शब्द शिदोरी....कविता...मुक्त छंद
क्षणाक्षणाचे कण कण वेचत..
काहीतरी वाचू या...
वाचता वाचताच सुचले काही...
तर शब्दातही ते छेडू या...
नकोच नुसता गोंधळ मनी तो..
विचारातला त्रास कसा..
लिहित असता काहीतरीच....
लेखक झालो कसाबसा...
आता येणे नसो माघारी...
घेतली लेखन-उभारी...
वाचकांच्या प्रतिसादाने...
लिहू लागलो "लयभारी"...
आत्मस्तुतीचा व्देष स्वीकारता..
अहंकार तो नसो मनी...
लीहितांना जो लिहीत असतो...
शब्द पुरवितो..देेव-लेखणी..
लेखनाची कलाच न्यारी...
आहे मलाही प्यारी...
प्रचंड वाचन करता गवसली...
गूूढ-रहस्य ही शिदोरी...
कवि- प्रकाश राऊत दि. 24.08.2026
अमरावती