Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🌰बीट कटलेट🌰

🌰साहित्य
एक मोठे बीट
एक मोठा बटाटा
तिखट, मीठ ,गरम मसाला, लिंबूरस ,तीळ ,जिरे ,बडीशेप ,कसूरी मेथी ,कोथिंबीर , बारीक चिरलेलेआले लसूण तुकडे , कसूरी मेथी
चार मोठे चमचे पोह्यांची पावडर
रवा

🌰कृती
बीट व बटाटा धुवून साले काढून मोठे तुकडे करा
कुकर मध्ये भांड्यात पाणी न घालता उकडून घ्या
(बीटला मुळात भरपुर पाणी असते त्यामूळे पाणी अजिबात घालू नये)
जास्त शिट्ट्या नकोत
फक्तं दोन शिट्ट्या झाल्या की पुरे होतात
वाफेवर जितके शिजते तितकेच शिजवा
फार लगदा होता कामा नये
(जास्त शिजले तर त्याला जास्त पाणी सुटते )

🌰गार झाल्यावर बाहेर काढून बीट व बटाटा दोन्हीं किसणीवर किसून घ्यावे
हाताने चांगले एकत्र करावे
या मिश्रणात तिखट, मीठ, गरम मसाला, लिंबूरस तीळ, जिरे बडीशेप ,कसूरी मेथी, कोथिंबीर , आले लसूण घालावे
व चार चमचे बारीक केलेले पोहे(कांदे पोह्याचे पोहे मिक्सर वर बारीक करावे) घालावे
ही पावडर बीटचे पाणी शोषून घेते व मिश्रण कोरडे होते
व कटलेट करण्यासाठी चांगले एकजीव होते

🌰या मिश्रणाचे आता आपल्या आवडत्या आकारात कटलेट तयार करून बारीक रव्यात थोडे मीठ घालून या रव्यात चांगले घोळवावे व एक तासभर फ्रीज मध्ये सेट करावे

🌰तासाभराने एका पसरट पॅन मध्ये तेल घालून दोन्हीं बाजूंनी चांगले खरपुस तळून घ्यावे

कमी तेलात भाजुन सुध्दा छान होतात

🌰टीप
बीट शिजवताना अजिबात पाणी न घातल्याने पोहे पावडर कमी लागते
व बीट ची एक विशिष्ट चव अबाधित राहते
सोबत
पुदीना चटणी व सॉस..

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112031515
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now