६
आज देशाची परिस्थिती पाहता जाणवते की देशात बहिर्गत स्वातंत्र्य आहे. अंतर्गत स्वातंत्र्य नाही. आता सहज लोकांना प्रश्न पडू शकतो. बहिर्गत व अंतर्गत स्वातंत्र्य आहे? म्हणजे काय? तर त्याचं उत्तरच भारतीय स्वातंत्र्यात दडलेलं आहे. भारत दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्यासाठी घराघरात तिरंगा लावतो. शाळेशाळेतील प्रभातफेऱ्या काढतो. कशासाठी? तर भारतीय लोकांना स्वातंत्र्याचा विसर पडू नये. त्यांनाही लक्षात राहावं, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते. त्यांनाही आठवण असावी, भारतीय स्वातंत्र्यासाठी जीव गमावलेल्या लोकांची. बिचाऱ्यांना आवड नव्हती की आपण देशासाठी मरणागती जावं. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपण इंग्रजांशी भांडावं. ज्याचा इंग्रजांना राग येवून त्यांनी आपल्याला फाशी द्यावी. परंतु ती फाशी वा ती जन्मठेप त्या लोकांना माहित होती. इंग्रजांच्या विरोधात लढण्यानं आपल्याला फाशी होईलच हेही त्यांना माहित होतं. तरीही ते लढले व त्यांच्या लढाऊपणाचा इंग्रजांना राग आला व त्यांनी त्यांना फाशीवर चढवले. आज ते शहीद ठरले. परंतु हे जरी त्यांनी देशासाठी चांगलं कार्य केलं असलं आणि आपल्यासाठी ते चांगलं कार्य असलं तरी आपण त्या कार्यांना चांगलं कार्य मानतो काय? याचं उत्तर नाही असंच येणार. कारण आपण स्वार्थी आहोत. स्वार्थी बनलो आहोत.
स्वार्थपण...... आपण स्वार्थी आहोत व स्वार्थी बनलो आहोत. खरं आहे. मग ती मंडळी स्वार्थी होती की नव्हती? होती, तिही मंडळी स्वार्थी होती. तिही मंडळी आपल्या देशाप्रती स्वार्थी होती. कारण त्यांच्यात देशभक्ती कुटकूट भरलेली होती. त्यांनाही वाटत होतं की आमचा देश स्वतंत्र बनावा. आमच्याही देशात प्रजासत्ताक राज्य यावे. लोकांचे राज्य यावे. म्हणूनच ते इंग्रजांविरुद्ध लढले. प्राण गमावला. या गोष्टी आपल्यालाही माहित आहेत. आपण त्यांच्यामुळेच स्वातंत्र्य उपभोगतो. स्वातंत्र्याचा आश्वाद घेतो. मात्र नेमके त्या शहिदांना विसरतो की ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. होय, आपण विसरतोयच त्यांना. कारण आपल्याला आज नंदूरबार जिल्ह्यातील शिरीषकुमार, धनसुखलाल आठवत नाही की ज्यांनी इंग्रजांविरोधात शाळेतून प्रभातफेरी काढली होती. ज्यात पोलिसांनी लाठीमार करुन त्या इवल्याशा आठवी, नववीला असणाऱ्या मुलांना जीव गमवावा लागला होता. आपल्याला आज जालियनवाला बाग हत्याकांड आठवत नाही की ज्या सभेत इंग्रजांनी अंधाधुंद गोळीबार केला असता शेकडो लोकांना विरमरण आलं. तसंच आपल्याला चलेजावच्या उठावातील भुमीगत झालेली ती मंडळी आठवत नाहीत की ज्यांनी चलेजावच्या उठावात तर भाग घेतला होता. परंतु पुढे फाशीच्या धाकानं ते भुमीगत झाले होते. ते मरण पावले की मारले गेले. हे कळलं सुद्धा नाही. आपल्याला सायमन कमीशनला काळे झेंडे दाखवितांना झालेल्या लाठीमारात शहीद झालेला लाला लजपतराय आठवत नाही. त्यातच भारतीय स्वातंत्र्य मिळवितांना असहकार आंदोलन असो की सविनय कायदेभंग आंदोलन असो. अशा कितीतरी घटनांमध्ये भारतीय लोकं शहीद झाले. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत स्वखुशीनं भाग घेतला. काहींनी मजबुरीनंही भाग घेतला. परंतु भाग घेतलाच. काही भाग घेवून भुमीगत झाले. त्यातही काही सापडले आणि ते जेव्हा सापडले. तेव्हा त्यांना इंग्रजांनी चक्कं फाशीच दिली. काहींना जन्मठेप आणि जन्मठेप काय असते. हे विं दा. सावरकरांनी आपल्या जन्मठेप या पुस्तकात लिहूनच ठेवलंय. त्या महाभयंकर यातना आणि त्यातच सुर्याचं दर्शन होणार नाही अशी ती कालकोठडी. आठवा त्यांना फाशी होत असलेली घटना. आठवा त्यांच्या तोंडावर काळा कपडा न घालता, त्यांचे हातपाय बांधून उघड्या डोळ्यानं त्यांना डोहात ढकलण्याचं दृश्य. अन् हेही आठवा की त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून कोरड्या विहिरीत वा दरीत ढकलणं. ज्यात समजा तो वाचलाच तर जगण्याची इच्छा असूनही तो हातपाय बांधले असल्यानं वर येणार नाही. त्यातच तो तडपू तडपू मरेल. ते त्यांनी का सहन केलं? ती जन्मठेपेची व काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे काही जण तिथंच शिक्षा भोगतांना संपले. काहीजण परत आले. त्यांनी जेव्हा तेथील भोगलेल्या हालअपेष्टा आपल्या पुस्तकात लिहिल्या. काहींनी कथन केल्या. त्या हालअपेष्टा वाचतांना वा ऐकतांना आजही अंगावर शहारे येतात. परंतु ते सगळं काही केलं आपल्यासाठी. कारण त्यांना वाटत होतं की माझा देश हा खरंच स्वातंत्र्य व्हावा. माझ्या देशातील प्रत्येक तळागाळातील व्यक्ती स्वातंत्र्य व्हावा.
आज आपण स्वतंत्र्य झालो. परंतु खरंच स्वतंत्र्य झालो काय? ही विचार करायला लावणारी बाब आहे. आपण आज बहिर्गत स्वतंत्र्य झालो. अंतर्गत स्वतंत्र्य नाही. बहिर्गत स्वातंत्र्य म्हणजे विदेशी शत्रूंपासून मिळविलेले स्वातंत्र्य. जसे दिडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज, चारशे साडे चारशे वर्ष राज्य करणारे मुघल, त्याही पुर्वी तिनशे साडे तिनशे वर्ष राज्य करणारे अरब, अन् त्यापुर्वीचा इतिहास आहे राजेशाहींचा. तेव्हाही आपण गुलामच होतो. आपल्याला ब्र म्हणायचीही मनाई होती. प्रजासत्ताक राज्य नव्हतंच. आज मात्र खऱ्या अर्थानं स्वतंत्र्य आहोत व स्वतंत्र्यता उपभोगतो आहोत. पशुपक्षांना आणि वृक्षवल्लीलाही स्वतंत्र्यता आज प्राप्त झालेली आहे. फक्त मासे, बकरे व कोंबड्यांना स्वतंत्र्यता नाही. त्यांनाही काही दिवसांनी स्वतंत्र्यता मिळेलच. आता बाकीची जनावरंही लपूनछपून कापतात, तो भाग वेगळा. माणूस मात्र सर्वतोपरीनं स्वतंत्र्य झालेला आहे. असं असतांना खरंच माणूस नावाची पुर्ण प्रजात स्वतंत्र्य आहे काय? याचं उत्तर नाही असंच आहे.
आपला भारत देश. हा देश त्या शहिदांनी स्वातंत्र्य केला, आपल्या प्राणांचं बलिदान देवून. परंतु आज माणूस नावाच्या या प्रजातीत दोन गट पडले. एक शक्तीवान गट तर दुसरा शक्तीहिन गट. शक्तीवान गटात अधिकारी वर्ग, व्यापारी, उद्योगपती, कारखानदार, नेते, गुंडे बदमाश, उच्च जातीची मंडळी तसेच श्रीमंत लोकांचा समावेश होतो. तर शक्तीहिन गटात शेतकरी, सामान्य मजूर, भुमीहिन शेतमजूर, अनाथ मुलं, वयोवृद्ध मंडळी, काही स्रिया आणि काही निवडक जाती यांचा समावेश होतो. त्यातच अधिकारी वर्गांना वेतन उच्चप्रतीचं असूनही ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुटतात. तसेच व्यापारी हे शेतकरी वर्गांना लुटतात. त्यातच कारखानदार आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या मजूरांना. तशीच काही उच्च जातीतील मंडळी हे आजही कनिष्ठ जातीवर अत्याचार करतात. काही मांत्रीक आजही नरबळीच्या नावार अतिशय क्रुरतेने बालकांची हत्या करतात. शिवाय काही तरुण स्रिया वा पुरुष आपल्याच घरातील आबालवृद्ध म्हाताऱ्या लोकांचा छळच करतात. कधी शहाण्या घरातही हुंड्याच्या नावावर मुलींचा छळ केला जातो नव्हे तर मारुनही टाकतमलं जातं. त्यातच काही स्रिया लैंगिकतेची कसोटी लावून आपल्याच लेकरांना अनाथ करुन त्यांच्या हालअपेष्टांना मारक ठरतात. त्यावेळेस विचार येतो की हेच का स्वातंत्र्य? याच स्वातंत्र्यासाठी ती मंडळी शहिद झाली असावी? आज त्यांच्या आत्म्यांची आपण कल्पना केली तर त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल. त्या आत्मा विचार करीत असतील की हेच का स्वातंत्र्य की ज्या स्वातंत्र्याची आपण कल्पना केली होती.
विशेष सांगायचं झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांनी का करावा भ्रष्टाचार? त्यांच्या नशिबानं त्यांना जे वेतन मिळतं. ते पुरेसं असतं. काही लोकांना तेवढाही पैसा मिळत नाही. तरीही ते जगतातच ना. तसंच उच्च जातीनं कनिष्ठ जातीवर का करावेत अत्याचार? त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी त्या शहिदांनी त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला नाही काय? अन् शक्तीवान घरात सुनेवर हुंड्यासाठी का व्हावेत अत्याचार की ज्या सुनेलाही स्वातंत्र्यानंतर राजरोषपणानं जगण्याचा अधिकार मिळाला. तसंच त्या महिला पुरुषांनी लैंगीकतेसाठी का भरकटावे. शहिदांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देतांना याचा विचार केला होता काय? एवढंच नाही तर सुनांना शहिदांनी ती प्राथमिकता दिली नाही की त्यांनी त्यांचेवर अत्याचार करावा. तशीच नेत्यांना ती मुभा दिली नाही की त्यांना आत्महत्या कराव्या लागतील. ज्यांच्या मलाचे मुल्य शेतात न जाणारे व्यापारी ठरवतील. तसंच कारखानदारालाही ते सांगीतलेलं नाही. तरीही आम्ही आज भ्रष्टाचार करतो. शेतकरी वर्गाला आत्महत्या करायला बाध्य करतो. अंधश्रद्धेच्या बुरख्याआड तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पशुंनाही स्वातंत्र्य मिळाले असतांना त्यांचा नाहक बळी घेतो. कधी नरबळीही घेतो. सासू सुनेची तर गोष्टच सोडा. कधी सासू सुनेचा छळ करुन तिला मारुन टाकते तर कधी सुन सासूचा छळ करुन तिला मारुन टाकते. शहिदांनी यासाठीच आपलं बलिदान दिलं काय?
महत्वपुर्ण बाब ही की सर्वांनाच आत्मसन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार असतांना आपण कोण होतो, त्यांचं स्वातंत्र्य हिरावणारे. परंतु आपण हिरावून घेतोय त्यांचं स्वातंत्र्य. कारण आपण बहिर्गत स्वतंत्र्य झालो, अंतर्गत नाही. जेव्हा आपण अंतर्गत स्वतंत्र्य होवू. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र्य होवू असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अंतर्गत याचा अर्थ आपलं मन व आपलेच लोकं. आपण खरं तर आपल्या मनातून स्वतंत्र्य व्हायला पाहिजे. तेव्हाच सगळी जीवंत मंडळी, पशुपक्षी व वृक्षवल्लीही स्वतंत्र्य होईल. हे तेवढंच खरं. जेणेकरुन शहिद होणाऱ्या त्या मृतात्म्यांनाही बरं वाटेल व तेही सुटकेचा श्वास सोडतील. तसंच आपण आपल्याच लोकांकडून स्वतंत्र्य व्हायला हवं की जी आपल्याच देशातील आपलीच मंडळी आपलेच पाय खेचतात. आपल्या विकासाचे मार्ग बंद करतात.
रामदास असाच भ्रष्टाचार करणारा असल्यानं व तो शेतीच्या कामाचे पैसे घेत असल्यानं त्याच्यावर लोकांचा डोळा होता. लोकांनी ठरवलं होतं की त्याला एखाद्या प्रकरणात फसवावं. तसे ते त्याचेवर डोळाच ठेवून होते व तशी संधी शोधत होते. अशातच एकदा तशी संधी चालून आली व एका व्यक्तीनं त्याला फसवलं.
तो एक गरीब शेतकरीच होता. त्याच्या वहिलांची शेती होती. ती शेती अल्प होती व त्या शेतीचे तुकडे करुन त्याला बहिणीला हिसा द्यायचा होता. ज्यात त्याचा व बहिणींचा वाद निर्माण झाला होता. त्या व्यक्तीला शेती विकायची नव्हती. मात्र त्याच्या बहिणीला शेती विकायची होती. परंतु शेतीचे वाटणीपत्र बनत नसल्यानं वाद होता. त्या प्रकरणात रामदासला त्या शेतकऱ्यानं विचारलं असता त्यानं स्पष्ट नकारच दिला होता. प्रकरण जेव्हा त्याला माहित झालं. तेव्हा त्यानं त्या प्रकरणाचा फायदा घ्यायचं ठरवलं व बदल्यात एक मोठी रक्कम त्यानं त्या व्यक्तीला मागितली.
अनिरुद्ध त्या व्यक्तीचं नाव. अनिरुद्ध हा त्या शेतकऱ्याचा मुलगा. त्याचेजवळ पैसे नव्हते. तसा तो गरीब. त्याच्या बहिणी त्याला शेती विक म्हणून तकादा लावायच्या. परंतु त्याला शेती विकायची नव्हती. वाटत होतं की शेती जर विकली तर आपण काय खाणार? जगणार कसे? शिवाय रामदासचा सल्ला घेतला तर तोही आढेवेडे घेतच होता. शेवटी त्यानं ठरवलं. आपला वाद अशानं सुटत नाही. आपल्याला तलाठ्यानं मदत करायला हवी होती. त्याबदल्यात पैसे मागायला नको होते. जे त्याचे कर्तव्य आहे. हे एका झटक्यात होणारे काम आहे. परंतु आपण अडलोय. तलाठ्यानं आपली अडवणूक केलीय. आता आपण तलाठ्यालाच फसवायला हवं. कारण तो लाच घेवून गलेलठ्ठ बनलाय.
अनिरुद्धला तलाठ्याच्या घरची परिस्थिती माहित होती. तो पुर्वी कसा होता? त्याच्या घरची परिस्थिती पुर्वी कशी होती? नोकरीवर लागल्यावर त्याच्या घरची परिस्थिती कशी सुधारली? लाच म्हणून तो पैसे खातो की नाही?
अनिरुद्धच्या घरचा वाद. त्यातच जवळ पैसे नसणं. या गोष्टीनं चिडलेला अनिरुद्ध. त्याला रामदासनं लाच म्हणून पैसे मागताच अनिरुद्धनं ठरवलं की त्याला आपण धडा शिकवावा. शेवटी तो रामदासशी गोड गोड बोलला व म्हटलं की त्यानं काम करावं. तो अमूक अमूक दिवशी कामाचे पैसे देणार. शेवटी अनिरुद्धनं रामदासला पैसे देण्याचं आश्वासन देताच रामदास त्याचं काम करुन द्यायला तयार झाला.
रामदासनं अनिरुद्धचं काम करुन देण्याचा होकार दिला होता. त्यानंतर अनिरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला. त्यानं अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्या भेटीतून त्यानं संबंधीत अधिकाऱ्याला झालेला प्रकार सांगीतला. त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यानं जाळं पसरवलं व काही पैसे अनिरुद्धला दिले. अनिरुद्धनं ते पैसे रामदासला दिले व लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी रामदासला रंगेहाथ पकडलं आणि त्याची नोकरी गेली. तसा तो घरी बसला.
आज रामदास घरी बसला होता. त्यानं न्यायालयात खटला दाखल केला होता. परंतु त्या खटल्यात पैसा लागत होता. जवळ पैसा नव्हताच. त्यातच काय करावं सुचत नव्हतं. अशातच तो खटला हारला व त्याची नोकरीही कायमचीच गेली व आता त्याच्या घरात सातत्यानं उपासमार होवू लागली होती. जी उपासमार जीवघेण्या स्वरुपाचीच होती.