जग ही एक फार गंमतीशीर जागा आहे. इथे प्रत्येकाला वाटतं की आपण फार शहाणं आहोत, आणि बाकी सगळे "थोडे कमी" आहेत. कुणाला वाटतं पैसा म्हणजेच सुख, तर कुणाला वाटतं की मोबाईलवरच्या स्टेटसमध्येच आयुष्याचं यश दडलं आहे. जग असं आहे की जो जास्त शांत राहतो त्याला "भोळा" म्हणतात आणि जो जास्त बोलतो त्याला "हुशार" समजतात.
. या जगात लोक तत्त्वज्ञान फार बोलतात, पण बसमध्ये सीट मिळाली की लगेच ते तत्त्व विसरतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे, जग सुधारण्याची जबाबदारी सगळ्यांना घ्यायची असते—पण "तो दुसरा कुणीतरी करेल" असं ठाम गृहीत धरून. म्हणूनच बहुतेक जग हे जगच राहातं—आपल्याला हसवत, कधी रडवत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत गोंधळ घालत.
by Fazal Esaf