Taddy - 5 in Marathi Fiction Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ५

Featured Books
  • థ జాంబి ఎంపరర్ - 4

    పారిపోతుంది.ద జాంబి ఎంపరర్ (The Zombie Emperor)రాంబాబు జ్ఞాప...

  • తనువున ప్రాణమై.... - 13

    ఆగమనం.....వీళ్ళిద్దరి అల్లరి సరసాలు చూస్తూ మన హీరో.. డిక్కీ...

  • ఓ మనసా... - 6

    స్క్రీన్ మీద వివేక్ నంబర్ కనిపించి ఆ టైంలో చేయడంతో ఇంపార్టెం...

  • అంతం కాదు - 5

    సీన్ 3: అక్షర అంతరంగం)ఆ వెంటనే శ్వేత, అక్షర ఇద్దరూ వీడ్కోలు...

  • ప్రేమలేఖ..? - 1

    సున్నితమైన చిన్న ప్రేమ కథ.   అందరికీ కచ్చితంగా నచ్చుతుంది అన...

Categories
Share

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ५

भाग ५.


    टेडी शांत बसून समोर पाहत असतो. आता तिथं तो एकटाच होता आणि त्याच शरीर होत. तिथं बसून त्याला कंटाळा येत होता. त्याच वेळात एक सुंदर अशी तरुणी चालतच दरवाजा उघडून आत मध्ये येते. त्या सुंदर मुलीला पाहून टेडीचे डोळे चमकतात. 



"सुशीला.",हेच नाव तो मनात बोलतो. तिने ऐकू नये यासाठी. ती तशीच चालत येत समोर निपचित पडलेल्या त्याच्या शरीराला पाहत असते. डोळ्यांत पाणी होते सध्या तिच्या. आसपास ती नजर फिरवते तर तिथं कोणीच तिला दिसत नाही. तसे ती टेबलवर बसत एक हात डोळ्यावर स्वतःच्या फिरवत पाणी आपले पुसून टाकते.



"युवी, बेबी सॉरी. तुझी अवस्था पाहून मला वाईट नाही वाटत आहे.",सुशीला स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली. ते वाक्य ऐकून त्याला धक्काच बसतो. आता जी तरुणी आत आली होती. ती त्याची होणारी बायको होती. त्याने एकेकाळी तिच्यावर प्रेम केलं होत. त्याला तिचं समजून घेत होती, असे त्याला वाटत असायच. 



       सुशीला दिसायला चांगली होती. थोडी सावळी होती. मेकअप ने आपला चेहरा झाकत असायची. आधीच तिच्या चेहऱ्याच्या, बॉडीच्या बऱ्याच सर्जरी झाल्या होत्या. मोठी उद्योगपतीची मुलगी होती ती. तिच्यासाठी काहीच अशक्य अस नव्हते. त्यात एकुलती एक असल्याने, बापाने तिला हवे तसे वागू दिले होते. तिच्या चेहऱ्यावर पाहून कधी कोणाच्या लक्षात येणार नव्हते. तसेच काहीसे युवराजचे झाले होते. मुळात त्याला रंग महत्त्वाचा नव्हता तर ती चांगली त्याला समजून घेत होती म्हणून तो प्रेम करत असायचा. ती ही भारतातील अब्जाधीश भेटला होता, तो सुध्दा दिसायला चांगला होता म्हणून ती त्याच्या वर प्रेम करत होती.



"सुशीला, काय बोलत आहे तू?",या क्षणी त्याला रागात विचारायचं होत पण तो मनातच ते बोलत असतो. त्याला जाणून घ्यायचं होत आता सगळ. यासाठी तो शांत राहत होता.



"मला आता ना कंटाळा आला आहे बेबी. तुझ्या मागे मागे करून. आता तुझी अवस्था अशी आहे. तू कधी बरा होशील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. बरा झाला तरीही तू चालू शकत नाही. हात पण असे झाले आहे तुझे. उद्या सकाळी तू कोमातून बाहेर आला तरीही मलाच तुझं पाहावे लागेल. कारण तुझे घरचे मलाच लावतील त्या कामासाठी. बायको बनायची होती मला तुझी. ना की, नर्स! मी माझ्या जन्मात माझी काम स्वतःची केली नाही, तर तुझी कशी करू शकते बर? असा तू आधार घेऊन चालशील तर लोक अपंग नवरा केला म्हणून मला बोलतील. त्या पेक्षा नकोच मला हे. मला जे हवे होते ते तर काही दिवसात तुझ्याकडुन मिळणार आहे. तुझी प्रॉपर्टी, तुझे महाल माझ्या नावावर मी करून घेतले आहे. हे तुला कळू नये यासाठी मीच प्लॅन करून तुझी अशी अवस्था केली आहे.",सुशीला विचित्र नजरेने त्याला पाहत हसत बोलत असते. तिच्या तोंडून एक एक ऐकून याचा राग वाढत असतो. सरळ सरळ पाठीत खंजीर खुपसला होता त्याच्या हिने. 



"पण मीच नाही आहे या सगळ्यात अजून देखील आहेत. लवकरच कळेल तुला. आता फक्त तुला शेवटचं पाहून बाय करायला मी आली आहे. कारण माझं लग्न माझ्या वडिलांनी अमेरिकेच्या चांगल्या आणि श्रीमंत बिझनेसमन सोबत ठरवले आहे. जक्सी खूप चांगला व्यक्ती आहे.",सुशीला हसतच त्या युवराजच्या गालावर हात फिरवत बोलत असते. 



"घाण मुलगी हात लावू नको माझ्या शरीराला. मला लुबाडून मोकळी होते का? थांब तुला सोडत नसतो मी! तुला कळेल युवराज पाटील काय चीज आहे. आतापर्यंत प्रेम पाहिले होते. आता द्वेष पाहशील. वेट अँड वॉच.",त्या सुशीला वर रागीट कटाक्ष टाकत तो मनात बोलत असतो. आता त्याच्या शरीरावर तिचा हात फिरला तरी त्याला किळस वाटत होते. पण टेडी रुपात असल्याने, तो तिला काही करू शकत नव्हता. गायत्री त्याला सांगून गेली होती. तो एक टेडी आहे ते. त्याच मुळे तो आपला राग शांत करत असतो. दुसरा पर्याय नव्हता त्याच्यासमोर. स्थिती भयंकर उभी होती. त्याच घर, प्रॉपर्टी समोर बसलेल्या तिने घेतली होती. 



        सुशीला काही वेळ तिथं बसून हसतच बाहेर पडू निघून जाते. काहीवेळाने त्याची आई तिथं येते. ती काळजीने त्याला पाहत असते. जणू तो समोर आहे अस समजून त्या त्याच्यासोबत बोलत असतात. आईचे बोलणे ऐकून त्याला भरून येत. कसे असते ना घरातील कमावणारा, वयात आलेला मुलगा जर असा पडुन राहिला म्हटल्यावर आईवडिलांना दुःख जास्त होत असते. तसेच काहीसे आता त्याच्या आईचे झाले होते. तो हतबल असतो. 



      संध्याकाळी त्याला चेक करायला म्हणून ती तिथं येते आणि त्या टेडीला तिथून घेऊन जाते. पण एक शब्द ही तो तिच्याशी बोलत नाही. निर्जीव टेडी सारखा बसून असतो. तिला काळजी लागते. तिथं बोलून तिला लोक वेड्यात काढतील अस समजून ती आपल्या घरी त्याला घेऊन जाते. घरी आल्या आल्या ती त्याला रूम मध्ये नेते. तसा तो मोठ्याने ओरडू लागतो. तसे तिला काहीच समजत नाही. तो एका भिंती जवळ जाऊन आपल डोकं आपटू लागतो. त्याच्या या कृतीने ती शॉक होते. पण जेव्हा तो डोकं आपटत असायचा तेव्हा तेव्हा तो जमिनीवर तोंडावर पडत होता. शेवटी एक कापसाचा हलका असा टेडी होता तो. त्या स्थितीत तिला हसू ही येत होत. पण ती दाखवत नाही. मनातच कपाळावर हात मारून मोकळी होते.



"ए ए काय करत आहेस तू? वेडा झाला आहे का तू?",शेवटी ती त्याला विचारते.



"मला ओरडायच आहे आणि सगळ्यांना एक्सपोज करायचं आहे. राग राग येत आहे नुसता सगळ्याचा. या टेडीत असल्याने, मला तो धड काढता ही येत नाही. काय करू? काय करू? हा त्या लोकांजवळ जाऊन सरळ त्यांचा गळाच धरतो. तो मंत्र म्हणून त्यांच्या अंगात जातो.",टेडी आता सैरभैर रूम मध्ये फिरत बोलत असतो. त्याच बोलणे ऐकून इतकं तर समजले होते तिला मोठ काहीतरी घडलं आहे. नाहीतर विनाकारण हा इतका पॅनिक होणार नव्हता. 



"तुझी सुशीला भेटली काय तुला?",गायत्री त्याला अस पाहून विचारते. तसा तो खुप रागात तिला पाहत तिच्या जवळ जातो.



"तिचं नाव घेऊ नको माझ्यासमोर!",हळू हळू कापत तो बोलत असतो. या वरून त्याचा राग केवढा मोठा होता हे समजून येत. 



"तू एका जागी बस आधी. इतके पळून तुलाच त्रास होणार आहे. मी डॉक्टर असली तरी आत्मा आणि टेडी ची डॉक्टर नाही आहे. हे तू लक्षात ठेव.",गायत्री त्याला शांत करत म्हणाली. ती आता बेडवर जाऊन बसते. याची धावपळ पाहून तिलाच चक्कर येत होती. टेडी शांत होत तिच्या बाजूला येऊन बेडवर बसतो. तेव्हा कुठे तिला बर वाटत. ती मोकळा श्वास सोडते.



"ती मुलगी तिने फसवल मला. वर मला अपंग बोलत होती. डॉक्टर खरच मी जगू शकणार का? मला माझ्या शरीरात जायला मिळणार का? गेलो तरीही मी अपंग होईल का?",आता शांतच तो एका मागून एक प्रश्न विचारत असतो. त्या सुशीलाचे ऐकून त्याच डोकं सटकले होते. त्यालाच कळत नव्हते कसे होते पुढे त्याच भविष्य?



"कोण सुशीला का?",गायत्री अंदाज घेत विचारते. यावर तो मान हलवत तिला झालेलं सगळ सांगून मोकळा होतो. ते ऐकून तिला काय बोलावे हे कळत नव्हते? या जगात अशीही लोक होती. फक्त पैशासाठी तिने त्याचा वापर केला हे तिला समजून येत. तितकाच राग ही येत होता. स्वतः एका उद्योगपतीची मुलगी असताना, असे त्याला फसवणे कुठे तरी तिला आवडले नव्हते? मुळात पैशाची हाव ही लोक करत का होते? हेच समजत नव्हते. 



"जाताना स्वतःचे शरीर ही घेऊन जात नाही तरीही लोक गर्व आणि हाव का ठेवत असतात? हेच मला कळत नाही टेडी.",गायत्री दूरवर पाहत बोलत असते.



"तू तुझं बोलशील तर तू चांगला होशील. चार पाच महिन्याने ऑपरेशन करणार आहे आम्ही. त्यात बघू काय होत ते. अपंग होणार नाही तू. पण काही महिने काळजी तुझी घ्यावी लागेल.",गायत्री या क्षणी त्याच्या कडे पाहत म्हणाली. बोलण्यात विश्वास होता सध्या तिच्या. का जणू तो विश्वास तिचा पाहून त्याचा ही राग कमी होतो.


क्रमशः
*******