Teen Jhunzaar Suna - 33 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 33

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 33

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.           

भाग ३३            

भाग ३२  वरून पुढे वाचा .................

“काका,” सरिता म्हणाली “ बटाईची काय बोलणी झाली आहेत?”

पांच वर्षांची बोली आहे. दरवर्षी ४ लाख देवू म्हणतो आहे.” – विलासराव.

एकरी ४ लाख? सरितानी आश्चर्यानी विचारलं.

“नाही ग पूर्ण १० एकरांचे ४ लाख., पण तू हे का विचारते आहेस?”

“आम्हाला द्या. आम्ही ५ लाख देवू. पण काका आम्हाला तुम्ही १० वर्षांसाठी द्याल तर अजून बरं होईल. आणि दर वर्षी २५ हजार वाढवून पण देवू. रावबाजीला देऊ नका तो लबाड आहे. आमचे पैसे बुडवले त्यांनी.” सरिता म्हणाली.

“हो सांगितलं आत्ताच मला श्रीपतीने. हरकत नाही तुम्ही किती निगुतीने शेती करता आहात हे दिसतच आहे. मग मला चालेल. उद्याच कागद करून घेऊ. आपले इतक्या वर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे माझ्याही डोक्याला टेंशन राहणार नाही.” विलासराव समाधानाने म्हणाले.

दुसऱ्या दिवशी व्यवहार झाला. संध्याकाळी मिटिंग मधे  सगळे उत्सुक होते की अचानक अजून १० एकर अचानक घेतली ती कशाला? मग सरिता बोलायला उभी राहिली.

“तुम्हाला माहितीच आहे की आपण जे उगवतो आहोत, त्या सगळ्यांची मागणी अतिशय प्रचंड आहे. आणि पुरवठा त्या मानानी अतिशय कमी आहे. आधुनिक औषधांत सुद्धा आजकाल औषधी वनस्पतींचा उपयोग वाढत चालला आहे. त्यामुळे आपली उत्पादनाची व्याप्ती वाढवण्याचा विचार माझ्या मनात होताच, पण काही समोर नव्हतं. पण आज अचानक दरवाजा उघडला.”

“म्हणजे आपण आता मुसळी, अश्वगंधा आणि भृंगराज यांचा एरिया वाढवणार आहोत का?” विशाल नी विचारलं.

“हो. माझ्या मनात मुसळी आठ एकरात आणि भृंगराज दोन एकरात लावायचा विचार आहे.” – सरिता.

“वहिनी, आम्हाला किमान दोन एकर जागा सोडा गुरांसाठी. आता अजून जास्त प्रमाणात शेणखत लागणार आहे. आता आपली योजना बऱ्याच लोकांपर्यंत पोचली आहे आणि जवळ जवळ रोज गुरांची संख्या वाढते आहे. त्यांची व्यवस्था तर करावी लागेल.” विशालनी

आपली गरज सांगितली.

“जर आपल्या उजव्या बाजूचं शिवराम काकांचं शेत मिळालं तर अजून १५ एकर मिळू शकतात. प्रयत्न करू का?” निशांत म्हणाला.

सर्व जणं निशांत कडे आश्चर्य मिश्रित कौतुकानी पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून निशांत बावरलाच. “काय? काय झालं? काही चुकीचं बोललो का मी?”

“निशांत,” सरिताच बोलली. “अरे शिवाराम काकांचं शेत मिळो  वा  ना मिळो, तुझ्या विचारात इतका आमूलाग्र बदल घडलेला पाहूनच आम्हाला खूप आनंद  झाला आहे. आता आपण एक टीम आहोत. तथास्तु. कर प्रयत्न.”

“थॅंक यू वहिनी. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. सांगू का?” – निशांत म्हणाला. आता त्याचा चेहरा फुलला होता. चेहऱ्यावर तजेला आला होता.

“सांग, सांग आम्ही खूप उत्सुक आहोत ऐकायला” वर्षा म्हणाली.

“आपल्या आजू बाजूच्या ७-८ शेतांमध्ये मी मोठे ड्रम ठेऊन आलो आहे. त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलून झाल्या आहेत.” – निशांत.

“कशाबद्दल बोलला आहेस?” – वर्षा.

“त्यांना मी शेतात जो काडी कचरा, पाला पाचोळा, तण वगैरे निघतो तो, ते लोक जाळतात, त्या ऐवजी मी त्यांना त्या पिंपात साठवायला सांगितलं आहे ते आपण आठवड्यातून एकदा घेऊन येऊ. आणि कंपोस्ट खतांच्या खड्ड्यात साठवू. असा माझा प्लॅन आहे, pollution पण कमी होईल आणि आपली पण गरज भागेल.” – निशांत

त्याचं हे बोलणं ऐकल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळे त्याच्या आताच्या कामा बद्दल खूपच खुश होते. त्यामुळे निशांत पण आनंदित झाला. “माझे अजून काही प्लॅन्स आहेत पण ते मी आत्ता सांगणार नाही, जरा विचार करून आणि काही गोष्टी करायच्या आहेत, त्या करून जर अपेक्षित परिणाम होत असेल तर त्या वेळेला सांगीन.” त्या दिवाशीची मीटिंग एकदम उत्साहात संपली.

दोन – तीन दिवसांनंतर निशांत आणि विशाल दिवसभर गायब होते. संध्याकाळी मीटिंग च्या वेळेस ते आले. सगळे काळजीत होते. “अरे, तुम्ही दोघं दिवसभर कुठे होता, तुमचा  मोबाइल पण लागत नव्हता. काय झालंय?” सरितानी विचारलं.

“सांगतो, सांगतो, पण आधी कोणी तरी आम्हाला काही खायला आणि चहा द्या. दिवसभर उपाशी आहोत.” निशांत म्हणाला त्या दोघांचा थकवा चेहऱ्यावर दिसतचं होता पण काहीतरी छान करून आल्यासारखा चमकत पण होता. चहा नाश्ता येई पर्यन्त दोघं जणं आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आले. आणि त्यांनी सांगायला सुरवात केली. सगळे कान देवून ऐकायला बसलेच होते. संगळ्यांचीच उत्सुकता खूपच ताणल्या गेली होती. “ अरे आता जास्त ताणू नका. पटापट सांगा काय झालं दिवस भरात” सरिता न राहवून म्हणाली.

निशांत नी सुरवात केली. “शिवराम काकांकडे गेलो होतो. योगायोगांनी त्यांचा मुलगा पण भेटला. तो सध्या सुट्टीवर आला आहे. तो काकांना म्हणत होता की शेती विकून टाकू आणि नागपूरला एक घर घेऊ, आणि सगळेच एका ठिकाणी राहू. तो नागपूरला एका फॅक्टरीत काम करतो. काका काही तयार होत नव्हते. त्यांचं म्हणण असं होतं की त्यांच्या मुलांनीच इथे येऊन शेती बघावी. पण मुलगा तयार नव्हता. मग आम्ही त्याच्या मुलाला आणि काकांना पटवलं.”

“काय सांगतोस काय?” बाबा म्हणाले. “मग ते काय म्हणाले? नीट सविस्तर सांग बाबा.”

“बाबा, तेच सांगतोय. त्याच्या मुलाला आम्ही सांगितलं की १५ पैकी अर्धी जमीन बरड आहे, पुन्हा शेतीला विहीर नाहीये, म्हणजे पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. फार किंमत मिळणार नाही. आणि जे काही मिळेल ते एकदाच मिळेल. त्या पेक्षा आम्ही काय म्हणतो ते ऐक. आणि मगच ठरव.” निशांत एका दमात सांगून मोकळा झाला.

“मग, काय म्हणाला तो, पटलं का त्याला?” बाबांनी विचारलं.

तो म्हणाला की ‘तुम्ही काय तेच म्हणणार, इथे ये आणि शेती कर, अजून काय?’

मग आम्ही सांगितलं की “आम्हाला कसायला दे, १० वर्षासाठी. दर वर्षा काठी आम्ही ५ लाख देऊ आणि दर वर्षी २५ हजार वाढवून देऊ. तुझ्या शेतीत बोरिंग लावू, म्हणजे शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटेल. सर्व बरड जमीन हळू हळू पीक घेण्या योग्य बनवू, १० वर्षात तुला ५०-६० लाख मिळतील आणि मुदत संपल्यावर शेती तुझी तुला वापस. ती पण सुपीक झालेल्या अवस्थेत. बघ पटतंय का? आम के आम और गुठली के दाम” विशाल म्हणाला.

“मग? छानच ऑफर होती की. ऐकलं का त्यांनी?” – सरिता.

‘म्हणाला की हे सगळं तुम्ही करणार म्हणता, आणि वरतून शेती वापस करणार म्हणाला ‘हे कस काय? त्या पेक्षा सरळ सरळ विकतच का घेत नाही?’ मग मी त्याला सांगितलं. “सध्या आमच्याकडे एवढे पैसे एक रकमी नाहीयेत. तुम्हाला माहितीच आहे की आम्ही नवीन काही प्रयोग करतो आहोत त्याला खूप पैसा ओतावा लागतोय, आणि त्या साठी आम्हाला जमिनीची जरूर आहे, म्हणून, मागच्याच आठवड्यात आम्ही विलास काकांची जमीन पण कसायला घेतली आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तसंच हे. तुमची शेती तुमच्या जवळ राहणार, आणि आमचंही काम भागणार, यात दोघांचाही फायदाच आहे.”

“एवढं सगळं समजावून सांगितल्यावर त्याला पटलं. फक्त मी त्याला निक्षून सांगितलं की मध्येच शेती वापस मागता येणार नाही, म्हणून. हे बघा करार पत्र पण करून आणलं आहे.” निशांतनी करार पत्र समोर ठेवलं. “म्हणून अख्खा दिवस मोडला त्यांच्यात. आणि हो, त्याला मी हे ही सांगितलं की “आमचे नवीन प्रयोग चालू आहेत म्हणून safety साठी आम्ही सर्व शेतीला कुंपण घालणार आहोत. अर्थात तुमची शेती बघायला तुम्ही केंव्हाही येऊ शकता.” निशांतनी सविस्तर सांगितलं.

“वा वा, निशांत मस्त डील केलं. We are all proud of you two.” सरितानी अभिप्राय दिला. आता आपल्याला नीट प्लॅनिंग करावं लागेल, कारण ५५ एकरांची योजना बनवावी लागणार आहे. माझ्या मते प्रत्येक जण यांचा विचार करा. आपण यावर उद्या डीटेल मधे बोलून सर्व योजना फायनल करू. मीटिंग संपली.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.