Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🟦 दही वडा स्टाईल मखाणे

🟦 मखाणे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.
मखाण्यामध्ये मॅग्नीशियम असतें
उपयोगी अँटी-ऑक्सिडंट असतात.
हे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.
मखाणेचा ग्लाईसेमिक इंडेक्स कमी असतो
असे गुगल सांगते ..

🟦 मखाणे प्रथम कोरडेच भाजून
कुरकुरीत करून घ्यावे
ते ताटात काढून ठेवावे
आता कढईत एक मोठा चमचा साजुक तूप घालावे
तूप वितळले की त्यात हे भाजलेले मखाणे एक मिनिट परतून काढून ठेवावे

🟦 दही गोड असावे ते चमच्याने चांगले फेटून घ्यावें
त्यात
चवीनुसार साखर
मीठ
बारीक आले घालावे

🟦 कढईत तूप घालून
जिरे व हिंगाची फोडणी करावी
ही फोडणी दह्यावर घालून
चांगले मिसळून घ्यावे

🟦 या दह्यात तुपात परतलेले मखाणे घालून
वरती बारीक कोथिंबीर घालावी
आवडतं असल्यास याच वेळेस बारीक पुदीना घालू शकता
वरती तिखट पुड भुरभुरावी
हे थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे
खायला घेण्यापूर्वी दहा मिनीटे बाहेर काढावे

🟦 खुप चवदार डिश तयार होतें 😋
एक वेगळा आणि सोपा प्रकार म्हणुन जरुर करून बघा

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112026503
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now