Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

केशर आंब्याची वडी

घरचे आंबे संपले तरी आंबे खायची हौस कुठे संपते 😀 घरी केशर आंबा आणलाय
त्याची ही वडी केली
हा आंबा रंगाला नावाप्रमाणेच केशरी होता 🙂
व रसही पातळ होता
पण चवीला मात्र गोड होता

साहित्य
एक वाटी आंब्याचा रस
दोन वाटया ओले खोबरे
पाऊण वाटी साखर
दोन मोठे चमचे बारीक केलेली साखर
वेलदोडे पावडर
एक कप साई सकट दुध
दोन मोठे चमचे तूप

कृती
प्रथम एका थाळीला तूप लावून ठेवा
दूध साय व ओले खोबरे
मिक्सर मधून काढा
कढईत एक चमचा तूप व आंब्याचा रस घालुन थोडे परतून घ्या
रसाचा कच्चेपणा कमी होऊन त्यातील पाण्याचा अंश पण कमी होईल
आता त्यात मिक्सर मधून काढलेले खोबरे व पाऊण वाटी साखर घालून आटवत ठेवा
सतत हलवत रहा
नाहीतर मिश्रण करपू शकते
परत एक चमचा तूप घाला
वीस पंचवीस मिनिटांत मिश्रण आळून येईल
मिश्रण कढईच्या कडा सोडू लागले की
खाली काढून त्यात बारीक साखर घालून चांगले घोटून घ्या
वेलदोडे पावडर मिसळून तूप लावलेल्या थाळीत थापा
थोडे कोमट झाल्यावर चाकूने वडी पाडून
काजु तूकडे ,अथवा पिस्ता, काळी मनुका लावुन घ्या
दोन तासानंतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या काढून घ्या
आकर्षक रंगाच्या या वड्या चवीष्ट लागतात

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112029308
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now