घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरून शेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..
पुनर्मिलन - भाग 1
घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकलीआणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरूनशेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..नयनाच्या हातात पुस्तक होते ,ते घेऊनच ती खुर्चीवर बसली .पुस्तकात बघत बघत ती खात होती .“नयन काय ग हे तुझे वागणे ?किती वेळा सांगितले जेवताना वाचत ...Read More
पुनर्मिलन - भाग 2
ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होतीअर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात …बसची घंटा वाजली आणि ऊमा चटकन भानावर आली .तिचा स्टॉप आला होता .ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.दुकानाजवळ पोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले .तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला.झाडू घेऊन झाडणाऱ्या ऊमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .“मावशी इकडे आण तो झाडू ..मी झाडतो .असे म्हणत त्याने ऊमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि तो स्वतः झाडू लागला .झाडताना त्याने विचारले ,मावशी आज सुजाता ...Read More
पुनर्मिलन - भाग 3
दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला .आता लाडू ,वड्या, चिवडा असे कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .पण खरी मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .रोज एक वाजता जवळच्या एका शाळेतले सात आठ शिक्षक लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी सुद्धा खात .नंतर चहा तर असेच...ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा तो .आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे ऊमा आटोपत राहिली .कांदा कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करीत राहिली .थोड्याच वेळात सुजाता आली ..आणि परत दोघी मिळुन कामात गर्क होऊन गेल्यायानंतर सहा कधी ...Read More
पुनर्मिलन - भाग 4
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ऊमाला नेहेमीप्रमाणे जाग आली .शेजारी नयना गाढ झोपली होती झोपेत तिच्या अंगावरचे पांधरूण सरकले .ते हाताने सारखे करीत ऊमा हळूच उठली .आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मधले दार बंद करून घेतले .आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता .जसे जसे दुकानातले पदार्थ संपतील तसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजेच तयार करीत असे .त्यामुळे पदार्थांची चव टिकून रहात असे .तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर आंघोळीला गेली .आंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीतलाडूसाठी मोठ्या पातेल्यात बेसन भाजायला घेतले .बेसन भाजून झाल्यावर ते एका मोठ्या परातीत गार करीत ठेवलेआणि दुसरीकडे दुसऱ्या एका मोठ्या ...Read More
पुनर्मिलन - भाग 5
नयनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे .मनातले विचार बाजूला ठेवून ऊमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले डिशमध्ये तिने नयनाला एक लाडू पण वाढला .“आई तु पण घे न एक लाडू ,कसला मस्त झालाय असे नयनाने म्हणल्यावर“नको ग सारखे ते पदार्थ करून माझी तर खायची इच्छाच मरते बघ.असे म्हणून ऊमाने पोहे खायला सुरवात केली .खाऊन झाल्यावर नयना बाहेरच्या खोलीत गेली .तिच्या मैत्रिणीचा फोन होता त्यावर तिचे बोलणे चालू होते .ऊमाने पण सगळा आतला पसारा आवरला .थंड झालेला लाडू चिवडा डब्यातून भरून ठेवला .आणि बाहेर येऊन पेपर चाळत बसली .थोड्या वेळाने “आज जेवायला काय करू ग नयन ?असे ...Read More
पुनर्मिलन - भाग 6
सतीश अनाथ आश्रमातच लहानपणापासुन वाढला होता .त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते .त्यानंतर एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली .पगार चांगला होता .त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर..थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते .त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते.म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती .आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता .त्याने गावातच ऊमाला कधीतरी पाहिले होते .तिच्या लग्नाचे चालू आहे असेही ऐकले होते .साधीसुधी पण आकर्षक दिसणारी ऊमा त्याला आवडली होती .म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो आपलेच स्थळ घेऊन आला होता .त्या दिवशी संध्याकाळी ऊमा घरी आल्यावर काकांनी ...Read More
पुनर्मिलन - भाग 7
पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला .सतीशने काकूंना साडी आणि काकांना कपडे घेतले .ऊमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि बांगड्या घेतल्या .सध्या हे लहान मंगळसूत्र चालवून घे ,हळूहळू तुला आणखी दागिने करीन .असेही त्याने ऊमाला सांगितले .ऊमा खुष होती ,सतीशच्या अशा बोलण्याने ती आणखीन आनंदी झाली .अखेर हे लग्न पार पडले .सतीशचा ऑफिसमधला मित्र मोहन, रमाच्या वाड्यातील चार पाच माणसे इतकेच लोक उपस्थित होते लग्नाला .लग्नानंतर सतीशचे दोन खोल्याचे चांगले सजवलेले घर पाहून ऊमाला खुपच आनंद झाला.सतीशला थोडीच रजा मंजूर झाली होती म्हणूनलगेच दुसऱ्या दिवशी ऊमा आणि सतीश हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले .चार दिवस चांगल्या हॉटेलमध्ये त्याने बुकिंग केले होते ...Read More
पुनर्मिलन - भाग 8
तुला माहित आहे मी खरे म्हणजे मी कधी हॉटेलमध्ये जात नाहीपण तुझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये नक्की येणार बर का....!!”तिच्याकडे बघून मिचकावत बोलणाऱ्या ऊमाकडे बघताच ..नयनाने खूष होऊन आईचा गालगुच्चा घेतला.“आणि नयन मोह्नमामाला पण फोन कर बर का आधीच ..तो तर येतोच दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला ,त्याला आमंत्रण देऊन ठेव .”..आईचे बोलणे ऐकताच नयन हसली ..“आमचे फोन तर आधीच झालेत आई ..येणार आहे तो नेहेमीप्रमाणेचमला गिफ्ट काय हवे हे सुद्धा त्याने विचारून ठेवलेय मला ..”असे म्हणून खुष होऊन कपडे बदलायला आत गेली .गेली दहा वर्षे मोहन नियमित नयनाच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन येत असे .कित्येक वर्षाचे त्या दोघींच्या सोबत असलेले ...Read More