निलेश निशाची कॉल वर बोलत असताना त्याला सुरेश चा कॉल येतो तो निशाला सांगतो की मला सुरेश चा फोन आला आहे मी फोन ठेवतो व त्याला फोन करतो निलेश सुरेशला कॉल करतो मी सुरेश फोन उचलतो .
सुरेश - हा बोल तुला काही विचारायचे होते ना विचार आता मगाशी ना मला काम होते म्हणून .
निलेश - ओके ते मी हे म्हणत होतो की आम्हाला कालिका वनात जायचे आहे निशा व मला मग तुम्ही सांगा की आम्ही कधी जाऊ ?
सुरेश - सुरेश डोळे बंद करतो व त्याच्या शक्ती द्वारे माहिती घेतो व मग सांगतो की आधीच तुम्हाला उशीर झाला आहे ते व्यक्ती तुमची वाट बघत आहे तुम्ही एक-दोन दिवसांमध्ये जाऊन या आणि तिथे गेल्यावर काय प्रॉब्लेम होते हे मी तुला सांगू शकत नाही आणि जे काही होईल त्याला तुम्ही सामोरे जाणार आहे आणि जे काही होईल त्याला तुम्ही स्वतः लढू शकतात त्यात मी तुम्हाला मदत करण्याची काहीच गरज नाही आणि तुमच्या सोबत ते व्यक्ती तुम्हाला मदत करतील एवढे बोलून सुरेश फोन ठेवतो निलेश ला काय करावे ते समजत नाही निलेश जॉब वरून घरी जातो घरी गेल्यावर तो फ्रेश होतो जेवण करतो नंतर झोपतो त्याला लवकर झोप येत नाही त्याला दिवसभराचे घडलेले आठवत असते त्याला काहीही करो पण झोप येत नव्हती मग मनात व डोक्यात असलेली विचार निघून जाऊ लागले व त्याला समजलेच नाही की त्याला झोप कशी लागली तो थेट सकाळी झोपेतून उठला उठल्यानंतर रोज प्रमाणे चहा नाश्ता झाला टिफिन घेऊन जॉबला गेला गेल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात केली जेवणाची वेळ झाली जेवणासाठी टिफिन उघडला व त्याला निशाची आठवण झाली म्हणजे त्याला वाटले की काल मला सुरेश ने सांगितलेले की मी निशाला सांगितले नाही मग निलेश निशाला कॉल करतो ती कामात व्यस्त असते व तिचा फोन सायलेंटवर असतो त्यामुळे ती त्याचा कॉल उचलत नाही निलेश तिला कॉल करण्याचे थांबतो निशा चे काम आटोपते ती फोन हातात घेते फोन सायलेंट वरून काढते व तिला निलेश चा फोन येऊन गेलेला दिसतो व ती त्याला कॉल करते .
निशा - hello
निलेश- hello
निशा - कॉल केला होता का ?
निलेश- हो
निशा - sorry मी ना कामात होते व फोन सायलेंटवर होता.
निलेश- yes. Ok
निशा - काही काम होते का ? की काय सांगायचे होते?
निलेश- हो सांगायचेच आहे.
निशा - हो. सांग ना काय सांगायचे आहे ?
निलेश- तिला सुरेशने सांगितलेली सर्व सांगून टाकतो
निशा - आपण उद्याचं जायला हवे निलेश कारण ते ज्योतिषी निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाही
निलेश - तू म्हणते ते बरोबर आहे . आपण उद्याच निघायला हवे आणि आपण वेगवेगळे नको जायला. म्हणजे तू माझ्याच गाडीमध्ये ये . आणि मी तुला घ्यायला येतो.चालेल ना? आणि आपण जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपल्याला ते बुवा भेटतील आपण घरच्यांना आजच सांगू मग सकाळी सहा सात वाजेच्या दरम्यान निघू. चालेल ना ?
निशा - ओके चालेल पण तो म्हटल्याप्रमाणे खरंच थांबण्याच्या दृष्टीने पण जायचे आहे का ?
निलेश- हो तशी तू पण तयारी कर व मी पण करतो
निशा - हो चालेल .
निलेश- ठेऊ का फोन ?
निशा - हो
निलेश- bye. Take care
निशा - bye take care.
दोघेही फोन ठेवतात व दोघेही उद्या सोबत जाण्यासाठी तयारी करतात . दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही पाच वाजता उठतात उठल्यानंतर ते दोघेही स्वतःचे आवरतात टिफिन सोबत घेतात त्यांनी बॅग ही संध्याकाळीच भरून ठेवलेली होती .