Santachya Amrut Katha - 7 in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संताच्या अमृत कथा - 7

Featured Books
  • મેઘાર્યન - 10

    આર્યવર્ધને પોતાની વાત પૂરી કરીને તલવાર નીચે ફેંકી દીધી અને જ...

  • RUH - The Adventure Boy.. - 8

    પ્રકરણ 8  ધીંગામસ્તીની દુનિયા....!!સાતમાં ધોરણમાં આવ્યો ને પ...

  • પરીક્ષા

    પરીક્ષા એક એવી વ્યવસ્થા છે, જેમાંથી સૌએ ક્યાંક ને ક્યાંક આ વ...

  • ટ્રેન ની મુસાફરી - ભાગ 2

    સાત વર્ષ વીતી ગયા હતા.આરવ હવે જાણીતા કવિ બની ગયા હતા. તેમનું...

  • The Glory of Life - 5

    પ્રકરણ 5 : એક વખત એક માણસ પોતે પોતાના જીવન માં સર્વસ્વ ત્યાગ...

Categories
Share

संताच्या अमृत कथा - 7

             🌹संत नरशी मेहता. ( चरित्र)🌹

संत नरसी मेहता (सोळावे शतक). प्रख्यात गुजराती वैष्णव संतकवी. त्याच्या कालाबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. नवीन संशोधनावरून त्याचा काल १४१४ ते १४८० ऐवजी सोळावे शतक मानला जातो. या कृष्णभक्त कवीच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडीत झाल्या आहेत. भावनगरजवळील तळाजा या आजोळच्या गावी वडनगर नागर कुटुंबात नरसीचा ( संत नरसी मेहता ) जन्म झाला.मातापिता दयाकुंवर व कृष्णदास हे जुनागढ येथे रहात होते. लहानपणीच नरसीचे आईवडील वारल्यामुळे त्याचे पालनपोषण त्याच्या जुनागढ येथील चुलतभावाने केले. तेथेच तो वाढला. लहानपणी तो फार हूड होता व अभ्यासाकडेही त्याचे लक्ष नसे. साधुसंग आणि भजनकीर्तनाचे त्याला प्रथमपासूनच विलक्षण वेड होते. त्यांत तो तहानभूक विसरे. घरी परतायला उशीर झाल्यामुळे भावजयीची बोलणी बसत.अशाच एका प्रसंगी त्याला घरी परतायला फार उशीर झाला. आता भावजय रागावेल म्हणून घरी परत न जाता तो जंगलातील एका शिवालयात गेला व तेथे शिवाची आराधना करू लागला. सात दिवसांनी त्याला शिवाचे दर्शन झाले व शिवाने त्याला कृष्णाच्या रासक्रीडेचे दर्शन घडविले, असे तो आपल्या एका रचनेत म्हणतो. तेव्हापासून तो निःसीम कृष्णभक्त बनला व कृष्णभक्तीची गीते रचू-गाऊ लागला.काही दिवसांनी त्याच्या चुलतभावाने त्याला परत घरी आणून माणकेबाई नावाच्या मुलीशी त्याचा विवाह करून दिला तथापि त्याचे कृष्णभक्तीचे वेड कमी झाले नाही. त्याने संसार मांडला, कामधंदा सुरू केला, त्याला दोन अपत्येही (मुलगा शामळशा व मुलगी कुंवरबाई) झाली तथापि त्याचा संसार हा संन्याशाचाच संसार राहिला त्याचे मन त्यात कधीच रमले नाही. पुढे त्याचा मुलगा वारला, नंतर त्याची पत्नीही वारली, मुलगी विधवा झाली व लौकिक अर्थाने संसाराची वाताहत झाली. तरीही ह्या आघातांस तो इष्टापत्ती समजून ‘आता मी सुखाने हरिभजन करीन’ असे म्हणतो.नरसीची रचना प्रायः भक्तिपर पदे वा भजने या स्वरूपाची आहे.त्याची काही पदे तात्त्विक व नीतिपरही आहेत. त्याच्या पदांत अनेक वेळा राधाकृष्णाचा शृंगारही वर्णिलेला आढळतो. हातांत करताल घेऊन त्याच्या तालावर तो ही स्वरचित पदे तल्लीन होऊन गात असे. असे असले, तरी व्यवहार पाठीशी होताच. कुंवरबाईला पुत्र झाला होता व त्यासाठी ‘मामेरूं’ (बाळंतविड्यासारखा प्रकार) नेणे भाग होते. शामळशाचेही लग्न व्हावयाचे होते. यासाठी पैसा हवा होता पण निष्कांचन नरसीजवळ तर करताल, कृष्णावरील श्रद्धा व सन्मित्र यांशिवाय काहीच नव्हते. लोक निर्धन नरसीस हसू लागले. तथापि कोणीतरी सन्मित्राने त्याची ही रूढियुक्त कर्तव्ये योग्य वेळी यथास्थित पार पाडण्यास मदत केली. नंतरच्या कवींनी प्रत्यक्ष कृष्णानेच त्याला याबाबत मदत केल्याची वर्णने आपल्या काव्यांत केली आहेत. अशा अनेक आख्यायिका त्याच्या जीवनाभोवती गुंफल्या गेल्या.तो मूर्ख नव्हता वा केवळ कवी नव्हता. त्याच्या जीवनाला थोर तात्त्विक अधिष्ठान होते. सर्वच व्यक्तींबाबत त्याचा समानतेचा दृष्टिकोन होता. त्याने जातिभेद, कुलाभिमान यांवर कोरडे ओढले. दीनदलित, क्षुद्र यांमध्ये भेदभाव न मानता त्याने कृष्णभक्तीचा पुरस्कार केला. जुनागढच्या नागरांना जेव्हा नरसी धेडाकडे भजनासाठी गेल्याचे कळले, तेव्हा त्यांनी त्याला जातपंचायत भरवून वाळीत टाकले. या प्रसंगामुळे नरसी कळवळून म्हणतो, की ‘प्रभो मला पुन्हा दारिद्र्यात व नागर जातीत जन्मास घालू नको!’ या प्रसंगास अनुलक्षूनही नंतरच्या कवींनी नागर जातीच्या एका भोजनप्रसंगी प्रत्येक ब्राह्मणाच्या शेजारी धेड जेवावयास बसल्याचे दिसू लागल्याचा चमत्कार घडला, अशी आख्यायिका गुंफली. गांधीजींच्या प्रार्थनेतील‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे!’हे प्रसिद्ध पद नरसीनेच रचले आहे. त्याने रचलेली अनेक भावपूर्ण पदे प्रभाति या नावाने गुजरातीत प्रसिद्ध आहेत. ‘गुजरातीचा आदिकवी’ म्हणून नरसीचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. गुजराती भक्तियुगाचा व गुजराती साहित्याचा आरंभही त्याच्यापासूनच मानला जातो. गुजरातीतील आख्यान काव्याचीही बीजे त्याच्या काव्यात दिसतात.नरसीने विपुल काव्यरचना केली. त्याने रचलेली पदे अनेक शतके मौखिक परंपरेने टिकून राहिली. वल्लभाचार्यांच्या अनुयायांनी त्याला भक्तियुगाचा ‘वधाइआ’ (अग्रदूत) मानून त्याच्या पदांना विशेष महत्त्वाचे स्थान दिले. आज जी पदे नरसीची म्हणून उपलब्ध आहेत, त्यांतील नेमकी नरसीची पदे किती आहेत, याचा निर्णय करणे अवघड होऊन बसले आहे. त्यांतील बरीच रचना प्रक्षिप्त, अन्य कवींची व मूळ काव्यभाषेत बदल केलेली असावी, असे अभ्यासक मानतात. उदा., हारमाला  हे नरसीने रचलेले (नरसीच्या जीवनातील एका आख्यायिकेवर) काव्य मानले जाते तथापि ते नंतरचे म्हणजे १६५० च्या सुमाराचे आहे. १६७८ मध्ये प्रेमानंदाने वा अन्य कुणा कवीने या काव्याची पुनर्मांडणी व पुनर्लेखन करून त्याचा जवळजवळ दुप्पट विस्तार केल्याचे अभ्यासकांना आढळून आले.संत नरसी मेहता (सोळावे शतक). प्रख्यात गुजराती वैष्णव संतकवी. त्याच्या कालाबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. नवीन संशोधनावरून त्याचा काल १४१४ ते १४८० ऐवजी सोळावे शतक मानला जातो. या कृष्णभक्त कवीच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडीत झाल्या आहेत. भावनगरजवळील तळाजा या आजोळच्या गावी वडनगर नागर कुटुंबात नरसीचा ( संत नरसी मेहता ) जन्म झाला.मातापिता दयाकुंवर व कृष्णदास हे जुनागढ येथे रहात होते. लहानपणीच नरसीचे आईवडील वारल्यामुळे त्याचे पालनपोषण त्याच्या जुनागढ येथील चुलतभावाने केले. तेथेच तो वाढला. लहानपणी तो फार हूड होता व अभ्यासाकडेही त्याचे लक्ष नसे. साधुसंग आणि भजनकीर्तनाचे त्याला प्रथमपासूनच विलक्षण वेड होते. त्यांत तो तहानभूक विसरे. घरी परतायला उशीर झाल्यामुळे भावजयीची बोलणी बसत.अशाच एका प्रसंगी त्याला घरी परतायला फार उशीर झाला. आता भावजय रागावेल म्हणून घरी परत न जाता तो जंगलातील एका शिवालयात गेला व तेथे शिवाची आराधना करू लागला. सात दिवसांनी त्याला शिवाचे दर्शन झाले व शिवाने त्याला कृष्णाच्या रासक्रीडेचे दर्शन घडविले, असे तो आपल्या एका रचनेत म्हणतो. तेव्हापासून तो निःसीम कृष्णभक्त बनला व कृष्णभक्तीची गीते रचू-गाऊ लागला.काही दिवसांनी त्याच्या चुलतभावाने त्याला परत घरी आणून माणकेबाई नावाच्या मुलीशी त्याचा विवाह करून दिला तथापि त्याचे कृष्णभक्तीचे वेड कमी झाले नाही. त्याने संसार मांडला, कामधंदा सुरू केला, त्याला दोन अपत्येही (मुलगा शामळशा व मुलगी कुंवरबाई) झाली तथापि त्याचा संसार हा संन्याशाचाच संसार राहिला त्याचे मन त्यात कधीच रमले नाही. पुढे त्याचा मुलगा वारला, नंतर त्याची पत्नीही वारली, मुलगी विधवा झाली व लौकिक अर्थाने संसाराची वाताहत झाली. तरीही ह्या आघातांस तो इष्टापत्ती समजून ‘आता मी सुखाने हरिभजन करीन’ असे म्हणतो.नरसीची रचना प्रायः भक्तिपर पदे वा भजने या स्वरूपाची आहे.त्याची काही पदे तात्त्विक व नीतिपरही आहेत. त्याच्या पदांत अनेक वेळा राधाकृष्णाचा शृंगारही वर्णिलेला आढळतो. हातांत करताल घेऊन त्याच्या तालावर तो ही स्वरचित पदे तल्लीन होऊन गात असे. असे असले, तरी व्यवहार पाठीशी होताच. कुंवरबाईला पुत्र झाला होता व त्यासाठी ‘मामेरूं’ (बाळंतविड्यासारखा प्रकार) नेणे भाग होते. शामळशाचेही लग्न व्हावयाचे होते. यासाठी पैसा हवा होता पण निष्कांचन नरसीजवळ तर करताल, कृष्णावरील श्रद्धा व सन्मित्र यांशिवाय काहीच नव्हते. लोक निर्धन नरसीस हसू लागले. तथापि कोणीतरी सन्मित्राने त्याची ही रूढियुक्त कर्तव्ये योग्य वेळी यथास्थित पार पाडण्यास मदत केली. नंतरच्या कवींनी प्रत्यक्ष कृष्णानेच त्याला याबाबत मदत केल्याची वर्णने आपल्या काव्यांत केली आहेत. अशा अनेक आख्यायिका त्याच्या जीवनाभोवती गुंफल्या गेल्या.तो मूर्ख नव्हता वा केवळ कवी नव्हता. त्याच्या जीवनाला थोर तात्त्विक अधिष्ठान होते. सर्वच व्यक्तींबाबत त्याचा समानतेचा दृष्टिकोन होता. त्याने जातिभेद, कुलाभिमान यांवर कोरडे ओढले. दीनदलित, क्षुद्र यांमध्ये भेदभाव न मानता त्याने कृष्णभक्तीचा पुरस्कार केला. जुनागढच्या नागरांना जेव्हा नरसी धेडाकडे भजनासाठी गेल्याचे कळले, तेव्हा त्यांनी त्याला जातपंचायत भरवून वाळीत टाकले. या प्रसंगामुळे नरसी कळवळून म्हणतो, की ‘प्रभो मला पुन्हा दारिद्र्यात व नागर जातीत जन्मास घालू नको!’ या प्रसंगास अनुलक्षूनही नंतरच्या कवींनी नागर जातीच्या एका भोजनप्रसंगी प्रत्येक ब्राह्मणाच्या शेजारी धेड जेवावयास बसल्याचे दिसू लागल्याचा चमत्कार घडला, अशी आख्यायिका गुंफली. गांधीजींच्या प्रार्थनेतील‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे!’हे प्रसिद्ध पद नरसीनेच रचले आहे. त्याने रचलेली अनेक भावपूर्ण पदे प्रभाति या नावाने गुजरातीत प्रसिद्ध आहेत. ‘गुजरातीचा आदिकवी’ म्हणून नरसीचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. गुजराती भक्तियुगाचा व गुजराती साहित्याचा आरंभही त्याच्यापासूनच मानला जातो. गुजरातीतील आख्यान काव्याचीही बीजे त्याच्या काव्यात दिसतात.नरसीने विपुल काव्यरचना केली. त्याने रचलेली पदे अनेक शतके मौखिक परंपरेने टिकून राहिली. वल्लभाचार्यांच्या अनुयायांनी त्याला भक्तियुगाचा ‘वधाइआ’ (अग्रदूत) मानून त्याच्या पदांना विशेष महत्त्वाचे स्थान दिले. आज जी पदे नरसीची म्हणून उपलब्ध आहेत, त्यांतील नेमकी नरसीची पदे किती आहेत, याचा निर्णय करणे अवघड होऊन बसले आहे. त्यांतील बरीच रचना प्रक्षिप्त, अन्य कवींची व मूळ काव्यभाषेत बदल केलेली असावी, असे अभ्यासक मानतात. उदा., हारमाला  हे नरसीने रचलेले (नरसीच्या जीवनातील एका आख्यायिकेवर) काव्य मानले जाते तथापि ते नंतरचे म्हणजे १६५० च्या सुमाराचे आहे. १६७८ मध्ये प्रेमानंदाने वा अन्य कुणा कवीने या काव्याची पुनर्मांडणी व पुनर्लेखन करून त्याचा जवळजवळ दुप्पट विस्तार केल्याचे अभ्यासकांना आढळून आले

                          🌹   🌹   🌹

                            मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.