नाश्ता टाईम
🌴कोळाचे पोहे 🌴
🌴कोळाचे पोहे ही पारंपारिक कोकणी रेसिपी आहे. हे प्रामुख्याने दक्षिण कोकणात बनवले जाते.
🌴ही एक अतिशय सोपी पाककृती आहे ज्याची चव खूपच छान लागते
🌴कोळाचे पोहे दक्षिण कोकणात नियमितपणे नाश्ता म्हणून प्रत्येक घरात बनवले जातात. नारळाचे दूध तेथे सहज उपलब्ध असल्याने ही तिकडे नेहेमी बनवली जाते
🌴या पाककृती मधील नारळाचे दूध आणि चिंचेचा कोळ यामुळे या पोह्याना आंबट गोड अशी चव लागते
🌴साहित्य
जाडे पोहे दोन वाट्या
दोन वाटया नारळाचं दूध
चिंचेचा कोळ
गू़ळ
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी मोहरी हिंग कढीलिंब
भाजलेले शेंगदाणे
दोन मिरच्या बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर
🌴कृती
प्रथम जाडे पोहे धुवून निथळून
नारळाच्या दुधात भिजवून ठेवायचे
तासाभराने ते नारळाचे दूध पिऊन फुलून दुप्पट होतात
हलक्या हाताने एकसारखे करून घ्यायचे
🌴चिंचेचा जाडसर कोळ काढून गूळ घालुन बाजुला तयार ठेवायचा
🌴मोहरी ,हिंग ,कढीलिंब ,बारीक चिरलेली मिरची याची फोडणी करून त्यात भाजकें शेंगदाणे परतून घ्यायचे
🌴फोडणी गार झाल्यावर
पोह्यांवर घालायची व चवीप्रमाणे मीठ घालून पोहे एकत्र करून घ्यायचे
🌴खायला देताना ऐन वेळी त्यात चिंचेचा कोळ मिसळून व भरपूर कोथिंबीर घालून द्यायचे
🌴 जोडीला एखादा तळणीतला प्रकार चांगला लागतो
🌴मी सोबत मस्त तळुन फुललेली कुरडई घेतली आहे