> नको मला ती इमारत जिथं माझा बाप नसेल,
मिळावी तीच झोपडी जिथं माझा बाप असेल.
नाही जरी जमली भक्ती देवाची मजला,
पाहून वडील भक्ती सह्याद्री पण गर्व करेल.
वडिलांच्या कष्टाला माझं सर्वस्व दान करेल,
वडिलांच्या सुखासाठी माझा देह सुद्धा दान करेल.
— कवी सु.भा.पाटील.