Reunion - Part 30 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 30

Featured Books
  • સાથ

    શહેરની પ્રખ્યાત દાસ કોલેજના મેદાનમાં રોજની જેમ સવાર સવારમાં...

  • ગાંધીનગર

     બોમ્બે રિઓર્ગેનાઇઝેશન એક્ટ, ૧૯૬૦ હેઠળ રચાયેલા આશરે ૧,૯૬,૦૦૦...

  • મારા ગામનું મંદિર

    મારા ગામનું મંદિરમારું ગામ નાનું છે, પણ તેની ધરતી પર પ્રેમ,...

  • નીરવા

    સપ્ટેમ્બર મહિના ની સોળ તારીખ ના રાત ના ૯:૩૦ એ ત્યારે જ્યારે...

  • શ્રીરામભક્ત શ્રી હનુમાનજી

                    ચાલો આજે આપણે શ્રીરામભક્ત હનુમાનજી — ભક્તિ,...

Categories
Share

पुनर्मिलन - भाग 30

नयनाच्या विचारण्यावर “ अग खूप सज्जन आहत ते कॉलेज मधले एक प्रोफेसर आहेत  जुन्या ओळखीतले पूर्वी एकदा आर्थिक अडचण होती त्यांची म्हणून त्यांनी दिलेल्या पार्टीचे पैसे त्यांनी उधार ठेवले होते .तेच  परत करायला ते येणार होते.  “अशी सध्या सारवासारव करून आता नवीन प्रश्न नको म्हणून विषय बदल करीत  ऊमा म्हणाली .., ”वा खिचडीचा आणि पापडाचा खमंग वास तर मस्त सुटलाय ,चल बाई जेवायला बसुया फार भूक लागली आहे मला कधीची “एरवी आठ पर्यंत जेवणे उरकत असत .आज दहा वाजायला आले होते ..हो चल बसुया.तुला उशीर होणार म्हणलीस पण  इतका उशीर होईल असे वाटले नव्हते ..मग मीच मगाशी खिचडी टाकली आणि पापड पण तळून ठेवले   . नयना ताटे घेत म्हणाली ..दोघींसाठी टेबलावर पाणी ठेऊन गरम गरम खिचडी दोघींच्या पानात घेत नयनाने त्यावर तूप वाढले ..शेजारी लोणचे घातले आणि सोबत पापड ठेवला ..इतके निगुतीने आणि प्रेमाने वाढणाऱ्या नयनाकडे पाहून ऊमाचे मन भरून आले “शहाणी ग माझी बायो ती ..आईची कीती काळजी घेते “असे ऊमाने म्हणताच नयना हसली .ऊमाच्या मनात आले ...साधे दुकानातून यायला एक दिवस उशीर झाला तर ही छ्प्पन प्रश्न विचारते . त्यांना उत्तरे देताना आपल्याला पुरेवाट होते .मग सतीशविषयी जर हिला समजले.. तर किती आणि कायकाय प्रश्न विचारेल ..?कशी उत्तरे द्यायची ?आणि होईल का समाधान हीचे ?पुढचे सगळेच आणखीनच .. कठीण वाटू लागले ऊमाला .दोघीजणी जेवायला बसल्या .गरम चविष्ट खिचडी, तूप, पापड, लोणचे खाताच ऊमाचे डोके पण जरा शांत झाले .जेवताना नयना बरेच काही इकडचे तिकडचे सांगत होती .कॉलेजमधले काही घडलेले वगैरे ..खरेतर अशा गप्पांचा त्यांचा रोजचा शिरस्ता होता दिवसभरकाय घडले हे त्या एकमेकीत बोलायच्या पण आज मात्र ..ऊमाच्या डोक्यात काहीच शिरत नव्हते ती फक्त हं हं ..हो का असे काहीतरी संदिग्ध बोलत होती आपल्या इतक्या बोलण्यावर आज आई काहीच न बोलतानुसतीच हुंकार टाकत आहेहे जाणवून नयना म्हणाली,”आई अग कुठे लक्ष आहे तुझे ..नुसती हं हं काय करते आहेस ?”ऊमा एकदम दचकली ..लगेच तिला लक्षात आले की मोहनच्या प्लानप्रमाणे सतीशच्या येण्याची बातमी सांगायची हीच वेळ आहे .धाडस करून ती नयनाला म्हणाली  ,“नयन अग मगाशी मोहनमामाचा फोन आला होता मलात्याचाच विचार करीत होते  तो म्हणत होता त्याचा एक मित्र येतोय आपल्याकडे ..उद्या ““कोण मोहनमामाचा मित्र ?आणि आपल्याकडे का येतोय तो ?झाले ..झाले ....नयनाचे परत प्रश्न सुरु झाले ..मग ऊमा समजावणीच्या स्वरात तिला म्हणाली “हे बघ नयन मोहनमामा गेलाय मुंबईला त्याच्या अनुपस्थितीत तो मित्र अचानक येतोय ना ..त्याची इथे कुठल्याच हॉटेलला राहायची सोय होऊ शकली नाही गम्हणून आपल्या घरी ठेवून घ्या एक दिवस.. असे मोहनमामा म्हणाला “ऊमाने त्यातल्यात्यात पटकन सांगायचा प्रयत्न केला . ..पण एवढ्यात हे संपणार नव्हते .या घराला कित्येक वर्षात पुरुष माणसाची अजिबात सवय नव्हती.मोहन सोडता कोणताही पुरुष घरी कधी येत नसे . कधी मोहन जरी आला तरी काम झाले की लगेच परत जात असे घरात मुक्कामाला राहायला म्हणून कधीच कोण आले नव्हते एक तर घर अगदी छोटे ..त्यात हा कोणीतरी अनोळखी माणूस आईचे बोलणे ऐकून नयना अस्वस्थ झालेली दिसत होती  ...तडक ती आईला म्हणाली “आई मोहनमामाला सांग ना आमच्या घरी नको पाठवू त्याला .कसा राहील तो आपल्यासोबत या छोट्या घरात ..?”तिची ही उद्विग्नता बघून ..आता मात्र हा विषय आवरता घ्यायला हवा नाहीतर नयनाच्या या भडीमारातुन आपली सुटका नाही हे ऊमाला समजले मग ऊमाने वेगळाच पवित्र घेतला ..ती थोडीशी रागावून म्हणाली ,नयन काय हे तुझे बोलणे ..?घरी येण्याऱ्या पाहुण्याविषयी असे बोलतात का ?आणि तुझ्या लाडक्या मामाचाच मित्र आहे ना तो ?इतर वेळेस मात्र मामाकडून हक्काने हवे ते मागत असतेस आणि आता एक दिवस त्याच्या मित्राची आपल्याकडे सोय कराअसे तो म्हणाला तर काय नको तुझ्या मित्राला पाठवू असे सांगायचे का ?बरे दिसते का असे बोलणे ?ऊमा मनातून जरा बिचकतच पण रेटून हे बोलली होती आईचा असा रागाचा स्वर ऐकुन मात्र कशी काय कोण जाणे नयना वरमली तिचा चेहेरा थोडा पडला ..आणि ती गप्प झाली आई कधीच असे आपल्याशी बोलत नाही... आपल्याला रागावत तर कधीच नाही मग आज अशी काय वागत असेल बरे ...खरेतर नयनाला अजूनही मोह्नमामाच्या मित्राच्या घरी येण्याची गोष्ट पटली नव्हती .पण आईशी ती कधीच वाद घालत नसे त्यामुळे ती गप्प बसली .आणि गुपचूप झोपण्यासाठी अंथरूण घालायच्या तयारीला लागली.आता ऊमा पण निश्चिंत झाली .सध्या तरी नयनाला गप्प बसवण्यात ती यशस्वी झाली होती थोड्याच वेळात लाईट बंद करून दोघी झोपल्या . रात्रभर नयनाच्या शेजारी ऊमा झोपली होती .झोपली कसली डोळे मिटून पडली होती ..पण नुसते डोळे मिटून पडले तर झोप थोडीच येणार ?विचारांचा भुंगा नुसते डोके खात होता ..झोप न लागलेल्या अशा कैक रात्री रमाच्या आयुष्यात आजपर्यंत आल्या होत्या .पण ही आजची रात्र मात्र सगळ्याचा कळस होता .रात्रभर नुसते विचार विचार आणि विचार ..भविष्यात काय घडणार आहे याचे फक्त तर्क वितर्क ..!कशी असेल आपल्या तिघांचे हे पुनर्मिलन ..?मागच्या वेळेस सुद्धा सतीशने या पुनार्मिलनाचा प्रयत्न केलाच होता .पण काय झाले तेव्हा नुसतच मनस्ताप ..आणि शेवटी सतीश आला नाही तो नाहीच ...अशा अनेक विचारात त्या लांबलचक रात्रीनंतर सकाळ उजाडली इतकेच घडले .उजाडताच ऊमा उठली आणि रोजच्या कामाला लागली . कामाच्या नादात थोडेसे विचार तरी मागे पडतील असे तिला वाटले .ऊमाची नेहेमीची कामे होता होता नयना पण उठली .“का ग इतक्या लवकर का ग उठलीस “असे ऊमाने विचारताच नयना म्हणाली .“आई ग काल तुला सांगायचेच राहिले ..आज सर जरा जादा वेळ क्लास घेत आहेत त्यामुळे आम्हाला थोडे लवकर बोलावले आहे .मला आवरून आता निघायला लागेल . रितू येईलच मला बोलवायला तु पटकन मला खायला काहीतरी कर  “असे म्हणून ती चटकन कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरली .ऊमाने लगेच तिच्यासाठी पोहे टाकले आणि दुसरीकडे चहाचे आधण ठेवले .नयना आवरून टेबलवर खायला आली .तिच्या आणि आपल्या पोह्यावर ऊमाने खोबरे, कोथिंबीर टाकली .आणि नयनाची प्लेट तिच्यापुढे सरकवली .तयार झालेला चहा पण दोघींच्या कपात ओतला .“आज ते पाहुणे येणार आहेत म्हणून मी सुट्टी घेतलीय असे उगाचच नयनाला सांगून “किती वेळ आहे ग हा जादा तास ? असे ऊमाने विचारताच “दोन तास घेणार म्हणले आहेत ,नऊ ते अकरा ..मी येतेच साडेअकरा पर्यंत ..”असे नयनाने सांगितले ..नयना खात असताना चोरट्या नजरेने ऊमा पण तिच्याकडे पहात होती नयनाचे मात्र तिच्याकडे अजिबात लक्षच नव्हते .ती तिच्याच विचारात खात होती .पटापटा खाऊन नयनाने तिची वह्या पुस्तके गोळा केली .बाहेर रीतुच्या स्कुटरचा हॉर्न वाजताच नयना आई जाते ग ..असे सांगुन चप्पल घालून बाहेर पडली .क्रमशः