणेकरुन आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या संभूराजांचा इतिहास माहीत होईल आणि हेही माहीत होईल की गतकाळात असाच एक संभूराजे नावाचा महान व्यक्ती होवून गेला. ज्याने धर्मासाठी स्वतःचे हालहाल सहन केले. प्राण त्यागले. परंतु धर्म बदलवला नाही.
आज आपण पाहतो की बरीचशी माणसं आपला धर्म बदलवीत आहेत. कोणी त्यात अंधश्रद्धा पाहून धर्म बदलवीत आहेत. कोणी कोणी दिव्य चमत्कारानं आकर्षीत होवून धर्म बदलवीत आहे. हं, मानेवर सुरी येणे हा भाग वेगळा, जर संभूराजांसारखी मानेवर सुरी आली असती तर काय केले असते कुणास ठाऊक. शिवाय आता धर्म बदलवायचं स्वातंत्र्य असल्यानं अलिकडील लोकं सर्रास धर्मच बदलवीत आहेत आणि त्यावरुन वाद करीत आहेत. त्यांना येथील धर्मवीरगडासारखेच ऐतिहासिक धरोधर मिटण्याशी, त्याची डागडुगी करण्याशी काहीच फरक पडत नाही. महत्वपूर्ण बाब ही की आज आपण आपला वारसा जपायला हवा. ऐतिहासिक धरोहर, ज्याला म्हणतो, तोही जपायला हवा. त्याची डागडुगी करायला हवी. तसंच कोणी आणि कितीही आमीष दाखवलं तरी धर्म बदलवू नये म्हणजे झालं.
आज दंगा झाला होता. ज्यातून त्यानं दंग्यात भाग घेतला होता. तो भाग त्याची पत्नी त्याचेजवळ नसल्यानं घेतला होता. घरी तै एकटाच असल्यानं व त्याला करमत नसल्यानं घेतला होता. ज्यातून त्याला शिक्षा झाली होती. ज्यातून त्याचं घरही तोडलं गेलं होतं.
केशर भारतीय होता व त्याला खडी फोडत असतांना समजलं होतं, आपले विचार हे अतिशय सोज्वळ व सुसंस्कारी असावे. ज्या विचारानं आपल्याला त्रास होणार नाही. तसंच आज त्याला समजलं होतं. आपण जेही काही केलं. ते कुविचारच होते. ज्याचे परिणाम आपल्यालाच आज भोगावे लागले आहेत.
काही दिवस तुरुंगात असतांना खडी फोडण्यात गेले. त्याला जन्मठेप झाली होती. तशी ती जन्मठेप पुर्ण होताच तो सुटला. त्यानंतर तो आपले जीवन सुविचारानं जगू लागला होता. आज तो पुर्णच बदलला होता.
केशरचं सोज्वळ वागणं आजमितीस शाहीनच्या कानावर गेलं होतं. त्याचेमध्ये झालेला बदलाव तिला आवडला होता व तशी तिही आपल्या पतीजवळ आनंदानं राहायला आली होती.
केशर तुरुंगातून सुटला होता. तसा तो तुरुंगातून सुटताच, त्यानं राजकारणात भाग घेतला. त्यानंतर तो निवडूनही आला. त्यातच आज तुरुंगात असतांनाच त्याला कुकर्म व सुकर्म याचा परिचय झाल्यानं त्यानं आता राजकारणात निवडून येताच ऐतिहासिक धरोहरांची पाहणी केली. त्याची डागडुगीही केली. ज्यात संभाजी महाराजांच्या बहाद्दरगडाचाही समावेश होता. ज्याला आज धर्मवीरगड नाव ठेवलं होतं.
आज त्यानं औरंगजेबाची समाधीही जपली होती. ज्यातून त्यानं वाद केला होता. परंतु ज्या धर्माला ज्यानं सन्मान दिला नव्हता. त्याही धर्माला आज सन्मान देत त्या धर्मासाठी तो झटत होता. ऐतिहासिक धरोधरांची जोपासना करीत होता. डागडुगी करीत होता. मग ती संभाजी महाराजांची समाधी का असेना वा इतर महापुरुषांची समाधी का असेना.
बहाद्दरगड सजला होता. तिथं खांबही उभे राहिले होते. इतिहासकार तसेच इतरही लोकं त्या गडाला भेट द्यायला जात होते. भेट देवून येत होते. तसा आज बहाद्दरगड त्या लोकांना पाहून रडत होता. म्हणत होता की ज्या माझ्या कुशीत संभूराजा खेळला. ज्या कुशीत मी संभूराजाला झोका दिला. ज्या हातानं मी संभूराजाला लहानपणापासून डावपेच शिकवले. त्याच हातानं मला औरंगजेबाच्या कृत्यांना आवर घालता आला नाही. त्यानं माझ्या संभूराजाचं मुंडकं कापलं आणि मी उघड्या डोळ्याने पाहात राहिलो. ती संभूराजाची कापलेली जीभ, ती नखं, ती कापत असलेली बोटं, ती सोललेली कातडी, बंद डोळे न करता उघड्या डोळ्यांनी पाहात राहिलो. वाटत होतं की त्या औरंगजेबाचाच कडेलोट करावा. परंतु ते मला जमले नाही. जमलं एकच. त्या घटना गप्प होवून पाहणं. कारण मी त्यावेळेस त्या बादशाहाचा गुलाम होतो. मी पाहात होतो, ती शत्रूंची पिल्लावळ. जी भाल्यावर मुंडकं सजवून मिरवणूक काढत होती.
आज महाराष्ट्रात वीर महापुरुषांच्या समाध्या डौलात उभ्या होत्या व गर्वानं सांगत होत्या की आम्हीच आमच्या कारकिर्दीत स्वराज्य जपलं. म्हणूनच हे स्वराज्य टिकलं. तसंच आपल्याला इंग्रजांशीही लढता आलं. जर आम्ही औरंगजेब बादशाहाशी त्या काळात लढलो नसतो तर महाराष्ट्रातील कोणताच व्यक्ती पुढं जावून कोणाशीच लढू शकला नसता.
दंग्यानं परीवर्तन झालं होतं. केशर पुर्णतः बदलला होता. आज त्याच्यात त्याच्या धर्माबद्दल आस नव्हती. ना ही तो पुर्वीसारखा धर्मवेडा राहिला नव्हता औरंगजेबासारखा. आज तो सर्वच धर्माचा आदर करीत होता आणि तेवढाच स्वाभिमानही बाळगत होता.