Quotes by शिवव्याख्याते सुहास पाटील in Bitesapp read free

शिवव्याख्याते सुहास पाटील

शिवव्याख्याते सुहास पाटील

@suhaspatil0925
(49.2k)

चल मित्रा अंधभक्त समजून घेऊ –सुहास पाटील

चल मित्रा, अंधभक्त समजून घेऊ,
नेते बोलतात, पण माणूस रडतो, पाहू.
झेंड्याखाली फोटो, भाषणात जादू,
रस्त्यावर तरुण फसतो, खोट्याचं राडू.

वचनं फेकली पावसासारखी,
लोकांच्या खिशात काही शिल्लक नाही बाकी.
जयजयकार मंचावर, भीती रस्त्यावर,
कुठे न्याय, कुठे स्वार्थाचा चष्मा?

मित्रा, चालू रंग उघड पाहू,
अंधभक्ततेच्या कुंपणातून माणूस वाचवू.
शब्द आणि विचार हाच हत्तीचा ताव,
नेतृत्त्वाच्या खेळात फसण्याची नाही आपली जागा आज

चल मित्रा, अंध भक्त समजून घेऊ
चल मित्रा, डोळे उघड, सत्य समजून घेऊ,
अंध भक्तीच्या जाळ्यात, का बांधून राहू?
नेता म्हणे, "मीच सूरज, मीच चंद्रमा,"
खरं खोटं न पडताळता, का मानतो तू तमा?
त्याच्या प्रत्येक शब्दाला, का मानतोस खरा?
चल मित्रा, विचार कर, सत्याचा शोध घरा!
हातात फोन, डोळ्यात स्वप्न, मनात भक्तीची धुंद,
खोट्या बातम्यांचा गोंधळ, सत्य कुठे गहाण?
जात, धर्म, पंथ सारे, भेद निर्माण करतात,
अंध भक्तीच्या नादात, माणूस माणसाला मारतात.
चल मित्रा, पुस्तक उघड, बुद्धीला आव्हान दे,
प्रश्न विचार, सत्य शोध, अंध भक्तीला टाळ दे.
नेता माणूसच आहे, देव नाही कोणी,
सत्याचा दीवा हाती घे, नाही रात्र थांबणी.
चल मित्रा, अंध भक्ती सोड, स्वतःला समजून घेऊ,
सत्य, प्रेम, आणि बंधुता, मनात रुजवून घेऊ.
हातात हात घालू या, एक नवं जग बनवू,
चल मित्रा, अंध भक्त समजून, सत्याचा मार्ग धरू!चल मित्रा, अंध भक्तांच्या गळ्यातील फास कापू,  
डोळे फोडून, कान ठोठावून, सत्याचा तडाखा देऊ!  

जातीजातीत आग लावतात, धर्माधर्मात विष ओकतात,  
"हिंदू धर्म धोक्यात आहे" म्हणून, खोट्या भयाने लोकांना लुटतात,  
अंध भक्त हे कुत्रे बनतात, स्वामीच्या इशाऱ्यावर भुंकतात,  
चल मित्रा, हे विषारी कुत्रे हाकलू, तलवारीने कापू!  

परदेशी शक्ती, संस्था सगळ्या, दंगली घडवून देश तोडतात,  
सरकार पाडण्याचा घाणेरडा डाव रचतात, अंध भक्त हे गद्दार बनतात,  
शिक्षण? ते काय कचरा, म्हणतात, बुद्धीला आग लावतात,  
चल मित्रा, हे मूर्खांच्या डोळ्यात मिरची टाकू, शिक्षणाचा चाबूक मारू!  

खोट्या बातम्या, बनावट किस्से, कानात विष ओततात,  
चांगल्या माणसाला "देशद्रोही" ठरवत, परकीय पैसे घेतल्याचा थापा मारतात,  
आंदोलन करणाऱ्यांना "दहशतवादी" म्हणून, गोळ्या घालतात,  
शेतकरी हक्क मागतात, तरी त्यांना कुत्र्यासारखे हाकलतात!  
चल मित्रा, हे खोटे मुखवटे फाडून फेकू, रक्ताळलेल्या हाताने धडा शिकवू!  

अंध भक्तांच्या या घाणेरड्या जाळ्यात, देश बुडतोय, मरणार आहे,  
विचारशक्ती खून करतात, सत्याला गळफास लावतात,  
चल मित्रा, उठ, लढ, हे अंधकार चिरडून टाकू,  
सत्य, शिक्षण, एकता घेऊन, या गद्दारांना ठोकून काढू!  
अंध भक्तांना कठोर तडाखा देऊ, आक्रमकपणे, निर्दयीपणे,  
चल मित्रा, हे विष उखडून फेकू, स्वतंत्र विचारांचा रक्तरंजित विजय करू!

Read More

शुद्ध कोण?"
✍️ - एका व्यथित मनाची कवित

आज ही जातीनं का मोजता माणूसपण,
ईश्वराची कथा सांगने गुन्हा,आहे काय ?
खालच्या जातीचा आहे म्हणून  अपमान केला,
असे  वागताना मनातला देव का झोपला होता काय?

शेंटी कापून होते काय  काहो शुद्धीकरण,
मातीत मिसळलं माणुसपणाचं धन,
ईश्वराचे पावन कथा ऐकूनही न जागे,
का एवढं खालच्या थराला गेलय तुमचं मन?

स्त्रीच्या असो व कोणी ही  मूत्रानं शुद्ध होतो का जीव?
की शुद्ध माणुसकीतच असतो जीवंत जीव,
हा धर्म, ही श्रद्धा, की हे केवळ उच्चजातीचे उदात्तीकरण
धर्माच्या नावाखाली का केला जातो बहुजनांचा झळ .

कोणत्या ही जातीचे असो कथा सांगणारे हे गुन्हेगार नाहीत,
ते सत्य, स्वच्छ भक्ती,   आहेत देवाचे भोळे भक्त
शुद्ध कोण, हे ठरवण्याचा अधिकार तथा कथित कोणाला नाही .
वसुदेव कुटुंबकम हा नारा  विसरलं का भारत देश
कवी :  शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

प्रेम तर खूप वेळ झाला रे पण ते
पूर्ण पणे तुझ्या रूपात मला मिळालं ,
माझ्या नावाची टिकली ज्यावेळेस कपाळावर लावतेस ना पहात रहावा वाटतं तुझ्याकडे

लाजणारा चंद्र असो टिंब टिंबणारी चांदणी असो तू ज्यावेळेस हस्ते ना तुझ्यापुढे फिकाच असतो
तू ज्यावेळेस अहो म्हणून हाक मारते ना खरं सांगू ना आता वाटते की हृदय बंद पडते की

बिनधास्त खट्याळ आणि थोडीशी बालीश आहेस
पण खरं सांगू का तू खूपच भारी आहेस
देवाकडे कधी मी मागत नाही पण आई नंतर तुझ्यासाठी मी कोणत्याही देवाची पायरी चढू शकतो एवढं मात्र नक्की आहे
SUHAS PATIL

Read More

जगण्याचा आनंद शोधायला इतका धावलो
खरं सांगायचं झालं तर आनंद तर भेटलाच नाही शोधून आनंद जगण्याचा
पाय माझे थकलेच नाहीत
मन माझे मात्र थकले
कवी सु.भा.पाटील.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

जगण्याचा आनंद शोधायला इतका धावलो
खरं सांगायचं झालं तर आनंद तर भेटलाच नाही शोधून आनंद जगण्याचा
पाय माझे थकलेच नाहीत
मन माझे मात्र थकले
कवी सु.भा.पाटील.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

प्रेम म्हणजे काय विचारले तर तुझे नाव ओढांवर नकळत येते माझ्या,
मी किती स्वतःला थांबवलं तरीही पण काळीज तुझ्याच मागं भिरभिरू लागतं
कवी:- सु. भा. पाटिल.

- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

रंग सावळा जरी माझा,
तरी रंग गुलाबी हृदयी चढला.
प्रेमाचा इंद्रधनु माझ्या मनीचा ,
तुझ्या हृदयी  चमकत राहिला .
कवी :- सु भा पाटील

- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

या निळ्या नभिचा रंग माझा सावळा
सावळाच रंग माझा सावळीच काया,
जरा हृदयात झाकून बघ सखे माझ्या
माझ्या मनाचा रंग मात्र वेगळा
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

माझे शब्द जरी कडवे असले तरी भावना मात्र निरागस असतात ,
दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतःला विलन म्हणून घेत असतो.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

काय मी पेरावे कागदावर
तुझ्या रूपच वर्णन करताना
शब्द माझा शब्दाशी भाडत असतो
तुझ्या वरती लिहताना

कवी :- सु:भा. पाटील

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More