पुनर्मिलन

(0)
  • 60
  • 0
  • 1.3k

घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरून शेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..

1

पुनर्मिलन - भाग 1

घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकलीआणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरूनशेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..नयनाच्या हातात पुस्तक होते ,ते घेऊनच ती खुर्चीवर बसली .पुस्तकात बघत बघत ती खात होती .“नयन काय ग हे तुझे वागणे ?किती वेळा सांगितले जेवताना वाचत ...Read More

2

पुनर्मिलन - भाग 2

ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होतीअर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात …बसची घंटा वाजली आणि ऊमा चटकन भानावर आली .तिचा स्टॉप आला होता .ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.दुकानाजवळ पोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले .तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला.झाडू घेऊन झाडणाऱ्या ऊमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .“मावशी इकडे आण तो झाडू ..मी झाडतो .असे म्हणत त्याने ऊमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि तो स्वतः झाडू लागला .झाडताना त्याने विचारले ,मावशी आज सुजाता ...Read More

3

पुनर्मिलन - भाग 3

दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला .आता लाडू ,वड्या, चिवडा असे कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .पण खरी मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .रोज एक वाजता जवळच्या एका शाळेतले सात आठ शिक्षक लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी सुद्धा खात .नंतर चहा तर असेच...ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा तो .आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे ऊमा आटोपत राहिली .कांदा कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करीत राहिली .थोड्याच वेळात सुजाता आली ..आणि परत दोघी मिळुन कामात गर्क होऊन गेल्यायानंतर सहा कधी ...Read More