मातृदिन 🙏
आई...
आई फक्त तुझ्यासाठी ..
लहानपणा पासून वाढले तुझ्या कौतुकात पण “कडक “शिस्तीत
आवडत नसायचे मला अजिबात जर बोललीस तु कधी “रागात
मनाला खुपत असे कधी एखादी वस्तू न मिळणे
पण मनात मात्र ठसून जायचे
तुझे कायम “शांत ,आणी ..समाधानी ..असणे !
“संस्कार “..म्हणजे काय हे ही कधी नाही उमजले
पण सर्वांशी “आपुलकीने “वागणे हे मात्र तुझ्या कडून च शिकले
मला “घडवण्यासाठी “तुझी खूप धडपड असायची ..
मी मात्र सदा न कदा ..तुझ्या वरच रागवायची ..!!
माझ्या आयुष्यात ही मी तुला कायम “गृहीत ..धरले
तु मात्र प्रत्येक वेळी माझेच “भले ..चिंतिले ..!
शिकवणे तुझे कधी नाही अडकून पडले फक्त “छ्डीत ..
एक “संवेदना क्षम “व्यक्ती बनले मी फक्त तुझ्याच तालमीत ..!
तुझे सरळ साधे रूप माझ्या डोळ्यातली “बाहुली ..असते
वर्षे ..लोटली तु जावून पण मनातली जखम बुजत नसते ..
तुझा नुसता “उल्लेख ..झाला तरी डोळ्यातले पाणी थांबत नाही
तुझी “माया ..तुझे “प्रेम .त्रिखंड शोधले तरी मिळत नाही !
आज मागे वळून पाहते तेव्हा आठवतो आपला सारा “प्रवास ..
आणी पुन्हा पुन्हा डोळे भरतात ..कसा सरला ग आपला सहवास !!!
...............................................................................वृषाली 😪😪