Shevtchi Sanj - 3 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | शेवटची सांज - 3

Featured Books
Categories
Share

शेवटची सांज - 3



          दिवसामागून दिवस जात होते. तसतसा रामदासही मोठा होत होता. त्याचं शिक्षण जोरात सुरु होतं व आता त्याला शाळा आवडायला लागली होती.
         शाळेत मुलं होती. आजुबाजूच्या गावच्याही लोकांनी शिक्षणाची गरज पाहून आपली मुलं शाळेत टाकली होती. तिही मुलं रामदाससारखीच शाळेत शिकत होती. ज्या शाळेत भुमीगत असलेला व्यक्ती शिकवीत होता.
          तो भुमीगत व्यक्ती. तो केवळ मुलांना शिकवीतच नव्हता तर एक प्रकारची प्रेरणाही देत होता. त्याचेकडे पाहून व त्याचं ऐकून शिकावसंच वाटत होतं. अशातच रामदास शिकला व तो चौथी पास झाला.
          रामदासचं शिक्षण चौथीपर्यंत झालं. त्यानंतर त्याला शिक्षणात आवड निर्माण झाल्यानं तो पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेवू लागला. कारण त्याच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व माहित होतं.
         सदाशिवला शिक्षणाचं महत्व माहित असल्यानं त्यांनी रामदासला शिक्षण शिकविण्यास कसर सोडली नाही. त्याला रामजीचाही इतिहास माहित होता. माहित होतं की रामजीनं बाबासाहेबांचं शिक्षण करीत असतांना अतिशय कष्ट घेतले व बाबासाहेबांना शिकवलं. त्यातच त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबासाहेबांचे पुस्तकांचे लाड पुरवले होते. 
          रामदास शिकत गेला. तसाच तो भुमीगत व्यक्ती. तो केवळ मुलांना शिकवीतच नव्हता तर एक प्रकारची प्रेरणाही देत होता. त्याचेकडे पाहून व त्याचं ऐकून शिकावसंच वाटत होतं. अशातच रामदास शिकला व तो चौथी पास झाला.
          रामदासचं शिक्षण चौथीपर्यंत झालं. त्यानंतर त्याला शिक्षणात आवड निर्माण झाल्यानं तो पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेवू लागला. कारण त्याच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व माहित होतं.
           सदाशिवला शिक्षणाचं महत्व माहित असल्यानं त्यांनी रामदासला शिक्षण शिकविण्यास कसर सोडली नाही. त्याला रामजीचाही इतिहास माहित होता. रामदास शिकत गेला. त्यानं उच्च शिक्षण शेजारच्याच गावात घेतलं. तसं पाहिल्यास आता त्याला शिक्षणाची गरज नव्हती.
          उच्च शिक्षण घेतलेला रामदास. तो गावातच राहात होता. तसं पाहिल्यास त्याच्या घरी शेती होती. परंतु तो शेतात जात नसे. कारण लोकं तो कधी काळी शेतावर गेल्यास त्याला टोमणे मारत असत. म्हणत असत की एवढं शिकून उपयोग काय की हा मुलगा शेतीवर जातोय. शेतीच करायची होथी तर शिकला कशाला? अनपढ लोकंही चांगली शेती करु शकतात. असं लोकांनी म्हणताच त्याला स्वतःचीच लाज वाटायची व त्यामुळं त्याला घरच्या शेतात जाण्याची व काम करण्याची लाज वाटत असे. असे बरेच दिवस गेले. तो गावात बेरोजगार म्हणून फिरत होता. तसाच ग्रामीण भागातील बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल? यावर रामदास विचार करीत होता. 
         ग्रामीण भागात बेरोजगारी वाढत आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण अलिकडील काळात रस्ते झाल्यानं व वाहतूकीची साधनं झाल्यानं मुलं शिकतात. ते उच्च शिक्षण घेतात. परंतु उच्च शिक्षण घेतलं की ते शेती करीत नाहीत. त्यांना लाज वाटते. अन् ते नोकरीच्या हव्यासानं शिकलेली असल्यानं धड नोकरीही मिळवू शकत नाहीत. कारण नोकऱ्या काही रस्त्यावर मिळत नाहीत. त्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे व त्या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलं तग धरु शकत नाहीत. त्याचं कारण आहे, त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जे फीडबॅक लागतं, ते मिळत नाही. उच्च शिक्षण घेतलेली ग्रामीण भागातील मुलं गावात ती उच्च शिक्षण घेतलेली जरी असली तरी गावात कोणताच कामधंदा करु शकत नाहीत. त्याचं कारण आहे कसब. गाव हे स्वयंपुर्ण असतं व ते कसब गावातील लोकांना घरातूनच मिळत असतं. जसं शेती करायची असली तरी गावातील शेतकऱ्यांच्या घरात जन्मास आलेल्या मुलांना शेती कशी करावी, ते सांगावंच लागत नाही. तसंच गवंड्याच्या मुलास घर कसं बांधावं ते सांगावंच लागत नाही. एखाद्यावेळेस बांधकामात इंजीनियर झालेल्या मुलांना जे येत नाही. ते येतं या गावातील गवंड्याच्या मुलांना. गावात केसकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मुला मुलींना ब्युटीपार्लरची वेगळी शिकवणी लावायची गरज नसते. हेच गावात अधिवास असणाऱ्या इतरही व्यावसायिक लोकांच्या मुलांच्या बाबतीत घडतं. त्यामुळं गाव स्वयंपुर्ण असतं. गावातील मुलं शिकतात आणि गावातील मंडळी आपल्या मुलांना शिकवतात, त्याचं कारण आहे, नोकरी मिळवणं व तिही सरकारी नोकरी मिळविणं. परंतु अशी नोकरी मिळवितांना स्पर्धा आहे. त्यातच त्या स्पर्धेत उतरतो म्हटल्यास शिकवणी वर्ग आहेत. ज्या शिकवणी वर्गाचं शुल्क वारेमाप आहे. जे शुल्क शहरातील व्यक्ती देवू शकतात. परंतु गावातील बरीचशी मंडळी ही गरीब असल्यानं ती देवू शकत नाहीत. मग ती मुलं स्पर्धेत कशी टिकणार? हा प्रश्न पडतो. शिवाय अशा स्पर्धा परीक्षेत उतरतोच म्हटलं तर शिक्षणासाठी जायला प्रवासाची साधनं पर्यायी साधनं होवू शकत नाही. विशेष सांगायचं झाल्यास त्यातही मुलं पैशाअभावी मागे पडत असतात.
         ग्रामीण भागातील मुलं शिकतात. कशीबशी उच्च शिक्षण घेतात. परंतु त्यांना पुरेशा सोईसुविधा नसल्यानं ती मागं पडतात. ना त्यांना पैशाच्या सुविधा पर्यायी स्वरुपाच्या असतात. ना जाहिराती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतात. यातूनच ग्रामीण भागातील मुलं शिकली तरी ती बेरोजगार म्हणून गावात फिरत असतात. ते कोणतेच उद्योगधंदे करीत नाहीत. 
         गावातील मुलं ही गावात उद्योगधंदे न करण्यामागचे दुसरे महत्वपुर्ण कारण म्हणजे लाज. गावातील लोकं हे सतत अशा शिकलेल्या मुलानं जर गावातीलच इतर कामं केली तर त्याला हसतात. त्याची टिंगल उडवतात. टवाळकी करतात. म्हणतात की एवढं शिकून काय उपयोग झाला? अशी जर कामं करायची होती तर एवढं शिक्षण घेतलंच कशाला? एवढं शिक्षण घ्यायची काय गरज होती? अन् त्यांची ती टिंगल, टवाळकी करणंही बरोबरच असतं. कारण त्यांच्यासाठी त्यांचे परंपरागत व्यवसाय करणं काही कठीण नसतं. ते परंपरागत व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण न शिकताही त्यांना करता येत असतात. त्यासाठी शिकायची गरज नसते. कारण ते बाळकडू त्यांना घरातल्या घरात अगदी बालपणापासून मिळत असलेलं दिसतं. समजा एखाद्या चांभाराच्या मुलानं शिकल्यानंतर चांभाराचा व्यवसाय केला तर त्याला गावातील लोकं नावबोटं ठेवणारच. त्याचं कारण असतं की त्या चांभाराच्या मुलानं शिक्षण जरी घेतलं नसतं तरी त्याला चांभाराचा व्यवसाय करताच आला असता. हे बाळकडू तो कुटूंबातील लोकं करीत असलेला व्यवसाय पाहून मिळालेले असते. 
          अलिकडील काळात शेतीला फारसं असं महत्व नाहीच. शिक्षणाला जास्त प्राधान्य आहे व आजच्या काळात शेती कोणीही करायला पाहात नाहीत. त्याचं कारण आहे शिक्षण. आजच्या काळात अगदी खेड्यापाड्यातील मुलंही शिक्षण शिकतात आहे व लोकं त्याला शिकवतात आहे. त्याचं कारण आहे, अलिकडील काळात शिक्षणाचं वाढलेलं महत्व. तशाच अलिकडील काळात शिक्षणाच्या बऱ्याच सोयी सुविधा झाल्यानं मुलं शिकतात. ते उच्च शिक्षणही घेतात. मात्र पुर्वी असं नव्हतं. 
           पुर्वी शिक्षण शिकायचं म्हटलं तर प्रश्न होता. प्रश्न होता की शिक्षण शिकायचं कसं? कारण शिक्षण शिकायला गावात सोईसुविधाच नसायच्या. गावात शाळाही नसायच्या. त्यातच ज्या गावात शाळा आहेत, त्या गावी जायला साधनं नसायची आणि साधनं जरी असली तरी रस्ते नसायचे. मग जी साधनं वापरात होती. त्या साधनांनी जावं कसं? हा प्रश्न पडायचा. पावसाळ्यात तर शाळा शिकायची दैनाच असायची. ते ओढे, ते ओहोळ तुडूंब भरलेले असायचे. ओढ्यावर पुरेसे सांकवही नसायचे की ज्यामुळं तुडूंब भरलेले ओढे ओलांडून जाता येईल. शिवाय ओढ्यातून जातो म्हटलं तर ओढ्याला पूर असायचा आणि ओढ्याचा प्रवाह एवढा तीव्र असायचा की तो ओढा ओलांडून जाणं कठीण व्हायचं. कारण वाहून जाण्याची भीती असायची. तसाच पाऊसही लागूनच पडायचा. तसाच पुर्वीचा तो काळ, ते वातावरण आणि शिक्षण यांचा ताळमेळ जुळत नव्हता. गावात शाळाच नव्हत्या आणि राहतील तरी कशा? रस्ते नसल्यानं शिक्षक शिकवायलाच जात नव्हते. शिवाय स्थानिक व्यक्तीनं शिकवतो म्हटलं तर तोही अडाणीच असायचा. पावसाळ्यातील रस्ते तसं पाहिल्यास चिखलांचे असायचे. त्यात पाय रुतून बसायचे. शिक्षणाचं महत्वही नव्हतंच आणि ते वाटतही नव्हतंच. त्यातच मुलं दूरच्या शाळेत शिकायला गेली की त्यांना शाळेत कंटाळा येत असे. शिकावंसं वाटत नसे. त्यातच अशा दूरच्या शाळेत जातो म्हटल्यास आजूबाजूला जंगल असल्यानं हिंस्र श्वापदाची भीती वाटायची. वाटायचं की रस्त्यात ती जनावरं आपली वाट अडवतील व आपल्याला मारुन खावून टाकतील. तसं पाहिल्यास रस्त्यावर रहदारी नसायची आणि शिक्षण शिकायलाही कोणी जायचं नाही. अन् रस्त्यावर हिंस्र श्वापदं येत व ते रस्त्यावर कोणी दिसला रे दिसला की त्याला मारुन जंगलात नेत असत.
         ते जंगलातील रस्ते. रस्त्यारस्त्यावर मोकाट फिरणारी ती जंगली श्वापदं. मोठी माणसंच त्याला घाबरणारी. मग हे बाल विद्यार्थी. ते कसे काय जातील शाळेत? त्यातच गावात शाळा उघडतो म्हटल्यास शिक्षक दोन दिवस शाळेत यायचे. परंतु नंतर भीतीनं ते शाळेतच येत नव्हते. केवळ पावसाळाच नाही तर चक्कं उन्हाळा हिवाळाही बंदच राहायचा तो मार्ग. अन् शाळेत तरी कशी जाणार होती मुलं? शाळा या सकाळी साडेदहाला भरायच्या व सुटायच्या साडेपाचला. त्या शाळा ज्या वेळेला सुटत, त्याच वेळेला दिवसभर आराम करीत असणारे जंगलातील श्वापदं रस्त्यावर निघत व एक दोघांची नक्कीच शिकार करीत असत. ती जंगली श्वापदं त्याच वेळेला निघण्याचं आणखी एक कारण असायचं, ते कारण म्हणजे त्या गावातील गाई, गुरं. गाई, गुरं ही अगदी सांजच्यालाच घरी येत असत रानातून. तसाच दिवसभर शेतकरी वर्ग रानात राब राब राबत असे व तो सांजच्यालाच घरी येत असे.
          शिक्षण शिकायचं कसं? हा एक ऐरणीचा प्रश्न होता. तशी शेती करणं व त्यातील कसब शिकणं हे काही कठीण काम नव्हतं. त्यामुळंच साहजीकच लोकं शेती करीत असत. तसंच शेतीचं कसबही शिकून घेत असत. त्यातच शिकत असत जंगली प्राण्यांना पळवून लावणं. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासारख्याही गोष्टी ती मंडळी शिकून घेत असत. ह्या जंगली प्राण्यांपासून संरक्षणाच्या गोष्टी लहान लहान मुलंही शिकत असून ते अगदी लहानपणीच लाकडाचे गुलेर बनवीत व त्याद्वारे गावात येणाऱ्या बंदरांना हुसकावून लावत असत.
        ते जंगल व त्या जंगलातील ती माकडं. दर आठ दिवसांनी पाहुण्यांसारखे गावात येत. ती माकडं गावात आली की घरादाराचं नुकसान करीत. ते या त्या घरावर उड्या मारुन त्या घरावरील कौलं फोडून टाकत. जर त्या घरावर गवताचं आच्छादन केलं असेल तर ते गवतही अस्ताव्यस्त करीत असत. ज्यातून पाऊस आलाच तर तो अलगद उजागिरीनं आत शिरत असे. त्यामुळंच दरवर्षीच घराचं छप्पर गळायचं व घरातील सर्व सामान ओलं व्हायचं. त्यासाठी घरावर दरवर्षी कौलं टाकतांना खर्च यायचा. आता तसं होत नाही. आता प्रत्येक गावात रस्ता पोहोचलेला आहे. ओढ्याला पावसाळ्यात पाणी असल्यानं रहदारी बंद होते, हे पाहून शासनानं ओढ्यावरुन जाता यावं व सामानाची ने आण करता यावी म्हणून मोठमोठे सांकवही बांधलेले आहेत. त्यातच रस्ते हे डांबरी नव्हे तर सिमेंट स्वरुपाचे तयार झाले आहेत. आज शेतीची परिस्थितीही सुधारली आहे. त्यातच शिक्षणालाही महत्व आले आहे.
        पुर्वी शेती करायला शिकणं काही कठीण गोष्ट नव्हती, त्यामानानं शिक्षण शिकणं. शिवाय शिक्षणातून काहीही साकार होत नाही असं गावच्या लोकांना वाटत होतं. कारण नोकरी मिळणं हा गावच्या लोकांचा प्रमुख उद्देश होता. तसं आज नाही.
        आज शेती पद्धती सुधारलेल्या आहेत व शेती करायची झाल्यास बियाणांच्या अशा अशा जाती आल्या आहेत की ज्या जाती कितीही पाऊस असला तरी त्या पावसात रोपे नष्ट होत नाहीत. तर ती रोपे तग धरतात. हेच संशोधन झालं रोगातही. आता कितीही तीव्र स्वरुपाचा रोपावर रोग आला असला तरी त्या शेतीतील बरीचशी रोपं मरुन अख्खं पीक उध्वस्त होत नाही. फक्त काहीच झाडं मरतात. 
         शिक्षणातही बदलाव झालेला आहे. गावागावात जायला मोठमोठे रस्ते झाल्याने आता गावागावात चारचाकी वाहनंही जात असतात. त्यातच गावात जायला जंगल लागत असलं तरी अशा चारचाकी वाहनानं जंगलातून गावात जायला लोकांची तारांबळ उडत नाही. त्यातच आता सरकारनं प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून शाळा उघडल्या आहेत. ज्या प्राथमिक स्वरुपाच्या आहेत आणि गावाबाहेर म्हणजे तालुक्यातही शाळा आहेत. ज्या शाळेत उच्च शिक्षण आहे. आता गावातील मुलंही उच्च शिक्षण घेवू लागले आहेत. 
          शिक्षणाचे महत्व वाढले आहे. ते जेवढे वाढले आहे, त्या प्रमाणात शेतीचे महत्व वाढलेले नाही. अलिकडील काळात शेतीवर आधारीत प्रगत तंत्रज्ञान जरी विकसीत झालं असेल व शेती करायला कठीणाई वाटत असेल तरी शेती करणारे हात जास्त नाहीत. तसाच शेतीत सतत पडत असलेला दुष्काळ, हिंस्र श्वापदाची भीती, साप, विंचवाची भीती, त्यातच नैसर्गिक आपदेची भीती. या सर्व कारणांनी शेती करायला कोणी पाहात नाहीत.
          आज शिक्षणाचे महत्व वाढलेले असून जी मंडळी आपल्या मुलांना शिकवतात. ती मुलं मोठी झाली की शेती करायला पाहात नसल्यानं व गावातील लोकात शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी करण्याचा असल्यानं अशा गावातील उच्चशिक्षीत मुलात नोकरीचा प्रश्न निर्माण होतो, त्यातच अशा उच्च शिकलेल्या मुलानं जर शेती केली तर गावात नावबोटं ठेवणारे काही कमी नाहीत. कारण त्यांचा व्यवसाय मुळातच शेतीचा असल्यानं त्यांना माहित आहे की शेती ही अडाणी व्यक्तीही चांगल्या प्रकारे करु शकतो. मग अशा शिकलेल्या मुलाचा उच्चशिक्षण घेवून काय उपयोग? ती मंडळी टोमणे मारत असतात. ज्यातून गावातील उच्चशिक्षण घेतलेली मुलं धड शेती करु शकत नाहीत, ना धड ती नोकरीही मिळवू शकत नाहीत. मग काय, तर ती बेरोजगार म्हणून गावात फिरत असतात. 
          अलिकडील काळात शिक्षणाचा उद्देशही बदलला आहे. जे पुर्वी गावात परंपरागत धंदे होते, ते धंदे आज शिक्षणात शिरलेले असून अलिकडील काळात शिक्षण हे व्यवसाय म्हणून शिकण्याला जास्त महत्व आलेले आहे. जे शिक्षण पुर्वी गावात मिळत होतं व काही काही गावात आजही मिळतं. यावरुन गावातील लोकांमध्ये, असं जर आहे तर उच्चशिक्षण घेण्याची काय गरज आहे. अशी भावना एका विशिष्ट वर्गाची निर्माण झाली आहे. ज्यातून उच्चशिक्षणाला वा शिक्षण घेण्याला अडथडा निर्माण झाला आहे. म्हणूनच गावात उच्च शिक्षण शिकत असलेल्यांची बेरोजगारी वाढलेली आहे. दुसरा गट हा आहे की जो शिक्षण घेण्याला जास्त प्राधान्य देत आहे. असा गट हा मुलांच्या शिक्षणावर जास्त खर्च करीत असून त्यांना शिकवीत आहे. परंतु त्यांचाही उद्देश केवळ नोकरी आणि तिही सरकारी नोकरी मिळविणेच आहे. ते प्रसंगी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गावात सोईसुविधाच नसल्यानं त्यांना शहरातच वेगळी व्यवस्था करुन ठेवत आहेत. शिकवीत आहेत. त्यातच अशी मुलं शहरात रुळतात. ती गावात परत येत नाहीत. कारण गावातील लोकं टोमणे मारत असल्यानं जी लाज वाटते. ते टोमणे सहन होत नसल्यानं अशी मुलं प्रसंगी शहरात राहून मोलमजूरीची कामे करतात.
           आज गावातील मुलं शिकतात. उच्चशिक्षण घेतात. परंतु कधीही कोणत्याही गोष्टीची मागणी करीत नाहीत. आज आरक्षण आहे, त्यांनाही आरक्षण नाही असं नाही. आरक्षण त्यांनाही आहे व शहरातील मुलांनाही आहे. कारण आरक्षण हे जातीआधारावर नाही ते जातसमुहावार गटावर आधारीत आहे व अशा विशिष्ट जातसमुहात गावातील मुलंही मोडतात. ज्यात अशा विशिष्ट जातीच्या गावातील मुलांना जातीअंतर्गत असलेल्या आरक्षणाचा फायदा होतो. तसा शहरातील मुलांनाही फायदा होतच असतो आरक्षणाचा. ज्या शहरातील मुलांना शिक्षण शिकण्याच्या सर्वच बाबतीतील सोईसुविधा आहेत तरी. तशीच मागणी आज वेगवेगळे समाज करीत आहेत. कारण त्यांनाही त्यांचा समाज मागास ठेवायचा नाही. म्हणूनच आरक्षणाच्या मागण्या होत आहेत. खरं तर आरक्षण हे गावातील सर्वच जातीच्या लोकांना द्यायला हवे. जी गावं अविकसीत आहेत. ज्या गावात बरोबर रस्ते नाहीत. सोईसुविधाही नाहीत. जे आपल्या मुलांना सोईसुविधे अभावी व पैशाअभावी शिकवूच शकत नाहीत. अशी भरपूर गावं आहेत की ज्या गावातील मुलं साधं प्राथमिक शिक्षण घेवू शकत नाहीत. अशा मुलांना जेव्हा आरक्षण मिळेल. तेव्हाच ती मुलं वर येतील व अशी मुलं वर आली की प्रत्येक गाव विकसीत होईल अन् गाव विकसीत झालं की आपोआपच शहर आणि राष्ट्रही विकसीत होईल. म्हणूनच आरक्षण द्यायचंच असेल तर जातीअंतर्गत गरीब लोकांना द्यावं की ज्यांची वर्षाची मिळकत एकवीस हजार रुपयाच्या खाली आहे, तसंच अविकसीत अशा ग्रामीण भागातील लोकांना द्यावं की जे कोणत्याही जातीतील असतील. त्यात भेदभाव करु नये. मात्र तो देशाचा रहिवाशी असायला हवा.
           रामदास शिकला. त्यानं उच्च शिक्षण घेतलं व तो उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागला. परंतु नोकऱ्या काही रस्त्यावर पडलेल्या नव्हत्या की त्याला मिळेल. त्यात स्पर्धा होत्या व त्या स्पर्धेत रामदास टिकाव धरु शकत नव्हता.
          ती नोकरीतील जीवघेणी स्पर्धा. त्यातच नोकरी संदर्भानं शहरातील मुलं ही शिकवणी लावत होते, ज्यात त्यांना घरुन पैसे मिळायचे व शिकवणी वर्गात उत्तम असं मार्गदर्शन मिळायचं. ज्यातून अशी मंडळी ही नोकरीला लागत. शिवाय महागड्या शिकवणी वर्गातील मुलं परीक्षेत पास होत असत.
         ते महागडे शिकवणी वर्ग. कधी कधी स्पर्धा परीक्षेत त्यांचं सेटींगही असायचं. जे सेटिंग पैशानं चालायचं. अमूक अमूक एवढे पैसे दिले की तोंडी व लेखी परीक्षा पास करता यायच्या. कधी कधी शिकवणी वर्ग सांगायचे की आपण लेखी परीक्षा पास करा. तोंडी परीक्षा आम्ही पाहून घेवू. तसं पाहिल्यास याच पद्धतीनं कितीतरी श्रीमंतांची मुलं नोकरीला लागली होती आणि गरिबांची मुलं उच्च शिक्षण घेवूनही ती मजूर म्हणून काबाडकष्टाला जात होती. काही बेरोजगार म्हणून गावात फिरत होती. 
         शिक्षण शिकण्यात स्पर्धा होती. त्याचबरोबर स्पर्धा होती नोकरी मिळविण्यात. सरकारी नोकऱ्या या उच्चशिक्षीतांना मिळत नव्हत्या. त्या मिळायच्या अगदी गर्भश्रीमंत असलेल्या उमेदवारांना. तसेच जे नातेवाईक असायचे वा ज्यांची ओळखपाळख असायची. त्यांनाही सरकारी नोकऱ्या मिळायच्या.
          गरिबांची मुलंही परीक्षा देत, ज्या नोकरीच्या परीक्षा असायच्या. परंतु ती परीक्षा ते पासच होत नसत. कारण असायचं उत्तम मार्गदर्शन. शिवाय उत्तम मार्गदर्शन मिळविण्यासाठी लागणारा पैसा. त्यातच तोंडी परीक्षेत पास होण्यासाठी लागणारी ओळख. या तिन्ही गोष्टी गरिबांजवळ नसायच्या.
            तो ग्रामीण भाग व त्या ग्रामीण भागातील शिकणारी मुलं. म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिणार, तो गुरगुरणार. ते खरंही आहे. परंतु कधीकधी त्याऊलट होतं. शिक्षण शिकणारी मंडळी ही शिक्षण शिकून गुरगुरत नाहीत तर ती आदर्श गुलाम म्हणून काम करतात. तसं त्या ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांचं होतं. ते शिकूनही ओरडत नव्हते. 
         आदर्श गुलाम? याचाच अर्थ अडाणी व्यक्ती गुलाम नसतो काय? याचं उत्तर नाही असंच येतं. अडाणी व्यक्ती हा गुलाम नसतोच. तो त्याचेवर झालेला अन्याय दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो नव्हे तर तो आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो. तसे शिक्षण शिकलेले लोकं नाही. आजही ते अगदी गुलामागत वागतात. त्याचं कारण असते स्वार्थ.
         शिक्षणाचा उद्देश हा केवळ शिकणं नाही. तसंच बेरोजगारी निर्माण करणं नाही, तर त्याचा उद्देश आहे लोकांना आत्मनिर्भर करणं. शहरी भागात ठीक आहे की लोकं शिकल्यानंतर त्यांना पर्याय नाही म्हणून ते आत्मनिर्भर होण्यासाठी कोणताही कामधंदा पकडतात. त्या कामधंद्यात आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करुन घेतात. परंतु ग्रामीण भागातील मंडळी शिक्षणाचा त्यातही उच्चशिक्षणाचा उपयोग करतांना दिसत नाहीत. त्याचं कारण आहे त्यांना वाटणारी शरम. त्यांना शरम का वाटते? याचा आढावा घेतला असता जाणवतं की त्यांच्या शिक्षण शिकण्यापुर्वी त्यांच्या घरी पिढीजात धंदे होते. जे आजही त्यांचे वडील करीत असून त्यात बक्कळ पैसा आहे. थोडासाच व्यवसायात फरक पडलेला असून तो व्यवसाय थोडा आधुनिक झालेला आहे. असे व्यवसाय करतांना उच्चशिक्षीत झाल्यानंतर लाज वाटणे साहजिक आहे. गावचे लोकं टर उडवतात. म्हणतात की एवढं शिकून काय उपयोग झाला? याच प्रश्नातून ग्रामीण भागातील मुलं उच्च शिक्षण घेतल्यावर घरची पिढीजात कामं करायला पाहात नाहीत. ते पानठेल्यावर दिवसभर रिकामटेकडे बसतात. परंतु वडिलांच्या पिढीजात कामात हातभार करीत नाहीत. विचार करतात की मी जरी शिकलो नसतो तरी मला हे घरचं काम अगदी अस्खलितपणे जमलं असतं. मग मला शिकण्याची गरज नव्हतीच. ती मंडळी घरातील पिढीजात कामात की ज्या कामात जास्त पैसा आहे. त्या कामात हातभार न लावता एखाद्या कंपनीत नोकरी शोधतात. जिथं अतिशय मेहनत असते. वर कामाच्या स्वरुपात कामाचा तेवढा मोबदला मिळत नाही. तरीही ती कामं ते नाईलाजास्तव करतातच. कारण लोकांनी त्यांना वाईट म्हणू नये व त्यांचा स्वाभिमान हा दुखावला जावू नये. तशीच काही उच्चशिक्षीत मुलं तर आपल्या वडिलांच्या डोक्यावर बसूनच खात असतात. विचार करतात की त्यांना चांगली, जास्त पैशाची नोकरी लागेल. परंतु तशी नोकरी मिळत नसल्यानं अशी मुलं बेरोजगार असतात. हे चित्र नित्यनेमानं अगदी ग्रामीण भागात दिसत असते.
          पुर्वीच्या काळात ग्रामीण भागात कुणीच जास्त करुन शिकत नव्हते. त्यातच जास्त बेरोजगार गावात दिसत नव्हती. सर्वच तरुण मुलं व मुली आपल्याच वडिलांच्या पिढीजात व्यवसायात मदत करीत असत. जास्त झालेलं उत्पादन हे शहरात विकून टाकत असत. तसं पाहिल्यास गाव स्वयंपुर्ण होतं व गावात गरिबी नव्हतीच. शहरं मात्र मागासलेली दिसत. परंतु आता तसं नाही. आता अगदी उलट आहे. आता गावं गरीब आहेत व शहरं श्रीमंत दिसत आहेत. गावातील शेतकरी कर्जाच्या ओझ्यानं व शेती पिकत नसल्यानं आत्मनिर्भर होण्याऐवजी आत्महत्या करीत आहेत. अन् त्या गोष्टीला शहरातील लोकं हासत आहेत. ग्रामीण भागात उच्चशिक्षीत झालेले नवयुवक बेरोजगार म्हणून फिरत आहेत आणि शहरातील मुलं त्यांना नावबोटं ठेवत आहेत. एवढंच नाही तर ग्रामीण भागातील उच्चशिक्षीत झालेले तरुण जेव्हा आपल्या वडिलांचा पिढीजात व्यवसाय सांभाळतांना दिसतात. तेव्हा शहरातील तरुण त्यांना पाहून हासतांना दिसतात.
         एकंदरीत सांगायचं झाल्यास शहरातील लोकांचे टोमणे ऐकून उच्चशिक्षीत असलेली परंतु बेरोजगार म्हणून फिरणारी नवयुवकांची टोळी जेव्हा दिसते. तेव्हा ती टोळी पाहून असं वाटतं की जे गाव कालमितीस स्वयंपुर्ण गाव म्हणून मिरवीत होता, तोच गाव आज बेरोजगार म्हणून मिरवतो आहे. खरंच आजचं चित्र पाहिलं की अशा कालच्या स्वयंपुर्ण असलेल्या आजच्या गावात आज नवयुवकांची बेरोजगारी निर्माण झाली आहे. हीच वास्तविकता असून यावर आज अधिक विचार करण्याची गरज आहे. विचार हा आहे की कदाचीत अशीच जर परिस्थिती उद्याही सुरु राहिली तर काल स्वयंपुर्ण असलेलं व स्वयंपुर्ण समजलं जाणारं गाव लयास जाईल. गाव, गाव राहणार नाही, तिथं स्मशानागत वातावरण तयार होईल. ज्याला जबाबदार असेल शिक्षण. कारण गावातील लोकं जर शिकले नसते तर पिढीजात धंदे प्रत्येकांनी केले असते. ते बुडाले नसते आणि गावात बेरोजगारीही निर्माण झाली नसती. तसंच शिक्षणानंच गावात बेरोजगारी निर्माण झाली. असं म्हणायचीही वेळ आली नसती. हे तेवढंच खरं. 
         रामदास शिकला होता. तो उच्चशिक्षीत झाला होता. परंतु तो घरी काम करीत नव्हता. गाव थोडसं मोठंच झालं होतं व त्या गावात शिकलेले तरुण आज जास्त दिसायला लागले होते. 
          ते गावातील शिकलेले तरुण गावात केवळ पानठेल्यावर बसून पेपर वाचत असत. त्यांना वाटत असे की एखाद्यावेळेस एखाद्या दिवशी अशीही बातमी वर्तमानपत्रात छापून येईल की जी बातमी नोकरी देणारी असेल. परंतु नोकरी तसं पाहिल्यास खेळण्यातील वस्तू नव्हती की ती त्यांना मिळेल. 
         ते भुमीगत व्यक्तीचं शिकवणं रामदासच्या मनात भरणारी गोष्ट होती. त्यानं त्याला भरपूर शिकवलं होतं. अशा अशा गोष्टी शिकवल्या होत्या की त्याला जीवनात त्या गोष्टीचा फायदा होईल. तसाच फायदा त्याला नोकरी मिळवितांना झाला. 
           भारत स्वतंत्र झाला होता. त्याचबरोबर संविधानही लागू झालं होतं. ज्यात आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. ज्यात आरक्षण तमाम पुर्वीपासून वंचीत असलेल्या घटकाला दिलं गेलं होतं. 
        आरक्षण ही एक चळवळ होती की ज्या चळवळीनं तमाम आजपर्यंत अत्याचार करणाऱ्या वर्गातील लोकांना जाग आणली होती. त्यामुळंच आरक्षण हे लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. आरक्षणाची तरतूद जरी संविधानात असली तरी आरक्षण हे लोकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं शल्य रामदासला जाणवत होतं. 
          अलिकडील काळात आरक्षण हा विषय खुपच जोर धरत आहे. लोक काय वाट्टेल ते या विषयी बोलत आहेत. काही लोक म्हणत आहेत की आरक्षण बंद करा, काही म्हणत आहेत की आरक्षण आर्थिक आधारावर द्या, काही म्हणत आहेत की आरक्षण हे धर्मावर द्या, काही म्हणत आहेत की आरक्षण आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देवू नका. त्यातच जो तो आरक्षणाची मागणी करायला लागला आहे. तसं पाहिल्यास आरक्षणाच्या मागणीची ओरड सुरु आहे.
             मुळात आरक्षण म्हणजे काय ? याचाच अर्थ की आरक्षण म्हणजे राखीव जागा. मात्र ते लोकांना अद्यापही समजलेलं नाही. ते न समजल्यानं लोकं स्वतःच स्वतःच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. 
              लोकं स्वतःच संभ्रमीत असतात आणि इतरांनाही संभ्रमीत करतात. परंतु आरक्षणाचा अर्थ आहे, किमान प्रतिनिधित्वाची संधी. म्हणजेच ज्या लोकांना हजारो वर्षे त्यांच्या मुलभुत हक्कांपासून, विकासापासून, वंचित ठेवले त्यांच्या उत्कर्षाची संधी, जी नाकारली गेली होती. 
          मुळात आरक्षणाची सुरुवात कोणी केली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी? अजिबात नाही, शाहू महाराजांनी? बिलकुल नाही. महात्मा फुलेंनी? कदापी नाही, तर याची सुरुवात केली होती, मनुस्मृतीनं. मनुस्मृतीनं अगदी १०० प्रतिशत आरक्षण हे धर्मपंडीतांना दिलं होतं. धर्म पंडीतांसाठी, (धर्ममार्तंडांसाठी) संपुर्ण आरक्षण होते पुर्वीच्या काळात. त्यांनीच इतर जातींचं जगणं कठीण करुन टाकलं सोतं. त्यातच स्रियांचीही मुस्कटदाबी केली होती. तसंच १०० प्रतिशत आरक्षण राज्यसत्तेलाही होतं. १०० प्रतिशत आरक्षण धर्मसत्तेला होतं. १००% शेतजमिनी त्यांच्याच ताब्यात होत्या. १००% व्यापार त्यांच्याच तावडीत होता. १००% संपत्ती त्यांच्या मालकीची होती. असे सर्व अधिकार आणि संपत्ती याची मिरासदारी त्यांच्याकडे हजारो वर्षे होती आणि बाकीचे लोक इतके मागासलेले, इतके अज्ञानी राहिले की त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहिल्या. त्यांना स्वाभिमान काय असतो, शिक्षण काय असते, मानवी मुल्ये काय, जगण्याचा हेतु काय? हेच कळलंच नाही आणि याचा परिणाम असा झाला की एकुण संपुर्ण जातीच्या जाती वंचित राहिल्या. त्यांना गुलाम बनवल्या गेलं.
          आज आरक्षणाचा उद्देश हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हा भाजी भाकरीचा खेळ नाही तर प्रशासनामध्ये सहभागासाठी आहे. योजना आणि निर्णय घेण्यासाठी आहे. आज व्यक्ती, आजचा गरीब व उद्या श्रीमंत होऊ शकतो तर आजचा श्रीमंत उद्या गरीब होऊ शकतो. जे गरीब आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी इतर मार्ग आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या रंगाचे रेशनकार्ड आहे, कमी किंमतीत धान्य मिळते, सबसिड्या आहेत, जीवनदायी योजना आहेत, कमी उत्पन्नावर आधारीत शिष्यवृत्याही आहेत, अशा अनेक योजना आहेत. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही गरीब आहात म्हणुन शुद्र नाही तर तुम्ही शुद्र आहात म्हणून तुम्ही गरीब आहात. म्हणून आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत म्हणजे एका विशिष्ट माणसाला नाही तर एका विशिष्ट जातीसमुहाला दिलेले आहे. काहीजण म्हणतात कलेक्टरचा मुलगाही आरक्षण घेतो. याचा अर्थ एक वर गेला याचा अर्थ पुर्ण जात वर गेली असा होत नाही. माणूस कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्यांच्या जातीनुसार अवहेलना वाट्याला येतेच. उदा. एखाद्या कार्यालयात जसे शुद्र असतात तसेच शुद्रेत्तरही असतात. एखादा सवर्ण चुका करत असेल तर लोक त्या, त्या व्यक्तीला दोष देतात पण एखादा शुद्र समाजातला चुका करत असेल तर 'ये साली जातही ऐशी है' असं म्हणून सरसकट संपुर्ण शुद्र समाजाची निंदा केली जाते. यामागे दडलेली असते, जातीयतेची सुप्त भावना. म्हणूनच गरीब श्रीमंत बनू शकतो. मात्र शुद्र कितीही मोठा बनू द्या, तो शुद्रच राहतो.
         आर्थिक आधारावर आरक्षण हे दिलेलेच आहे. ओबीसींनी ओबीसीमध्ये साळी, कोळी, याच बरोबर माळी, कुणबी या शेतकरी जातीबरोबरच दैवेज्ञ ब्राम्हण या उच्चवर्णीय जातींचासुद्धा समावेश आहे. ओबीसींना आरक्षणाचा निकष सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणा हा आहे. त्याला क्रिमीलियरची अट लावली आहे. कारण जर ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थान झाले तर यांना वगळता येते. अशाप्रकारे आरक्षण दिले आहे. तरीही आरक्षणावर गोंधळ आणि संभ्रम असून आरक्षणाचा बँड लोक वाजवत आहेत. 
         महत्वपुर्ण बाब ही की एस सी आणि एस टी चे निकष अस्पृश्यता आणि शोषण आहे. कारण ते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही उच्चनिच्चतेची त्यांच्याबद्दलची भावना जात नाही. आता लोक म्हणतात ते सर्व सोडा, आरक्षण कधी संपणार? मात्र आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. मग प्रतिनिधित्व संपायला पाहिजे का? लोक यात खोलवर जात नाहीत आणि नंतर गैरसमज करुन घेतात. समजा १०० जागा आहेत, नोकरीच्या. यामध्ये प्रत्येक जातीचे लोक यायला पाहिजे. पण दुर्दैवाने या पदावर sc, st, nt ची पदे भरली जात नाहीत. कारण उमेदवार निवडणारेच उच्चवर्णीय असतात आणि म्हणूनच मागासलेल्या जाती आणखीन मागास राहतात.
       दिल्लीत कॅबीनेट सचिवांची छ्यानव पदे. यात एससी किती तर फक्त एक? ओबीसी किती? तर चार. म्हणजे उरलेल्या जागा उच्चवर्णीयांच्या ताब्यात आहेत. बॅकलॉग भरला जात नाही. तसंच संविधानानुसार एस सी एसटीला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि वरुन आरक्षण बंद करा. असं लोकांचं म्हणणं असतं.
          काही लोकं म्हणतात की स्वातंत्र्याला एवढी वर्षे झाली तरी लोक आरक्षण घेतात. मात्र हे लोक तेव्हा जाणिवपुर्वक विसरतात की एवढ्या वर्षांनीही हे लोक जातियता पाळतात. अन्याय-अत्याचारांच्या घटनांत घट होण्याऐवजी वाढच होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका मागासवर्गीय मुलीची फक्त सावली पाण्यावर पडली. म्हणून तिला मारलं, लातूरमध्ये अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्या शेतात चांगलं पीक आलं म्हणून जनावरे शेतात घातली. विरोध केला तर मारहाण केली. पी.एच.डी. करणारा हुशार विद्यार्थी रोहीत वेमुला याला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, एके ठिकाणी संपुर्ण मागासवर्गीय कुटूंबाला जाळलं, निष्पाप मुले बळी मारली, पंजाबमध्ये मागासांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारले, फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन मोबाईल मध्ये वाजवली म्हणून शिर्डीत तरुणाला मारलं. नंतर अंगावरुन रिक्षा नेली. गुजरातमध्ये चांभारांना अमानुषपणे मारुन त्यांच्यावर लघुशंका केली.
         आजही परिस्थिती काही बदलली नाही. आजही कोणत्या अस्पृश्य व्यक्तीनं केलेलं चांगलं काम इतर उचूच वर्गाला खटत नाही. त्यासाठी संपुर्ण प्रमाणात बहिष्कार टाकले जात आहेत. शासन प्रशासन हे रोखण्यासाठी हतबल ठरतंय. कारण ठराविक वर्गाला हे होऊच द्यायचे नाही आणि म्हणूनच मोक्याच्या ठिकाणी बहुजनांनी, मागासवर्गीयांनी जायला हवे. म्हणूनच आरक्षण आहे.
        आरक्षण आपल्याच देशात नाही तर इतरही देशात आहेत. अमेरिकेच्या अफेर्मेटिव अँक्शन पॉलिसीमध्ये श्वेत अमेरिकेनबरोबर अश्वेत अमेरिकन व इतर, त्यांनाही प्रतिनिधित्वाची संधीची तरतुद केलेली आहे. आरक्षणाच्याबाबतीत नेहमीच गुणवत्तेचा बाऊ केला जातो. जसे काही गुणवत्ता ही मिरासदारी आहे. 
         आरक्षण काही फुकट मिळत नाही. जरी आरक्षण असलं तरी त्याला शिक्षण घ्यावंच लागतं. एखादी पोस्ट असली आणि आरक्षण आहे म्हणजे कोणत्याही अडाणी माणसाला त्यात निवडले जात नाही. त्यालाही शिक्षण पुर्ण करावं लागतं. तोही त्याच शाळेत शिकतो ज्या शाळेत उच्चवर्णीय शिकतो, तोही तोच अभ्यास करतो, जो उच्चवर्णीय करतो, त्यालाही तेच शिक्षक शिकवतात जे उच्चवर्णीयाला शिकवतात, तोही तिच परीक्षा देतो जो उच्चवर्णीय देतो, पास होतो, मगच निवडला जातो. असे असूनही जर कोणी गुणवत्तेचा बाऊ करत असेल तर ते चुकीचे आहे. मेरीटचा प्रश्नच येत नाही. उदा. समजा घोड्यांची शर्यत चालू आहे. पण एक घोडा लंगडा आहे. तगड्या घोड्यांनी जाणीवपुर्वक लंगडं केलं त्याला. मग कशी होणार शर्यत? त्या घोड्याला रेषेच्या थोडं पुढे उभं करावंच लागेल तरच शर्यत होईल खरी. यालाच म्हणतात आरक्षण.
           जाती नष्ट व्हायला पाहिजे. तरच आरक्षण नष्ट होईल. आरक्षण हे जरी कृत्रिम असलं तरी एकप्रकारे त्याला नैसर्गिकच म्हणावे लागेल. कारण आरक्षणामुळे नैसर्गिक मानवी हक्क मिळतात. म्हणजेच आरक्षण दुसरं तिसरं काहीच नसून फक्त प्रतिनिधित्वाची संधी आहे.
          आरक्षणामुळे देश मागे जात आहे, अशी ओरड आरक्षणविरोधी लोक करतात. खरंतर आरक्षणामुळेच देश पुढे जात आहे. कारण त्या लोकांनाही संधी मिळत आहे. जे लोक हजारो वर्षापासून वंचित होते. देश कोणत्या गोष्टीमुळे मागे जात आहे तर जातीयतेमुळे. परंतु ही सत्य बाब लोकं मानायलाच तयार नाहीत. 
            आरक्षण हे ५०% पेक्षा जास्त नसते. म्हणजे या देशातले ८५-९० % लोकांमधून फक्त ५०% लोक निवडतील आणि उरलेल्या ५०% जागेवरती जे अल्पसंख्येने आहेत ते सर्व निवडतील. एक असंच प्रकरण. एससीच्या त्याच्याकडे संपुर्ण गुणवत्ता असूनही केवळ त्याने ओपनमधुन फॉर्म भरला आणि मुलाखतीमध्ये त्याला सांगितलं अस करता येणार नाही. बघा हीच आजची मानसिकता आहे.
         आज बहुजन उद्धारक राजे शाहू , राष्ट्रपिता फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाहीत. परंतु त्यांची शिकवण आपल्यात आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचा आपण प्रत्येकाने गांभीर्यपुर्वक विचार केला पाहिजे. आजच्या सुशिक्षित तरुणांनी समाजात याविषयी जागरुकता निर्माण करायला हवी. लाचारीने आपण जीवन जगू नये. त्यामुळंच आरक्षणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंतर्भुत केले आहे. (आरक्षणाचा हा लेख कुणाचा आहे हे माहित नाही. दै लोकमतला दि. ०७/०८/२०१७ ला छापून आलाय. असं ग्रुपवर पाठविणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं. मी संदर्भासाठी लेख घेतलाय.)