कठोर मनाचा बाप माझा,
म्हणून मी सन्मानाने जगत आहे...
केले काय काय माझ्यासाठी बापा,
हे शब्दांत मांडणे व्यर्थ आहे...
आयुष्यभर झिजला देह तुझा सारा,
माझ्या प्रत्येक दुःखात तूच उभा आहेस...
स्वतःच्या जखमा लपवून बाप,
माझ्या चेहऱ्यावरती हसू फुलवत आहेस...
का म्हणून पुजू ईश्वराला मी आता सांग,
माझ्या बापाच्या पायाशी माझं जग आहे...
लोक विठ्ठल शोधतात मंदिरामध्ये,
माझ्यासाठी माझा बापच विठ्ठल आहे... ❤️