Quotes by प्रकाश in Bitesapp read free

प्रकाश

प्रकाश

@xowsxont6372.mb


शब्द शिदोरी....कविता...मुक्त छंद

क्षणाक्षणाचे कण कण वेचत..
काहीतरी वाचू या...
वाचता वाचताच सुचले काही...
तर शब्दातही ते छेडू या...

नकोच नुसता गोंधळ मनी तो..
विचारातला त्रास कसा..
लिहित असता काहीतरीच....
लेखक झालो कसाबसा...

आता येणे नसो माघारी...
घेतली लेखन-उभारी...
वाचकांच्या प्रतिसादाने...
लिहू लागलो "लयभारी"...

आत्मस्तुतीचा व्देष स्वीकारता..
अहंकार तो नसो मनी...
लीहितांना जो लिहीत असतो...
शब्द पुरवितो..देेव-लेखणी..

लेखनाची कलाच न्यारी...
आहे मलाही प्यारी...
प्रचंड वाचन करता गवसली...
गूूढ-रहस्य ही शिदोरी...

कवि- प्रकाश राऊत दि. 24.08.2026
अमरावती

Read More

कळी एक उगवली गुलाबाची
लाखात देखणी नात माझी!

स्पर्शात चांदणी तारकांची
गंधात गंधात ती चमेलीची
रूपात रूप ती लक्ष्मीची
लाखात देखणी नात माझी!

शब्दात माझी ती कवयित्री
रसात रस ती अमृताची
शब्द स्पर्श रूप रस गंधाची
निर्मिती झाली या सृृष्टी!

कवि- प्रकाश राऊत Seattle, Washington, U.S.A. 98041
Date:- 30.07.2023

Read More

कविता...दु:ख
कधी कधी दु:ख असतं, सखोल आणि सत्य..
पण तुम्ही त्यातून सुटत नाही, ते तुमच्यासोबत असतं..
जखमांनी भारावलेलं, वाटतं तुम्हास एकटं..
पण वेळेपुरती प्रार्थना, परतवतं घरटं..
जीवनचक्र चालत राहतं, नसतं त्यात काळं.
कधी कधी सुख हरवतं, ते रेंगाळतं जाळं.
सगळं काही छान तरी काहीतरी हरवतं..
सुखाच्या आठवणी चुंबन घेत राहतं..
ह्रदयाचं दु:ख कुणी भरू शकत नाही..
तुमचीच शक्ति ह्रदयास वर्धन करीत राही..
तेंव्हा अंतरातील जखमा, विसरूनी जावे पुढे..
जीवनप्रवास नेईन जेथे, जावे तेथे तेथे..
मूळ कविता ईंग्रजीत- निधी वासानी
अनुवाद- कवि प्रकाश राऊत, अमरावती
दिनांक 28.03.2026
***********

Read More