मी एक आई, एक बायको , एक सून , एक मुलगी म्हणून सगळीकडे असते .पण माझ्यासाठी मी कधीच available नसते.
मला माझ्याशी बोलायला , माझ्यासाठी काही करायला वेळच नसतो.मनात खूप येत सकाळी निवांत खिडकीत बसून बाहेर चिमण्यांचा किलबिलाट एकत गरम गरम चहा घ्यावा.अरे ,पण या वेळेला तर माझा double स्पीड work चालू असतो.मुलांचा डबा ,शाळेची गडबड ,स्वयंपाक ,मुलांचे bag,टिफीन बॅग, कुणाला चहा, कुणाला नाश्ता, आणि बराच काही.
बर आज मनात आल ऑनलाईन काही शॉपिंग करूया.थोड स्वतःसाठी विचार करू , आवडेल ते थोड करू आणि दुपारी बराच search करून बजेट मध्ये काही मागवलं .माहीत होत हे ओरडणार,पण म्हटलं ठीक आहे खाऊ थोडा ओरडा...
पार्सल दोन दिवसात येणार होत , तोवर ओरडा खाण्याची full तयारी केली.आणि तो क्षण आला. यांच्याकडे पैसे मागितले , येवढ मोठ questionmark होत त्यांच्या चेहऱ्यावर .पैसे दिले त्यांनी ,तो delivery man गेला .
आणि यांचा पारा चढला,कुणाला विचारून तू हे मागवलस, मनाचे कारभार चाललेत. पैसे फुकट येतात का.आणि बरच काही .क्षणार्धात असे वाटले की कोन आहे मी .स्वतःला या घराचा भाग माननारी मी जीव तोडून सगळ्यांसाठी झटणारी,की फक्त सगळ्यांच्या सोयीसाठी बिनपगारी ,कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारी एक कामगार.खूप वाईट वाटलं मनस्ताप झाला. मला माझ्या मनासारखे कोनती गोश्ट करण्याचा अधिकार नाही.खूप डीप्रेस झाले .पण पर्याय काय होता .आता आयुष्याच्या खूप पुढच्या टप्प्यावर आले होते ,आता मागे वळण अवघड होत.निराश होऊन ठरवलं संपले आता ,फक्त श्वास आहे तोवर स्वतःला पूर्ण विसरून जगायच.कोणतीही अपेक्षा न ठेवता.
हे लाजिरवाण जीवन, मन मारून जगणं मला कधीच पसंत न्हवते. पण ठीक आहे ,आता माझ्या मुलींना मी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणार आहे , स्वतःची स्वप्न जपायला शिकवणार आहे. सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधण्याचा अधिकार आहेना मग मुलींना , बायकांना का नाही .अरे जगुद्या ना त्याना मोकळे पणाने ,सतत बंधनात नका जखडू त्यांना .ज्या घरात मुली ,बायका मोकळा श्वास घेतात. ते घर मोकळा श्वास घेते.

Marathi Blog by Sarika : 111900401

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now