#हटके_गोड_पदार्थ
💛बदाम पुरी
थोड्याशा वेगळ्या चवीचा हा एक गोड प्रकार
बदाम पुरी ही एक अस्सल आणि पारंपरिक साउथ इंडियन पाककृती आहे.
मैदा, रवा आणि साखरेच्या पाकापासून ही डिश तयार केली जाते.
💛साहित्य
एक वाटी मैदा
एक मोठा चमचा रवा
पाच सहा बदाम भिजवुन साल काढून
चिमुटभर मीठ
एक मोठा चमचा तूप मोहन घालण्यासाठी
एक वाटी साखर पाकासाठी
वेलदोडे पावडर ,केशर
तेल तळणी साठी
थोडे दुध
💛कृती
प्रथम मोहन घालण्यासाठी घेतलेले तूप गरम करुन
मैदा रवा व मीठ याच्या मिश्रणात घालावे
व व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यावे
💛 भिजवलेल्या बदामाची थोडे दुध घालून मिक्सरमध्ये
बारीक पेस्ट करावी
ही पेस्ट मैदा,रवा या पीठात मिसळून
पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे
व झाकुन ठेवावे
💛एक वाटी साखरेत तितकेच पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा
पाक तयार झाल्यावर वेलदोडे पूड व केशर घालावे
💛तासाभराने झाकुन ठेवलेले पीठ परत थोडे मळुन घ्यावे
लागल्यास थोड्या दुधाचा वापर करावा
या पीठाचे लहान लहान गोळे करावे
💛एक गोळा घेऊन पातळसर लाटून पुरीच्या आकाराचा करावा
पोळी प्रमाणे मध्यात थोडे पीठ लावुन त्याचा त्रिकोण करवा
हा त्रिकोण तिन्ही बाजूंनी थोडासा कडेला दाबून घ्यावा
(म्हणजे तळताना हे पदर वेगळे होणार नाहीत )
व नंतर पीठ लावुन हलकेच सगळीकडून थोडासा लाटून घ्यावा
💛हे तयार त्रिकोण ओल्या फडक्याखाली झाकुन ठेवावे
तेल चांगले तापवून नंतर आच मंद करून तळून घ्यावेत
याला छान पदर सुटतात
💛 तळलेल्या बदाम पुरीचे तेल निथळून झाले की पाकात टाकावी
चार पाच मिनिटांनी या बदाम पुऱ्या पाक शोषून घेतात
नंतर बाहेर काढून एका ताटात ठेवाव्या
वरुन ड्राय फ्रुट चुरा घालावा
💛ही बदाम पुरी छान कुरकुरीत होते व बदामाच्या पेस्टमुळे एक वेगळी चव लागते
बदाम पुरी नावामुळे मी सजावट करताना बदाम वापरले आहेत 💛