🍀बाजरीचे आप्पे
आणि बाजरीचे डोसे..
हे दोन पौष्टिक प्रकार..
🍀दीड वाटी बाजरी
पाव वाटी उडीद डाळ
पाव वाटी मूग डाळ
पाव वाटी पोहे
🍀सकाळीच बाजरी स्वच्छ धुवून भिजत घातली
डाळी दोन्हीं वेगळ्या भिजत घातल्या
🍀रात्री बाजरी ,डाळी, व एक वाटी भिजवलेले पोहे
यातील निम्मे भरड असे आप्पे करण्या साठी वाटून घेतलें
🍀 निम्मा भाग डोसे करायला बारीक वाटून घेतला
सकाळी पीठ छान फुलले
त्यात मिठ व जिरे घालून
त्याचे डोसे व
मिरची कोथिंबीर वाटण घालून आप्पे केले
🍀सोबत आपल्या आवडीप्रमाणे खोबरे चटणी
मी दोन्हीं प्रकार एकाच दिवशी केले
🍀या साहित्यात सहा डोसे
व सोळा आप्पे झाले😊😊