भाग ४.
"डॉक्टरऽऽऽ डॉक्टरऽऽऽ",असा आवाज तिच्या कानावर पडतो. हा आवाज कोणाचा होता हे तिला ओळखायला वेळ लागला नाही. बाहेर थांबलेली ती रूमच्या आत निघून येते. पाहते तर टेडी बरा भिजला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड इरिटेड भाव दिसत होते. त्याला अस पाहून तिला हसूच येत.
"तुला कळत नाही का तू एक टेडी आहेस?",हसू आपल दाबत गायत्री त्याला विचारते. आता त्याला आठवत तसा तो नाही मध्ये मान हलवतो.
"मला सकाळी अंघोळ करायची सवय आहे. पण आता हे अस झाल आहे. कस सुकेल हे? वाटत नाही!",आपल्या अंगाकडे पाहत तो विचारतो. भिजला होता तो. बाथरूम मध्ये जाऊन शॉवर चालू करताच पाणी त्याच्या अंगावर पडले होते. थोड पाणी पडताच त्याच्या लक्षात आले तसा तो पटकन तिच्या नावाने ओरडत बाहेर आला. नशीब या वेळी अंतरा नव्हती. गायत्री बाहेरच घुटमळत होती. ती थोडी संभ्रमात होती. याने दार काही ओढून घेतला नव्हता म्हणून त्याचा आवाज तिला ऐकू गेला. तशी लगेच ती आली होती. याचा अवतार पाहून काही क्षणापूर्वी घाबरलेली ती आता हसू लागली होती.
"तुला माहित नसेल तर तुला सुकायला खूप वेळ लागेल. कारण टेडीच्या अंगात कापूस असतो. त्याला सुकायला वेळ लागत असतो. तू आता उन्हात जाऊन उभा रहा टेरेसवर.",गायत्री विचार करत म्हणाली. त्याला अस उदास पाहून दया येत होती त्याची तिला.
"नो.....मी काळा होईन..... गरमी बिलकुल सहन होत नाही मला डॉक्टर. एसीत राहायची सवय आहे ना. समजा करो कुछ!",टेडी घाबरत ओरडत म्हणाला.
"हळू ओरड.",गायत्री कानावर हात ठेवत म्हणाली.
"सॉरी....",लगेच तो बोलतो.
"तूच सूचव आता पर्याय. प्लीज आणि मगास साठी खूप मोठं सॉरी. मला अशाप्रकारे धमकी द्यायची नव्हती. पण तू ऐकत नव्हती डॉक्टर म्हणून मला धमकी द्यावी लागली. सॉरी पुन्हा एकदा.",टेडी तिचा चेहरा पाहत बोलत असतो. मगाशी ती खूपच घाबरली होती त्याला. तिला अस घाबरलेले पाहून त्याला काळजी वाटली होती.
"इट्स ओके. पुन्हा बोलला ना? तर तुला मदत नाही करणार मी. आधी तुला सुकवू आपण आणि नंतर बाहेर जाऊ!",गायत्री हसून म्हणाली. तिचे मन आधीपासून स्वच्छ आणि मोठ होत. याच कारणाने तिने लगेच त्याला माफ केलं होत.
"उन्हात नको टाकू डॉक्टर प्लीज प्लीज...", रिक्वेस्ट करत म्हणाला.
"उन्हात नाहीच नेणार आहे मी तुला. वॉशिंग मशीनच्या डायर मध्ये टाकू का?",विचार करत गायत्री त्याला विचारते. तो तर चांगलाच उडतो बोलणे ऐकून.
"नाही नाही. त्यात मी घुसमटून जाईल.",घाबरून तो बोलतो. या क्षणी त्याचे एक्स्प्रेशन पाहून तिला मनापासून हसू येत असते. ती रूम बंद करत त्याच्या जवळ हळूहळू येते. तसा टेडी तिला पाहून मागे मागे जात असतो. भीती होती त्याला आता तिची. गायत्रीचा चेहरा पाहून त्याला तिचे मन समजत नव्हते.
"डॉक्टर थांब! प्लीज, प्लीज...",तो आपल्या अंगावर हात ठेवत बोलत असतो. एका क्षणाला गायत्री त्याच्या जवळून क्रॉस जात तिथच टेबल मधील ड्रॉवर मधून हेअर डायर मोठा वाला काढून घेते. तो हातात धरत ती त्याला पाहते. जवळच्याच स्वीच मध्ये त्या हेअर डायरची पिन लावून ती हेअर डायर चालू करते.
"याने सुकवणार तू मला? हुश्श!!!",हात पुन्हा छातीवर ठेवत एक मोठा श्वास सोडत तो म्हणाला.
"तू मला लेट करत आहेस. लवकर बस इथे!",आता ती सरळ सरळ त्याला ऑर्डर सोडते. तसा तो तिच्या जवळ येऊन बसतो. गायत्री त्याला पाहते आणि हळूहळू हेअर डायर फिरवून त्याला सूकवू लागते. त्याची बडबड तिला ऐकावी लागते हे वेगळे होत. तो तिला कसा होता आधी? त्याच जीवन कस होत हे सांगत असतो. यात तो लव्हस्टोरी ही स्वतःची सांगून मोकळा होतो. गायत्री ही शांत ऐकत त्याला प्रश्न विचारत असते. जर त्याच्या बद्दल तिला थोड समजले, तरच ती त्याच्या संबंधी काही तरी करू शकणार होती. त्यासाठी ती सगळ जाणून घेत असते.
शेवटी त्याला सुकवून ती स्वतः रेडी व्हायला निघून जाते. आता त्याला गायत्री खरच चांगली मुलगी होती ह्यावर विश्वास वाटत होता. नाहीतर आतापर्यंत त्याने इतका त्रास दिला आहे तर त्याला ती सोडून गेली असती. पण गायत्री सारासार विचार करत मदत करत होती.
****
गायत्री आणि टेडी तयार होऊन हॉस्पिटलला जायला निघतात. तिच्या ठरलेल्या वेळात ती हॉस्पिटलला पोहचते. हातात तो टेडी घेत ती चालत असते. तिथं असलेले लोक तिला विचित्र नजरेने पाहत असतात. ती जशी सगळ्यांवर नजर टाकते तसे ते आपल काम करत असतात. तिची नजर पुढच्याला थंड करत असायची. सुंदर असली दिसायला तरीही ती कडक होती.
"तू इथ बसून रहा. मी सर्जरीला जात आहे.", टेडीला केबिन मधील तिच्या बाजूच्या चेअर वर ठेवत ती म्हणाली.
"डॉक्टर, इथून मला कोणी नेल तर?",टेडी विचारतो.
"नाही नेणार इथून तुला. आधी मी सर्जरी करणार आहे. नंतर युवराज पाटीलला पाहायला जाणार आहे. तेव्हा तुला घेऊन जाईल मी. मग तर ओके?",गायत्री बोलत बोलत सर्जरी ची तयारी करत असते. तिला तयार होताना पाहून टेडी तिला पाहत असतो. किती परफेक्ट होती ती सगळ्यात याचा विचार त्याच्या मनात येऊन जातो. त्याच्या सोबत काही ओळख नसताना ती त्याला मदत करायला तयार झाली होती. हेच मोठ होत त्याच्यासाठी.
"ठीक आहे डॉक्टर. लवकर ये! मला माणसांची भीती वाटते. स्पेशली नर्स ची. इथून मला घेऊन जातील म्हणून.",टेडी तोंड बारीक करत म्हणाला.
"फाईन. तुला मी तू ज्या रूम मध्ये आहे तिथं ठेवते. त्याने तुलाही बर वाटेल आणि मला काळजी नसेल. तुझ्या माणसात असशील तर चांगला होशील!",शेवटी ती विचार करून बोलून मोकळी होते. आपल्या शरीराकडे तो जाणार यानेच तो आनंदी होतो. तो स्वतः शी खुश होत तिला "थँक्यू" बोलतो. गायत्री आनंदी पाहून त्याला हसते. ती सर्जरी करायला जायच्या आधी त्याला उचलून घेत तो जिथं होता त्या रूम जवळ जाते. आतापर्यंत तिने त्या पेशंटला निरखून पाहिले नव्हते. ती तिथं येताच बाहेर असलेले लोक तिला पाहतात.
"पेशंट बद्दल काही प्रोग्रेस आहे का?",गायत्री आत मध्ये येत तिथं असलेल्या नर्सला विचारते.
"नो मॅडम.",नर्स ही नकारार्थी मान हलवत म्हणाली.
"मी आहे पाच मिनिट. चेक करण्यासाठी. तुम्ही तो पर्यंत बाहेर थांबा.", नर्सला अगदी शांतच बोलते ती. तशी नर्स बाहेर जाते. आता मात्र गायत्री तिथं झोपलेल्या पेशंटला निरखून पाहत असते. टेडीला तिथच एका लांबच्या चेअर वर ती बसवते.
"युवराज पाटील.",ती नाव मनातच घोळून मोकळी होते. कस विसरणार होती हे नाव ती? कालपासून खूपच त्याने त्रास दिला होता. डोक्यावर पट्ट्या होत्या त्याच्या. तोंडाला ऑक्सिजन मार्क्स लावला होता. बऱ्याच मशीन त्याच्या शरीराला लावल्या होत्या. तिथच असलेल्या स्क्रीन वर बिप बिप होत होती. त्याच्या त्या चेहऱ्यावर सध्या कोणतेही तेज नव्हते. शांत डोळे मिटून तो पडलेला असतो. पहिल्यांदा गायत्री तिच्या पेशंटला इतकं निरखून पाहत होती.
"देख मत पगली, प्यार हो जायेगा!",मागून त्याचा आवाज येतो. तशी गायत्री भानावर येते.
"तुला प्रेम करायला वेड लागले आहे का मला? मी चेक करत आहे तुला. तुझ्या पायात सध्या रॉड आहेत आणि हात थोडा लवकर काम करणार नाही. कवर व्हायला महिने लागतील. हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं.",गायत्री त्याला चेक करत म्हणाली. तसा तो मोठेच डोळे करतो.
"काय? इतकं झालं का माझ्यासोबत? मग मी काम कसा करेन? डॉक्टर मी साधा नाही आहे.", टेडी एका मागून एक प्रश्न करत बोलत असतो.
"माझ्यासाठी सध्या तू टेडी आहे. तर हेच लक्षात ठेवीन मी. तुझी होणारी बायको असेल काळजी घ्यायला.", गायत्री हसून म्हणाली. का कोण जाणे त्या टेडी पासून आता तिला भीती वाटत नव्हती. उलट त्याला सतावून भंडावून ठेवत असते.
एकदाच चेक करून नर्सला सूचना देऊन ती त्या टेडीला तिथच ठेवून बाहेर निघून येते. नर्सला त्या टेडीला 'तिथून हलवू नको' हे ही ती सांगायला विसरत नाही. टेडी तिथच बसून आपल्या शरीराला पाहत असतो.
क्रमशः
**********