दोघेही सर्व कामे आवरण्याच्या मागे लागतात तो दिवस जवळ आहे तुझ्या दिवसाची दोघे वाट बघत असतात तो दिवस उद्याचा असतो आजचे काम आवरून ते उद्याच्या दिवसाची वाट बघतात ज्या दिवसाची दोघी वाट बघतात तो दिवस येतो आज तो दिवस असतो दोघी दुपार होण्याची वाट बघत असतात त्या दोघांनाही माहीत असते की दुपारी गेला यायला संध्याकाळी होते त्या दोघेही त्यांचे कामे आवरून एक झोप पण काढतात झोपेतून उठून जाण्यासाठी आवरतात जाण्याअगोदर निलेश निशाला कॉल करतो .
निलेश- hello
निशा - hello
निलेश- तू माझ्या गाडीत येत आहे ना ?
निशा - हो
निलेश- कोठे येऊ मी ?
निशा - माझ्या घरीच ये मला ना तुला माझ्या आई-वडिलांसोबत भेटवायचे आहे ते घरीच आहे म्हणून चालेल ना तुला ?
निलेश- ok. पण पुढच्या वेळेस आपण भेटल्यावर तू माझ्या घरी येणार असेल तर येतो माझ्या आईला तुला भेटायचे आहे .
निशा - ok. चालेल
निलेश- आवरून ठेव मी येतोच .
निशा - हो मी आवरले आहे तू ये.
निलेश- हो आलोच .
निशा - हो बाय.
निलेश- बाय .
व निलेश फोन ठेवतो निलेश गाडी घेऊन निघतो निशा त्याची वाट बघत असते व निशा आकाश व विशाखाला सांगते की निलेश मला घेण्यासाठी येत आहे त्याला सांगितले की मला माझ्या आई-वडिलांना तुझी ओळख करून द्यायची आहे मग तू डायरेक्ट माझ्या घरीच आहे मग तो येत आहे घरी आकाश आणि विशाखा म्हणतात की हो चालेल निलेशला निशा च्या घरी पोहोचण्यासाठी अर्धा एक तास बाकी असतो निलेश निशा च्या घरी पोहोचतो घराचा दरवाजाची बेल वाजवतो निशा दरवाजा उघडते तिला आनंद होतो की निलेश खरंच आला आहे म्हणून निशा निलेश ला घरामध्ये येण्यासाठी सांगते आकाश व विशाखा हॉलमध्येच बसलेले असतात निलेश ही तेथेच बसतो ते तिघेही बोलत असतात निशा निलेश ला पाणी देते व चहा ठेवते चहा पाणी घेऊन दोघेही निघणार असतात निलेश आकाश व विशाखाला येतो मी म्हणून निघतो त्यात त्याच्यासोबत निशा ही असते .
ते दोघे गेल्यावर आकाश व विषाखा निलेश विषयी गप्पा मारत बसतात मुलगा स्वभावाने चांगलाच आहे एकदम निशाला पाहिजे तसा आहे विशाखा म्हणते आकाश म्हणतो हो ना आता लवकरच दोघेही सुरेश कडे पोचणार असतात कारण निशाच्या गावातच म्हणजेच मदनपूर मध्ये सुरेश राहत असतो निलेशने त्याच्या गाडीमध्ये रोमँटिक सॉंग्स लावलेले असतात ते गाणे ऐकत असताना निशाला जरा वेगळेच फील होत असते ते गाणे ऐकत असताना ती फक्त निलेश कडे बघत असते हे दोघी सुरेश च्या घरी पोहोचतात पोचल्यावर सुरेश त्यांना बसायला सांगतो ते दोघेही बसतात सुरेश विचारतो काय प्रश्न आहे विचारा ?
निलेश- प्रश्न नाहीये तुम्हाला काही सांगायचे आहे आम्हाला काही संकेत दिसले होते त्याविषयी बोलायचे होते .
सुरेश - बोला.
निलेश व निशा दोघेही सर्व काही सांगू लागतात राजकुमार व राजकुमारी संकेत स्वप्न सर्व काही सांगून टाकतात सुरेश ऐकत असतो व त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो कारण या दोघांना संकेत मिळाले म्हणून निशा व निलेश बोलायचे थांबतात मग सुरेश बोलायला सुरुवात करतो .
सुरेश - हे सर्व तुम्हाला कधीतरी समजणार होते ते आता तुम्हाला थोडे थोडे करून उलगडत आहे व या सर्व गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाही काही वेळ लागेल पण हे समजत असताना तुम्हाला दोघांनाही सोबतच राहावे लागेल सोबत जरा राहिले तर लवकर उलघडेल व तुम्हाला हे तर समजलेच आहे की तुम्ही मागच्या जन्मात कोण होते ते तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे समजले आहे तर पुढच्या उलगडा लवकरात लवकर होईल मला माहित आहे की पुढे काय होणार आहे ते पण जर तुम्हाला मी सांगितले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण ते तुम्हाला समजले पाहिजे कारण ते तुम्हाला समजल्या शिवाय तुम्हाला तुमच्या शक्ती विषयी माहिती होणार नाही जवळपास तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त माहिती समजली आहे थोडी माहिती बाकी आहे व ते पण लवकरच समजेल हे ऐकून निलेश व निशा आनंदी होतात . निलेश व निशा सुरेशला धन्यवाद म्हणून घरी जाण्यासाठी निघतात निलेश निशाला तिच्या घरी सोडतो व तो त्याच्या घरी जातो घरी गेल्यावर दोघे घडलेली घटना घरच्यांना सांगतात दोघांच्या घरच्यांना हे ऐकून आनंद होतो दोघेही त्यांचे सर्व कामे आवरून झोपतात झोपल्यावर निलेशला रात्री बारा ते एकच्या दरम्यान एक स्वप्न पडते त्या स्वप्नात त्याला एक वयस्कर व्यक्ती त्याने भगव्या रंगाचे कपडे परिधान केलेले असतात व तो व्यक्ती बारीक असतो तो एक साधू असतो त्याच्या हातात काठी असते तो व्यक्ती निलेशच्या स्वप्नात येतो व म्हणतो की वेळ आली आहे भेटण्याची असे म्हणून ते स्वप्न निघून जाते तो झोपेतून उठतो खूप घाबरलेला असतो त्याच्या संपूर्ण शरीराचे थरकाप होते त्याला समजत नाही की कोण होते हे वयस्कर व्यक्ती माझ्या स्वप्नात का आले माझा त्यांचा काय संबंध आणि ते असे का म्हणाले की वेळ आली आहे भेटण्याची पण कोठे भेटायचे आहे निलेशला प्रश्नांवर प्रश्न पडतात पण उत्तरे सापडत नाही कुठे भेटतील या प्रश्नाचे उत्तरे मला मी निशा ला कॉल करू का मग तो झोपतो व सकाळीच उठतो व उठल्यानंतर त्याचे त्याचे काम आवरतो व जॉब ला निघून जातो ऑफिसमध्ये गेल्यावर कॉल करतो .
निलेश- hello 👋
निशा - hello 👋
निलेश- अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे .
निशा - हा बोल ना काय झाले ?
निलेश- अगं मला रात्री बारा ते एकच्या दरम्यान एक स्वप्न पडलं मग निलेश त्याला पडलेले सपना सांगून टाकतो हे ऐकताच निशा घाबरते निशाला ही प्रश्न पडतात म्हणून निशा अंदाज लावायला सुरुवात करते कोण असू शकेल तो व्यक्ती मग निशाला वाटते की ज्या ज्योतिषी नी निलेश चे भविष्य सांगितले होते ते तर नाही ना मग निशा निलेश ला सांगते व निलेश ला खरे वाटते पण भेटायचे कोठे हे त्याला समजत नाही निलेश ला वाटते की आईला सांगून पाहू पण आईला माहिती झाल्यावर आई उगाचच टेन्शन घेईल म्हणून तो आईला सांग न कॅन्सल करतो निशाला वाटते की खरंच ज्योतिषीच असू शकतात कारण निलेश च्या आईने निलेश ला सांगितल्याप्रमाणे ही भविष्यात आम्ही भेटू असे त्या ज्योतिषा निलेश च्या आईला सांगितले होते ते जर भेटले तर खूपच चांगले होईल हा विचार करत असताना निशा चे डोके दुखते ती कपाळाला हात लावते तिच्या काना मागून घाम येतो तिच्या पूर्ण हातापायाचे थरकाप होते तिचे डोळे आपोआप बंद होतात मग तिला असे दिसते की कालिका वनात ती निलेश सोबत असते व ते दोघेही एक साधू महाराज सोबत बोलत असतात ती डोळे उघडते व ती पूर्ण घाबरलेली असते ती खुर्चीवर बसून घेते पाणी पिते आणि तिच्या मनात लगेच निरेशला सांगावं असे वाटते की लगेच निलेश ला कॉल करते सर्व काही सांगून टाकते निलेश ऐकत असतो व त्याला ऐकून भीती वाटते निलेशला वाटते की मी सुरेश ला फोन करून सर्व काही सांगून टाकावा निलेश सुरेश ला कॉल करून सर्व सांगतो सुरेशला माहिती झाले तो आनंदी होतो सुरेश म्हणतो की आता तुमचे काम सोपे होणार आहेत कारण तुम्हाला सर्व काही समजणार आहे फक्त तुम्ही त्या व्यक्तीला भेटा एवढे बोलून सुरेश फोन ठेवतो आता निलेशला समजलेले असते की त्या ज्योतिषांना कालिका वनात भेटायचे आहे ते तो निशाला फोन करून सांगतो की आपण लवकरात लवकर कालिका वनात गेले पाहिजे त्या वनात आपल्याला त्या ज्योतिषांना सापडायला दोन ते तीन दिवस गेले तरी चालेल लागले तर मुक्कामी राहण्याच्या तयारीमध्ये ये. निशा म्हणते हो चालेल निलेश ला वाटते की एकदा सुरेश ला कॉल करून विचारावा की आम्ही त्या कालिका वनात कधी जाऊ दे व आम्ही केल्यावर आम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल ते निलेश सुरेश ला कॉल करतो व त्याचे प्रश्न विचारतो सुरेश म्हणतो की मी सध्या कामात आहे या प्रश्नांची उत्तरे मी तुला नंतर देईन माझे काम ऑटोपले की मी स्वतः तुला कॉल करतो एवढे बोलून सुरेश निलेश चा फोन ठेवतो व निलेश सुरेशचा फोन येण्याची वाट बघतो तोपर्यंत निलेश निशाला फोन करतो व तिच्याशी बोलतो व तिला घडलेली गोष्ट सांगतो .