Marathi Quote in Book-Review by Mandar Milind Kulkarni

Book-Review quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Book Review : खिडकीलाही डोळे असतात

खून, चोरी यांसारख्या अनेक घटनांच्या बातम्या आपण वाचत असतो, ऐकत असतो. काही केसेस सोडवल्या जातात तर काही तश्याच राहतात. त्यातला काही केसेस इतक्या अनाकलनीय असतात की भल्याभल्यांना घाम फुटतो. त्या सोडवायला पुढे येतात ते गुप्तहेर. घडून गेलेल्या गोष्टींवरचा पडदा बाजूला करणे आणि सत्य समोर आणणे हे त्यांचे काम. चित्रपटांमधील नायकांप्रमाणे बंदुका आणि शारीरिक बळाच्या जोरावर दरवेळी ते समाजातील वाईट लोकांना समोर आणू शकत नाहीत पण त्यांचं खरं हत्यार असते त्यांची बुद्धी आणि मनाचे संतुलन.

अश्याच काहीश्या एक गुप्तहेराच्या कहाण्या लिहिल्या आहेत प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी. त्यांच्या कथांचा नायक डॉ. कौशिक हा निवृत्त वैज्ञानिक आहे. जेव्हा जेव्हा पोलीस कमिशनर अमृतराव पेचात पडतात, तेव्हा ते डॉ. कौशिकांकडे धाव घेतात. फक्त वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून वेगवेगळ्या केसेस ते कसे सोडवतात हे पुस्तक वाचल्यावरच आपल्याला कळेल.

गूढकथा आणि विज्ञानकथा यांचा सुंदर मिलाफ या कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रहस्यांमधली गूढता आणि रंजकता कुठेही कमी होऊ न देता या कथा आपल्याला खिळवून ठेवतात. डॉ. कौशिकांचा मिश्किल स्वभाव आपल्याला आवडतो आणि कुणाच्याही नकळत त्यांची माहिती काढण्याची हातोटी लक्षात राहते. मराठीत अश्या गूढ-कथा लिहिणे आणि त्याला विज्ञानाची जोड देणे हा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. विज्ञानाचा असा वापर आपलं चांगलं मनोरंजन करतो. ह्या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाउसने केले आहे.

© मंदार कुळकर्णी, First published on thewavesofwords.wordpress.com

Marathi Book-Review by Mandar Milind Kulkarni : 112036110
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now