४- कवी अरुणदास" अरुण वि.देशपांडे
समर्था तुमच्या दरबारी
---------------------------------
मानाने जगणे झाले हो कठीण
हा जीव अमुचा घाबरा झाला
घेऊनी गाऱ्हाणे समर्था आजला
भक्त तुमच्या दरबारी हो आला ।।
व्यवहारी घाली टोप्या लबाडीने
ठकसेनांना आवर तुम्ही घाला
घेऊनी गाऱ्हाणे समर्था आजला
भक्त तुमच्या दरबारी हो आला ।।
सद्गुरु आधार आम्हा मिळाला
विस्वास् आमच्या मनात जागला
कृपा असुद्या निरंतर हे समर्था
भक्त तुमच्या दरबारी हो आला ।।
सद्गुरु समर्था तुम्हीच आहा
भक्तांचे रक्षक कल्याण करविते
घेउनी गाऱ्हाणे समर्था आजला
कवी अरुणदास दरबारी आला ।।
-------------------------------------------------
कवी अरुण दास" अरुण वि.देशपांडे
पाटील नगर -बावधन (बु)-पुणे-
९८५०१७७३४२
-----------------------